दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

लेखांक-3 : वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध

 लेखांक-3 : वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध

 

ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत, लेखक राजाराम सूर्यवंशी यांचा ‘वारकरी साहित्य आणि संप्रदाय : शोध आणि बोध!’ या लेखांकाची मालिका बहुजन शासक, बहुजन शासक मीडियांच्या वाचकांसाठी देत आहोत. ही मालिका वारकरी संप्रदायाविषयीचे मळभ दूर करणारे ठरेल, इतके ते ऐतिहासिक संदर्भांनी परिपूर्ण, विश्‍वासार्ह आणि दर्जेदार असून वाचकांसाठी पंढरीच्या वारीची मेजवाणी ठरणार आहे.
-संपादक 


वारकरी साहित्य असो, विद्रोही साहित्य असो, ग्रामीण साहित्य असो वा अभिजन साहित्य असो सर्वसमावेशकता हे त्यांच्या मुख्य प्रवाहाचे लक्ष्य असायला हवे. 
ही सर्वसमावेशकता नुसती बोलकी नसावी, तर वारकर्‍यांसारखी, वारकरी पंथासारखी कृतिशील असावी. मराठी बोलणारी व्यक्ती, भले ती कोणत्याही जाती-धर्माची असो ती वगळता कामा नये! यावर तिचा कटाक्ष हवा, जसा वारकरी साहित्याचा होता.
ज्ञानेश्वरांच्यापूर्वी मराठी साहित्याचे लेखन हे प्रायः संस्कृत भाषेत केले जात असे आणि ही संस्कृत भाषा लक्ष्मण मानेंच्या शब्दात  साडेतीन टक्क्यांची भाषा होती, जी बहुजनांना वर्ज्य होती. एवढेच नव्हे तर संस्कृत भाषा ऐकणे, बोलणे व लिहणेही दंडनीय होते.
साडे तीन टक्के समाज एकीकडे, तर साडे शहाण्णव टक्के समाज दुसरीकडे, असे भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय चित्र त्यामध्ये होते.म्हणून संस्कृत भाषा व संस्कृत साहित्य हे मराठीचा मुख्य प्रवाह होऊ शकत नव्हते. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे संस्कृत भाषा ही ब्राह्मण जातीय स्त्रियांसह सर्व बहुजन जातीय स्त्री-पुरुषांनाही वर्ज्य असल्याने ती लिंगभेदावर आधारित होती. अर्थात विषमतावादी होती.
या विषमताग्रस्त भाषिक/जातीय व सांस्कृतिक वर्चस्वाविरुध्द प्रथम भाषिक व सांस्कृतिक क्रांती चक्रधर व ज्ञानेश्वरांनी केली. या दोघा आद्य संतांनी संस्कृत भाषा व संस्कृतीच्या विरोधात सर्वसमावेशक प्राकृत व मराठी भाषेतून ओव्या व दृष्टांतकथा आणि ढवळ्यांची निर्मिती केली. ही क्रांती नुसती चक्रधर-ज्ञानेश्वरांनीच केली होती, असे नव्हे तर अनुक्रमे त्यांच्या शिष्या महादाइसा यांनी (1160 ते 2230) व भगिनी मुक्ताबाई (1301 ते 1219) यांनीही केली होती. तसेच त्यानंतर जनाबाई व बहिणाबाई (1550 ते 1622) यांनीही या क्रांतीत सहभाग घेतला होता.
स्त्री-शिक्षणाचा अधिकार धर्मशास्त्र व मनुस्मृतीने दिला नसतानी त्यांनी उत्तम प्रकारे बंडखोरी करून उत्तम प्रकारचे साहित्य संस्कृत भाषा व संस्कृतीच्या विरोधात जाऊन निर्माण केले होते. या सर्वांनी जातीधर्माच्या भिंती ओलांडून, पारंपरिक रुढीग्रस्त नियमांना लाथाडून वारकरी पंथाचा धार्मिक समतेचा भक्तीमार्ग चोखाळून ही क्रांती केली होती!
साहित्य हे आत्माविष्काराचे माध्यम असते. माणसाची उपजत स्वजाणीव, सभोवतालचे त्याच्यावर झालेले संस्कार, त्याची परंपरागत मूल्ये व आदर्श यांच्याशी त्याचा सतत होत असलेला संघर्ष वा सहयोग याचे पडसाद साहित्यात उमटत असतात.
वारकरी संतांच्या साहित्यातून व्यक्त झालेली मूल्ये ही जेवढी विद्रोही तेवढीच सामाजिकही होती. ती तशी एकटी नव्हती तर ती नवसाहित्यिकांची मांदियाळी घेऊन प्रकटली होती.
पुरुष वारकरी संतांची मांदियाळी तर आपणास ज्ञात आहेच, पण येथे आपण नुसती स्त्री वारकरी संताची मांदियाळीची नुसती चुणूक जरी बघितली, तरी आपल्याला वारकरी संत साहित्याची सर्वसमावेशकता लक्षात आल्यावाचून राहात नाही. 
संस्कृत भाषेच्या विरोधात उभे राहिलेले बंड मराठी स्त्री संतांपासून सुरु झाले होते, असे म्हणणे धारिष्ट्याचे असले तरी, फारसे चुकीचे ठरत नाही. कारण स्त्री साहित्याच्या अथवा मराठी साहित्याच्या अगदी आरंभालाच महानुभव संत साहित्यिका महादाइसा पुढे येते; परंतु महादाइसा एकट्याच पुढे नाहीत, त्या बाईसा, आऊसा, हिराइसा, पोमाइसा, कमलाइसा अशा अनेक विद्वान व कर्तबगार विद्रोही महानुभव संतांना घेऊन पुढे येतात व आपल्या बोली ग्रामीण मराठी प्राकृत भाषेने मराठी साहित्य समृद्ध करता करता वर्ण-जातिभेदाची दाहकता व त्याविरुध्दची मुक्तीची आस आपल्या या नव अब्राह्मणी साहित्याद्वारे व्यक्त करून जातात.
महादाइसाच्या पाठोपाठ येतात मुक्ताबाई. मुक्ताबाईही एकट्या येत नाहीत. त्या त्यांच्या पाठोपाठ जनाबाई, सोयराबाई, निर्मलाबाई, भागूबाई महारीण यांना सोबत घेवून येतात. त्यांची वाटपुसत कान्होपात्रा, संत सखूबाई येतात. मराठी साहित्यात वारकरी स्त्रीसाहित्याने चांगले बाळसे धरु लागल्यवर सुमारे दोनशे वर्षांच्या प्रदीर्घ अवकाशाने, मोठ्या जोरा शोरात अवतरतात महान विद्रोही संत तुकाराम महाराजांची महान विद्रोही शिष्या बहिणाबाई पाठक! समस्त ब्राह्मणी धर्माला ब्राह्मण कोण? हा प्रश्न विचारून, समस्त मराठी साहित्यात वारकरी साहित्याचे मध्यमर्ती स्थान निर्माण करणारी व जात-जाणिवेला जातिअंताच्या दिशेने वळवणारी महान मराठी संत साहित्यिक बहिणाबाई पाठक!!
या सर्व स्त्री वारकरी स्त्री साहित्यिकांमध्ये मराठी साहित्य निर्माणाच्या प्रेरणांमध्ये मुख्य प्रेरणा होती-धार्मिक असमानतेची, रुढी-परंपरांच्या अन्यायी खोल दुःखाची! व आस होती सामाजिक-धार्मिक सुधारणेची! म्हणून हे वारकरी संत जसे धर्म सुधारक होते, तसे क्रांतीकारी समाजसुधारकही होते. त्यांची वारकरी चळवळ ही धार्मिक व सामाजिक सुधारणेची चळवळ होती. त्यांचे वारकरी साहित्य हे मराठी भाषेला महान क्रांतीकारी वारसा प्रदान करणारे प्रेरणादायी साहित्य होते.
या समृध्द वारकरी संतानी मराठीला दिलेल्या योगदानाबरोबर त्यांचे योग्य मूल्यमापन करताना महान विदुषी इंदुमती शेवडे त्यांच्या संत कवयत्री या महान संशोधनपर ग्रंथाला दिलेल्या व स्वतःच लिहिलेल्या प्रस्तावनेत पान 3 वर लिहितात,
‘......10 व्या, 11व्या शतकापासून शास्त्रबध्द झालेल्या, चेतनाहीन व स्थितीवादी-कर्मजड-बनलेल्या हिंदूधर्मात पुन्हा नवा प्राण ओतण्यासाठी सर्वत्र निकराचे प्रयत्न झाले व प्रचलित धर्माविरोधात वारकरी भक्ती चळवळीची लाट महाराष्ट्रभर पसरली. तीचे लोण देशपातळीवर विविध पंथरुपाने उमटले. हे बंड मुळात चातुर्वर्ण्याच्या विरोधात उभे ठाकले होते. समतेचा पुरस्कार करणारे होते. यात पहिले ‘बडेबंडवाले’ म्हणून महानुभव पंथाचे संस्थापक श्री. चक्रधर स्वामी हे अग्रणी होते.
चक्रधर स्वामींनी बहुजन समाजात आपली समतेची शिकवण पोहचावी म्हणून संस्कृत भाषा नाकारून मराठी-प्राकृत भाषा निवडली होती. शिवाय त्या भाषेतच ग्रंथरचना करावी असा सल्ला दिला आहे.
चक्रधरांप्रमाणे ज्ञानेश्वरांनीही देववाणी संस्कृतला अव्हेरून आपल्या ओव्या मराठी-प्राकृतमध्ये लिहून त्या सर्व निम्न जातीय जनतेपुढे खुल्या करून ब्राह्मणी नियमांना खुले आव्हान दिल्याने दुसरे बडेबंडवाले ठरले होते. त्यानंतर संत नामदेव महाराज हे तिसरे बंडवाले. त्यांनीच प्रथमतः सर्व निम्न जातीय संत व जनतेला ‘वारकरी’ बनवून पंढरीची वारी सुरु केली होती. म्हणून ते तिसरे बंडवाले! चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी हे संत नामदेवांचेच सहकारी व वारकरी! 
त्यानंतर येणारे व संत ज्ञानेश्वरांच्या समाधीतील गळ्याला रुतणारे काटे काढढणारे, अर्थात ज्ञानेश्वरी दुरुस्त करणारे महान संत एकनाथ महाराज! पैठणचे संत. याच पैठणच्या ब्राह्मणी पीठाने विठ्ठल पंतांना अर्थात ज्ञानेश्वर भावंडांच्या वडिलांना देहादंडाची शिक्षा ठोठावून त्यांच्या मुलांना अनाथ करून, त्यांचे द्विज संस्कार नाकारून त्यांना शूद्र वर्णात ढकलले होते.
त्यानंतर येतात महान विद्रोही संत, शूद्रांचे प्रतिनिधी, अस्सल वाणीचे व निर्भिड लेखनीचे धर्तेकर्ते, सर्वात मोठे बंडखोर संत तुकाराम महाराज!
या सर्वांनी हा संप्रदाय घडवला-वाढवला आणि वारी नावाचा ‘लाँगमार्च’ जगाला घडविण्यासाठी प्रसारित केला! पंढरपूरची दिंडी आणि वारी नामदेवांनी संघटित केली होती. जातींचे अवडंबर न करता सर्व जातिजमातीचे स्त्री-पुरुष वारकरी त्यात सामील होत असत. ज्यांना संस्कृतमध्ये बोलण्याचा व लिहिण्याचा अधिकार नव्हता त्यांना वारकर्‍यांनी व वारकरी संप्रदायाने मराठीत बोलते केले. हा अधिकार बहुजनांना, अठरापगड जातींना प्राप्त व्हावा यासाठीच आम्ही मराठीमध्ये लिहित आहोत, अशी स्पष्ट भूमिका चक्रधर-ज्ञानेश्वरांपासून ते तुकोबांपर्यंत सर्व संतांची होती. त्यातूनच त्यांनी भाषिक वर्चस्वातून निर्माण होणार्‍या वर्णभेद, जातीभेद, लिंगभेद इत्यादी जाणिवा निर्धारपूर्वक दूर केल्या होत्या.
याबाबत संत तुकाराम महाराज म्हणतात,
सोडुनिया वाटा सुक्ष्म दुस्तर!
केला राज्यभार चाले तैसा!!
म्हणजेच, पूर्वीच्या वाटा सूक्ष्म होत्या. त्या वाटांवरून ठराविक वर्णियांना जाता येत होते. अशा सर्व वाटा मोडून, सर्व समाजाला जाता-येता येईल अशी वहिवाट संतांनी निर्माण केली. येथे जी व्यापकता दिसते ती संस्कृतमध्ये नव्हती. म्हणून संत साहित्य हेच मराठीचा मुख्य प्रवाह ठरणे हे पक्के होता..
वारकर्‍यांना पूरक अशी भूमिका महानुभवांचीही होती. हे आपण अगोदर पाहिले आहे. त्यांनीही त्यांचे साहित्य प्राकृत, अर्धमागधी व बोली भाषेत लिहिले होते. त्यांचे लिळाचरित्र, ढवळे व दृष्टांतकथा आज मराठी साहित्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. प्रतिक्रांतीपासून वाचण्यासाठी हे महानुभव गुप्त राहिलेत; परंतु त्यांनी आपला अब्राह्मणी वारसा सोडला नाही, ब्राह्मणी जीवन प्रवाहात सामील झाले नाहीत...!

(लेखकाच्या ‘वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध’, या पुस्तकातून क्रमशः)

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?