दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

राहुल गांधी कोणत्या अर्थाने हिंदू?

 राहुल गांधी कोणत्या अर्थाने हिंदू?

काँग्रेसची हिंदू-हिंदुत्ववादी नवव्याख्या काय अधोरेखांकीत करते?

राहुल गांधी कोणत्या अर्थाने हिंदू?


काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वंशावळी तपासली तर लख्ख आरशासारखे राहुल कोण आहेत, हे स्पष्ट होते. राहुल गांधी यांची आजी (जास्त खोलात न जाता) स्व. इंदिरा गांधी आणि आजा फिरोज  या नात्याने राजीव गांधी (गांधी हे नाव धारण केलेले आहे) आणि सोनिया ऊर्फ अंतोनियो अल्वीना माइनो (ख्रिश्‍चन) या दोघांचे चिरंजीव असलेले राहुल गांधी कोणत्या नात्याने हिंदू आहेत?, हे वाचकांवर सोडले तर काँग्रेसच्या बेगडी धर्मनिरपेक्षतेचा प्रश्‍न उरतोच...

-संपादक

कालचे राहुल गांधींचे जयपूर राजस्थान मधील हिंदू कोण आणि हिंदुत्ववादी कोण? या संबंधीचे भाषण देशवाशियांनी ऐकले आणि अनेक धर्मनिरपेक्षवादी, लोकशाहीवाद्यांच्या आणि समाजवाद्यांच्या भुवया उंचावल्या.  

या देशावर काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 16 वर्षे 286 दिवस, इंदिरा गांधींनी 11 वर्षे 59 दिवस, डॉ. मनमोहन सिंग यांनी 10 वर्षे 4 दिवस, राजीव गांधींनी 5 वर्षे 32 दिवस, नरसिंहराव यांनी 4 वर्षे 330 दिवस, लाल बहादूर शास्त्रीने 1 वर्षे 216 दिवस, पुन्हां इंदिरा गांधी 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984 (हत्त्या) पर्यंत एकूण 15 वर्षे 350 दिवस प्रधानमंत्री पदांवर होत्या. एकूण काँग्रेसचा सत्तेतील कालावधी 54 वर्षे 123 दिवस होता. 

मात्र, 23 मार्च 1977 पर्यंत काँग्रेसने संघ विचारसरणीला रसदा पुरवून संघाचा छुपा हिंदुत्ववाद संवर्धित केला. एव्हढेच काय तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आरएसएसचे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या मंत्रिमंडळात घेऊन 15 ऑगस्ट 1947 ते 6 एप्रिल 1950 पर्यंत उद्योग व पुरवठा मंत्री केले व संघाच्या सल्ल्यानुसारच ध्येय धोरणे आखली व राबवली गेली. पुढे 24 मार्च 1977  ते 28 जुलै 1979 या जनता पक्षाच्या सरकारात मोरारजीभाई देसाई यांनी आएसएसचे अटलबिहारी वाजपेयी यांना परराष्ट्रमंत्री व लालकृष्ण अडवांनी यांना माहिती व प्रसारण मंत्री बनवून संघाला बळकटी आणली. हे ऐतिहासिक सत्य कोण नाकारेल का?

व्ही.पी. सिंग यांचे 343, इन्द्रकुमार गुजरालचे 332, एचडी देवेगौडा यांचे 324, चंद्रशेखर यांचे 223 व चरणसिंग यांचे 170 अशी 1392 दिवसांची काँग्रेसेत्तर 5 सरकारे आली. तेवढाच कालावधी काय तो संघांविना राहिला. पुढे अटलबिहारी वाजपेयी यांचे 6 वर्षे 64 दिवस आणि 2014 ते आज मितीपर्यंत डिसेंबर 2021 (सात हुन अधिक)-2024 पर्यंत म्हणजे 16 वर्षे भाजप संघाच्या ताब्यात (अधिक पूर्वीची 4 अशी 20 वर्षे) आहे. 

मूळ काँग्रेस पोषित संघी काँग्रेस सोडून भाजप-संघवाशी झाल्याने सत्तेसाठी आता विचारांत परिवर्तने येताहेत की काय, अशी शंकेची पाल चुकचुकते आहे. हिंदुत्वाच्या अजेंड्यावर भाजप-संघ सत्तेत येतोय म्हटल्यानंतर काँग्रेस ही हिंदू आणि हिंदुत्वाच्या नव्याने व्याख्या परिभाषित करत आहे. 

रविवार, दि. 12 डिसेंबर 2021 रोजी राहुल गांधींच्या त्या वक्तव्यांने काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या, समाजवादी विचारांना केराच्या टोपलीत टाकले आहे, असेच जणू काही निर्देशित केले आहे. त्यामुळे येथील 26 कोटी मुस्लिम, 37 कोटीहून अधिक एससी, एसटी, बौद्ध, आदिवासी, 5 कोटी शीख आणि 3 कोटी ख्रिश्चन यांच्या समोर काँग्रेस विचारांचे बदलते हिंदू-हिंदुत्ववादी विचारांचे झाकोळ (काळेढग)निर्माण झाले आहे.  

हिंदूंच्या आणि हिंदुत्वाच्या या नवं व्याख्खित वेष्टनांत 30 टक्के मराठ्याना सामाजिक आरक्षण, 52 टक्के ओबीसींना राजकीय आरक्षण नाकारणारे, अनुसूचित जाती-जमातींना पदोन्नतीत आरक्षण नाकारणारे, मुस्लिम आरक्षणांची अंमलबजावणी न करणारी सरकारे, त्या केवळ सत्तालोलुप व्याख्येत गुंडाळण्याच्या तीव्र मानसिकतेत आहेत काय? 

केवळ सत्तेसाठी भाजप प्रमाणेच काँग्रेसही संविधानिक व्यव्यस्थेला बगल देऊन हिंदूच्या मृगजळात अडकविण्याच्या स्थितीत आली आहे काय? एरव्ही भाजप-संघ संविधानिक ढाचा मोडीत काढत आहे, अशी ऊर बडवणारी काँग्रेस, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य  घडवण्याच्या संकल्पनेस छेद देऊन अगदी तळागळातील, शोषित, वंचित घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याच्या घटनादत्त तरतुदीस हरताळ फासणार असेच आहे का?

हिंदु-हिंदुत्व हे संविधानिक तरतुदीस ओव्हरटेक करणारे आहे आणि कोणतेही हिंदुत्व मग ते कडवे की भले सॉफ्टही असले तरी 73 कोटीहून अधिक पीडित, बहिष्कृत वर्गांचे हित संवर्धित करणारे नक्कीचं नाही. त्या सत्तेच्या रोखाने केलेले हे काँग्रेस व राहुल गांधींची भूमिका काँग्रेस विचारधारेचे बदलते स्वरूप असेल तर ते ही येथील अन्यधर्मीय व अनेक पंथांच्या लोकांना भाजप सारखेच गोड विष आहे.

त्यामुळे गरिबांचे, शोषितांचे आणि वंचितांचे सत्तेत स्थानांतर होण्यासाठी गेली अनेक वर्षे डावे, उजवे कम्युनिस्ट, समाजवादी व भारिप-बमसं ते वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करणार्‍या अनेक समविचारी राजकीय पक्षांना एकत्र येऊन, आरक्षण लाभार्थी व आता नाकारलेल्यांनी या बदलत्या काँग्रेसी विधानाची, नव्या व्याख्याची गांभीर्याने दखल घेणे अनिवार्य असेच झाले आहे.कुठलेही हिंदुत्व ही संविधानिक ओळख नाही. भारतीयत्व हीच संविधानिक आणि जागतिक पातळीवरील ओळख आहे. हिंदू आणि हिंदुत्वाची परिणिती कशी होते हे अलीकडील 7 वर्षांच्या काळात देश अनुभवतो आहे. काँग्रेस केवळ सत्तेसाठी संविधानिक राष्ट्रीय महामार्गांवर वळणे घेत असेल तर तेही अपघाती, विनाशकारी ठरेल?

राहुल गांधी कोणत्या अर्थाने हिंदू?
(अनंतराव सरवदे, सेवा निवृत्त तहसीलदार, बीड)

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासक' नियमित वाचा) 

टिप्पण्या

  1. राहुल गांधी यांनी भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला असे असेल तरी राजकीय पक्षांचा हा गोंधळ दक्षिण भारतात अर्थशून्य ठरतो आता आधुनिकतेकने पुढे ठेवलेली आव्हाने पेलताना अत्यंत निरर्थक जातीयवाद नाकारणारे राजकीय नेतृत्व देशाला पाहिजे आहे , त्यासाठी जातीच्या अस्मिता आणि भावनांचे फसवे राजकारण समाजाने नाकारावे म्हणून जोर देणारे रस्ते शोधावे लागणार आहेत .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?