दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

विश्‍वाचा निर्माता कोण? ; फुले म्हणाले, देव नाही!

 विश्‍वाचा निर्माता कोण? ; फुले म्हणाले, देव नाही!

महात्मा फुले लिखित ‘निर्मिकाचा शोध’ व ‘मनुस्मृतीचा धिक्‍कार’ प्रकाशनाच्या वाटेवर

विश्‍वाचा निर्माता कोण?; फुले म्हणाले देव नाही

भास्कर सरोदे, औरंगाबाद (गुरुवार, दि.9 डिसेंबर 2021) :

विश्‍वाचा निर्माता कोण? संपूर्ण मानव जातीला पडलेला हा प्रश्‍न. आजचे प्रगत विज्ञानही त्याचे ठोस उत्तर देऊ शकले नाही. पूर्वग्रदूषितपणाने कदाचित. देव, निर्माता संकल्पना डोक्यात ठेवून विश्‍व निर्मितीचे गूढ उकलणार नाहीच. किंबहुना उकलू नये असेच गूढवाद तथा रहस्यवादींना वाटत असते. विज्ञानाच्या सर्व कसोट्या बायपास करून विश्‍वाचे गूढ उकलणार कसे? ज्यांना चिकित्सेचे वावडे आहे, ते गूढवादाच्या आडून आपला मतलब साधून घेतात. समाजक्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले यांनी थोतांड माजविणार्‍यांचे तोंड फोडले आहे. महात्मा फुले म्हणाले, देव हा विश्‍वाचा निर्माता नाही. मग कोण आहे विश्‍वाचा निर्माता? 

महात्मा फुले यांचा हा विज्ञानवादी पैलू आजपर्यंत दुर्लक्षित राहिला. महात्मा फुले यांनी ‘निर्मिकाचा शोध’ या छोट्या परंतु ऐतिहासिक, वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या पुस्तकातून विश्‍वाचा निर्माता कोण, याचे उत्तर दिले आहे. जे विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरणारे आहे. विश्‍वाचा निर्माता कोण? हे समजून घेण्यासाठी औरंगाबाद येथील जीवक प्रकाशन प्रकाशित आणि बहुजन शासकचे संपादक भास्कर सरोदे संपादित ‘निर्मिकाचा शोध’ व ‘मनुस्मृतीचा धिक्‍कार’ हा संयुक्‍त ग्रंथ वाचकांच्या सेवेत येत आहे. औरंगाबाद जिल्हा, पैठण येथील सत्यशोधक जी. ए. उगले यांची या ग्रंथाला प्रस्तावना आहे. यामुळे या ग्रंथाचे मूल्य वाढले आहे. हा ग्रंथ शिक्षणाच्या आद्यक्रांतीकारक सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी (3 जानेवारी 2022) प्रकाशित केला जाणार आहे. वाचकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

खगोल तथा भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंगचे जगप्रसिद्ध ‘अ ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम’ हे जगप्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. सुभाष के. देसाई यांनी ‘महास्फोटापासून कृष्णविवरापर्यंत काळाचा संक्षिप्‍त इतिहास’, या नावाने केला आहे. या पुस्तकाला कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. कार्ल सेगन यांनी पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना लिहिली आहे. या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘हे पुस्तक ईश्‍वरेच्छा किंवा कदाचित ईश्‍वरेच्छेच्या अभावाबद्दलही आहे. ईश्‍वर या शब्दाचा उल्‍लेख बर्‍याच पानांवर आलेला आहे. या विश्‍वाच्या निर्मितीत परमेश्‍वराची निवड असे काही होते का, या आईन्स्टाईनच्या सुप्रसिद्ध प्रश्‍नाचा या पुस्तकात हॉकिंगने सुरुवातीलाच आढावा घेतला आहे. परमेश्‍वराच्या मनात काय चालले असेल, त्यात डोकावून बघण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे हॉकिंगने स्वत: स्पष्टपणे सांगितले आहे. या विश्‍वातील आकाशाला सीमा नसल्यामुळे आणि काळाला आरंभ किंवा अंत नसल्यामुळे निर्मात्याच्या वाट्याला करण्यासारखे काहीच शिल्‍लक उरत नाही. हा सर्व प्रयत्नांती आलेला निष्कर्ष कदाचित अनपेक्षित वाटू शकेल’.

स्टीफन हॉकिंग यांनी विश्‍वनिर्मितीचे सार मांडताना देवाच्या अस्तित्वाचाही सोक्षमोक्ष लावलेला आहे. ते म्हणतात, ‘जोपर्यंत विश्‍वाला आरंभ आहे, तोपर्यंत त्याला निर्माता आहे, असे समजू शकतो. मात्र, विश्‍व हे खरोखरीच पूर्णतया स्वयंपूर्ण असेल, ज्याला मर्यादा किंवा कडा नाहीत, शिवाय त्याला प्रारंभ नाही आणि अंतही नाही. ते फक्‍त अस्तित्वात आहे इतकेच. मग निर्मात्याची भूमिका कोणती?’, असा रोकडा सवाल त्यांनी केला आहे.

स्टीफन हॉकिंग पुढे म्हणतात, देव या विश्वाचा निर्माता आहे काय? असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. बिग बँग स्फोटाआधी काळाचाच जन्म झाला नव्हता. त्यामुळे देवाकडे विश्व बनवण्यासाठी वेळ कुठून येणार? हा प्रश्न अडाणीपणाचा आहे. पृथ्वीच्या शेवटच्या सीमेपर्यंत जाण्याचा मार्ग विचारण्यासारखा आहे. पृथ्वी गोल आहे. त्याला कडा नाहीत. सीमा नाहीत. तिथे जायचा मार्ग विचारणे हा प्रश्न अडाणीपणाचा आहे.

भारतातील प्राचीन तत्त्ववेत्त्यांत कपिल हा अग्रगण्य होता. त्याचा तत्त्वज्ञानविषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्त्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्त्वज्ञानाला सांख्य तत्त्वज्ञान म्हटले जाते. त्याच्या विचारातील मूलतत्त्वाचे स्वरूप थक्‍क करून टाकणारे होते. ‘सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे’, हे सांख्य तत्त्वज्ञानाचे पहिले तत्त्व होय. पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलने सिद्धतेचे फक्‍त दोन मार्ग मानले.

अ. प्रत्यक्ष ज्ञान : प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन.

ब. अनुमान : अनुमान तीन प्रकारचे आहे.

  1. कारणावरून कार्य ओळखणे
  2. कार्यावरून कारण ओळखणे
  3. साम्य

कपिलचे दुसरे तत्त्व सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण. ‘हे विश्‍व निर्माण करणारा कोणी तरी निर्माता आहे, हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सूतापासून कापड तयार होते, त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूंचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते’, असे त्याचे मत होते. 

‘अनंत अनादि। मिळुनि आकाश। झाले अवकाश। आणि विश्‍व॥

त्याला नाही दिशा। कालाचे बंधन। जनन-मरण। त्यास नाही॥

असा कोणी कर्ता। नाही आकाशास। आणि पोकळीस। जोती म्हणे॥’

आधुनिक विज्ञानाने ‘बिंग बँग थिअरी’ आणि ‘ब्लॅक होल थिअरी’च्या माध्यमातून विश्‍वनिर्मिती आणि निर्माता याविषयी काही अनुमान काढले आहेत, जे महात्मा फुले यांनी यापूर्वीच सांगितले आहेत. ‘विश्‍वाला दिशा नाही, त्याला काळाचे बंधन नाही आणि विश्‍वाला आरंभ आणि अंत नाही’, हा सिद्धांत महात्मा फुले यांनी या पुस्तकात मांडला आहे. याच सिद्धांताचा उल्‍लेख या शतकातील सर्वात विलक्षण बुद्धिमान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन डब्ल्यू. हॉकिंग यांनी आपल्या विविध पुस्तकांच्या माध्यमातून मांडला आहे.

याबरोबरच बरेच काही या पुस्तकात वाचायला भेटणार आहे…



विश्‍वाचा निर्माता कोण? ; फुले म्हणाले, देव नाही!


पुस्तकासाठी संपर्क :

7875451080

जीवक प्रकाशन, औरंगाबाद.

पुस्तकाची पाने : 64

किंमत : 60 रूपये


प्रकाशनपूर्व सूट : 15%

10-50 पुस्तक खरेदी : 20% सूट

50-100 पुस्तक खरेदी : 30% सूट

100 पेक्षा जास्त पुस्तक खरेदी : 40% सूट

(स्पीडपोस्ट अथवा कुरियरचा खर्च वेगळा)


बुकींग :

Amita Bhaskar Sarode

SBI A/C No : 34783131199

IFSC Code : SBIN0010791

Branch : MIT, Aurangabad.

किंवा

फोन पे, गुगलपे नंबर : 7875451080

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासक' नियमित वाचा) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?