दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

मनुस्मृती दहन दिन: महात्मा जोतीराव फुलेंची भविष्यवाणी 70 वर्षात ठरली खरी!

मनुस्मृती दहन दिन: महात्मा जोतीराव फुलेंची भविष्यवाणी 70 वर्षात ठरली खरी!

-महात्मा फुले लिखित ‘निर्मिकाचा शोध’ आणि ‘मनुस्मृतीचा धिक्‍कार’ प्रकाशनाच्या वाटेवर

महात्मा जोतीराव फुले

बहुजन शासक :

बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे जाहीर दहन करून देशातील सुमारे 80 टक्के (100 टक्के स्त्रियांसह) जनतेला विषमतावादी, गुलामगिरीतून मूक्‍त केले. तेव्हापासून महाराष्ट्र आणि देशात 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन म्हणून पाळला जातो. या दिनाची यानिमित्ताने आठवण होण्याचे कारण असे की, मनुस्मृती दहन करण्याची भविष्यवाणी महात्मा जोतीराव फुले यांनी केली होती. आणि सुमारे 70 वर्षातच बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी मनुस्मृती जाहीर जाळली. हा काही योगायोग म्हणता येणार नाही. तर एका शिष्याने आपल्या गुरूला दिलेली एक अनमोल भेट म्हणता येईल. याशिवाय भारताला संविधान देऊन कायद्याने मनुस्मृतीला स्पष्ट धिक्‍कारले आहे.

महात्मा फुलेंची भविष्यवाणी! :

महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजातील अनिष्ट चालीरीती, परंपरांवर कठोर आसूड ओढले आहेत. शिक्षणातील विषमता, देव आणि धर्माच्या नावाने होणारी शेतकर्‍यांची लूट, सामाजिक भेदाभेद, धर्मग्रंथांचा पाखंडीपणा, यावर टोकाची टीका केली. त्यातून बाहेर निघण्याचे मार्ग सांगितले. ‘मनुस्मृती’ दहन करण्याचीही त्यांनी भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे जाहीर दहन करून खरी ठरवली.

काय होती भविष्यवाणी? :

‘मनुस्मृतीचा धिक्‍कार’ या ग्रंथात महात्मा फुले यांनी मनुस्मृतीची चिकित्सा केली आहे. हा ग्रंथ महात्मा फुले यांच्या समग्र वाङ्मयातून सुटलेला आहे. या ग्रंथात महात्मा फुले म्हणतात, ‘मनुसंहितेतील सारे नीतिनियम पक्षपाती असून त्यायोगे ब्राह्मणादि द्विजांची मने व बुद्धी तेजपुंज करण्यास उपयुक्‍त ठरणारे आहे, त्याउलट शुद्रादि अतिशूद्र हिंदूंची मने व बुद्धी दुर्बल व मनुष्यत्वहीन होऊन ते पशू बनून आपले इमानी कुत्र्याप्रमाणे दास बनावेत, या दुष्ट व स्वार्थी हेतूने तिची रचना करण्यात आली आहे. भटांचे हे कपटजाल शूद्रादि अतिशूद्र लोकांना समजल्यावर त्यांना संताप येऊन त्या भरात ते मनुसंहितेला मानवशास्त्र न म्हणता सैतानांची शिफारस करणारे शास्त्र म्हणून हल्‍लीच्या ज्ञानी म्हणवून घेणार्‍या भटांनी नाहीसे केले नाही तर आम्ही या ग्रंथाची चिरफाड करून त्याच्या चिंध्या चिंध्या करून पैखान्याच्या टोपलीत टाकू किंवा जाळून टाकू, अशी निव्वळ बडबड करणार नाहीत, तर हे कार्य दिवसा ढवळ्या आणि भटांच्या डोळ्या देखत करतील, असे मी भविष्य करतो’.

महात्मा जोतीराव फुले
मनुस्मृती दहन

का केला मनुस्मृतीचा धिक्‍कार? :

महात्मा जोतीराव फुले यांनी विविध कारणांमुळे मनुस्मृतीचा धिक्‍कार केला आहे. ते लिहितात, ‘हीन जातींची धार्मिक कार्य करणे किंवा त्यांना शिकविणे हे पाप आहे. हे पाप त्यागाने व तपाने ब्राह्मणाने शांत करावे. शूद्रांना विद्या शिकविणे, त्यांना द्विजातींचा धर्म सांगणे हे अयोग्य असून त्यामुळे ब्राह्मणांना नरकप्राप्‍ती होते, असे मनुसंहितेसारख्या अपवित्र ग्रंथात नमूद करून ठेविले आहे. यावरून हा ग्रंथ लिहिणार्‍या कावेबाज अकरमाशी भट लेखकाची ठकबाजी समजून येते. म्हणून मी एकंदर मनुसंहितेचा धिक्‍कार करतो’.

महात्मा जोतीराव फुले यांनी मनुस्मृतीचा धिक्‍कार करण्याची विविध कारणे दिली आहेत. औरंगाबाद येथील जीवक प्रकाशनने महात्मा जोतीराव फुले यांच्या ‘निर्मिकाचा शोध’ आणि ‘मनुस्मृतीचा धिक्‍कार’ या दोन दुर्मिळ ग्रंथाचा एक संयुक्‍त ग्रंथ बनवून वाचकांच्या सेवेशी सादर करण्यास सज्ज केला आहे. या ग्रंथाला ज्येष्ठ सत्यशोधक जी. ए. उगले यांनी प्रस्तावना लिहून या ग्रंथाची उपयुक्‍तता समाजासमोर ठेवली आहे. हा ग्रंथ शिक्षणाच्या आद्यकर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी (3 जानेवारी 2022) रोजी प्रकाशित केला जाणार आहे. हा ग्रंथ मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा ठरेल असा विश्‍वास वाटतो. 

प्रकाशकांनी वाचकांसाठी प्रकाशनपूर्व सूट जाहीर केली आहे.


पुस्तकासाठी संपर्क :
7875451080
जीवक प्रकाशन, औरंगाबाद.
पुस्तकाची पाने : 64
किंमत : 60 रूपये

प्रकाशनपूर्व सूट : 15%
10-50 पुस्तक खरेदी : 20% सूट
50-100 पुस्तक खरेदी : 30% सूट
100 पेक्षा जास्त पुस्तक खरेदी : 40% सूट
(स्पीडपोस्ट अथवा कुरियरचा खर्च वेगळा)

बुकींग :
Amita Bhaskar Sarode
SBI A/C No : 34783131199
IFSC Code : SBIN0010791
Branch : MIT, Aurangabad.

किंवा

फोन पे, गुगलपे नंबर : 7875451080

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासक' नियमित वाचा) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?