पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

इमेज
 डॉ. नागनाथ कोत्तापल्‍ले अन् बहुजन शासकची पत्रकार परिषद ; एक आठवण माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन  भास्कर सरोदे, औरंगाबाद : ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले (74 ) यांचे आज (30 नोव्हेंबर 2022) अल्पशा आजाराने निधन झाले. डॉ. कोत्तापल्ले यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचा नोकरीतील अनुशेष मोठ्या प्रमाणात शिल्लक होता. डॉ. कोत्तापल्ले यांनी कुलगुरू पदाचा पदभार (2005-10) हाती घेताच त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने अनुशेष भरला. अनेकांच्या जीवनातील अंधार दूर झाला. ही बाब जातीयवादी तथा सरंजामवृत्ती असणार्‍यांच्या डोळ्यात खुपली. त्यांनी विद्यापीठातील काही ‘सुपारीबाज’ विद्यार्थी संघटना आणि विद्यापीठात ठाण मांडून बसलेल्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून डॉ. कोत्तापल्ले यांना त्रास द्यायला सुरूवात केली. मागासवर्गीयांचा अ...

दूरवस्था ते मॉडेलस्कूल : आबेगाव जिल्हा परिषद शाळेचा प्रेरणादायी प्रवास

इमेज
 दूरवस्था ते मॉडेलस्कूल :  आबेगाव जिल्हा परिषद शाळेचा प्रेरणादायी प्रवास आबेगाव : लोकसहभाग व श्रमदानातून नवनिर्मित जिल्हा परिषद शाळेची पाहणी करताना बहुजन शासकचे मुख्यसंपादक भास्कर सरोदे, मुख्याध्यापक संजय राठोड, विलासभाऊ शेजुळ, किशोर शेजुळ, विलास शेजुळ सर आदी.

भुजबळांचे काय चुकले?; विद्येची देवता हारिती, सरस्वती नव्हे!

इमेज
 भुजबळांचे काय चुकले?; विद्येची देवता हारिती, सरस्वती नव्हे! औरंगाबाद : मुंबईत महात्मा फुले समता परिषद आयोजित सत्यशोधकांचा सत्कार समारंभ सोमवार, दि. 26 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत सरस्वतीची पूजा कशासाठी, त्याऐवजी महापुरुषांचे फोटो लावा, असा रोकडा सवाल ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला. त्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठवली जात असून त्यांच्या राजीनाम्यापासून ते त्यांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, शिवाय त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. खरं पाहिलं तर भुजबळांचे काय चुकले? त्यांनी मानवी चेतनेला चुचकारले आहे. यानिमित्ताने ब्राह्मणी छावणीच्या लबाडीलाच आव्हान दिले आहे. विद्येची देवता कोण? हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. बहुजन शासकचे मानद संपादक नितीन सावंत यांचे विशेष संपादकीय (30 सप्टेंबर 2022) बरेच बोलके असून या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यास मदतगार ठरू शकेल, इतके ते आश्‍वासक आहे.   भुजबळ नेमकं काय म्हणाले? : आपल्या भाष...

वादग्रस्त : ‘अस्पृश्यांनो, कम्युनिस्टात जा!’; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हवाला देत प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांचा दावा

इमेज
वादग्रस्त : ‘अस्पृश्यांनो, कम्युनिस्टात जा!’; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हवाला देत प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांचा दावा 👉कोण म्हणतंय वेदांमध्ये तत्त्वज्ञान आहे?; महात्मा फुले आशिया खंडातले महान तत्त्वज्ञ … 👉उद्घाटनाला चातुर्वर्ण्याची उतरंड फोडून भरगच्च प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अधिवेशन उत्साहात औरंगाबाद : सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सावाचे उद्घाटन चातुर्वर्ण्याची उतरंड फोडून करण्यात आले. उद्घाटक डॉ. भारत पाटणकर चातुर्वर्ण्याच्या उतरंडीवर काठीने प्रहार करताना, सोबत उद्घाटन सत्राचे अध्यक्ष डॉ. जनार्दन वाघमारे, स्वागताध्यक्ष आमदार सतीश चव्हाण, मुख्य आयोजक के. ई. हरिदास, माजी न्या. डी. आर. शेळके आदी. (छायाचित्र : सपकाळ फोटो)

आपणास हे माहिती आहे का?; देशातला पहिला सहकारी साखर कारखाना सत्यशोधकांनी केला होता स्थापन

इमेज
  आपणास हे माहिती आहे का?; देशातला पहिला सहकारी साखर कारखाना सत्यशोधकांनी केला होता स्थापन -सत्यशोधक समाजाची दीडशे वर्ष; सत्यशोधक समाज व सहकार चळवळ माळीनगर : दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि. माळीनगर, हा देशातला पहिला सहकारी साखर कारखाना सत्यशोधकांनी स्थापन केला.

स्वतंत्र मराठवाडा राज्य!

इमेज
स्वतंत्र मराठवाडा राज्य! -मराठवाडा मुक्‍ती संग्रामवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यांचे फार मोठे उपकार-अ‍ॅड. भगवानराव देशपांडे -खरा इतिहास माहिती असता तर मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध झालाच नसता-प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे -प्रा. डॉ. सुधाकर नवसागर यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा’ या ग्रंथाचे थाटात प्रकाशन औरंगाबाद : प्रा. डॉ. सुधाकर नवसागर लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा’, या ग्रंथाचे प्रकाशन स्वातंत्र्य सेनानी अ‍ॅड. भगवानराव देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून लेखक प्रा. डॉ. सुधाकर नवसागर, प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर व प्रा. डॉ. मोहन सौंदर्य. भास्कर सरोदे, औरंगाबाद : मराठवाडा मुक्‍ती संग्रामाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे बळ मिळाले आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून अस्पृश्यांची ताकद मिळाली, हे योगदान मोलाचे आहे. म्हणून मराठवाडा मुक्‍ती संग्रामवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यांचे फार मोठे उपकार आहेत, असे ठोस प्रतिपादन अ‍ॅड. भगवानराव देशपांडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रनिष्ठेवर प्र...

अभियंत्याची नोकरी सोडून घराघरांत हत्ती नेणारा माणूस…

इमेज
  अभियंत्याची नोकरी सोडून घराघरांत हत्ती नेणारा माणूस… लातूरचे गौतम साबळे यांचे अँजिओप्लास्टीनंतर अर्ध्या तासात निधन भास्कर सरोदे, औरंगाबाद : बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आदरणीय गौतम साबळे यांचे आज दि. 16 सप्टेंबर, 2022 रोजी दुपारी 4.30 च्या सुमारास निधन झाले. लातुरातील सुप्रसिद्ध विवेकानंद हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अँजिओग्राफी होऊन अँजिओप्लास्टी झाली होती. अँजिओप्लास्टीनंतर केवळ अर्ध्या तासातच त्यांचे निधन झाल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. दरम्यान, अभियंत्याची नोकरी सोडून बहुजन समाज पार्टीचा हत्ती घराघरांत नेणारा सच्चा कार्यकर्ता अनपेक्षितपणे काळाच्या पडद्याआड गेल्याने बहुजन समाजाची मोठी हानी झाली आहे. बहुजन शासक सुरू केल्यानंतर 2007 साली गौतम साबळे यांची भेट झाली. अत्यंत अभ्यासू, विचाराने परिपक्‍व असणारे व्यक्‍तीमत्व. बहुजन चळवळीशी प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख. संघटन कौशल्यात त्यांचा हातखंडा. ‘होऊ शकत है’ याबाबत प्रचंड आशावादी. अलीकडील काळात बहुजन चळवळीची वाताहत पाहून कायम चिंतेत असायचे. अखेर या चिंतेनेच त्यांचा घात केला. गेल्या सात...

‘उदाहरणार्थ मंथन कांबळे’

इमेज
 ‘उदाहरणार्थ मंथन कांबळे’ नागपूरचा एक गरीब मुलगा मंथन. ज्याची आई 5 हजार रुपये महिन्यावर धुणी भांडी करायची. त्याला आयआयटी खरगपूरला प्रवेश मिळाला. आर्थिक समस्येवर मात करत कसे शिकायचे? हा त्याला प्रश्न पडला आणि त्याचवेळी ‘बानाई’ मदतीला आली. 5 वर्षात त्याला 4 लाख रुपयाची आर्थिक मदत झाली. मंथन आता नोकरीच्या पदार्पणातच जपानच्या एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्यावर काम करीत आहे. लाखोचे पॅकेज त्याने साईन केले आहे. 22 वर्षाच्या नागपूरच्या एका जिद्दी मुलाची कहाणी… आदर्शाच्या शोधात ‘आश्वासक’ लेखणी … आजच्या या सदराचा नायक आहे मंथन कांबळे. वास्तव्य इमामवाडा, नागपूर. ज्याचे वडील ठेकेदाराच्या हाताखाली लोखंड बांधणीचे काम करीत. 6 वीत असतानाच बाबांचे आकस्मिक निधन झाले. कुटुंबाची जबाबदारी आई छायावर आली. छायाताई कामाच्या शोधात घराबाहेर पडल्या. कष्टाशिवाय तिला पर्याय नव्हता. एका साहेबांच्या बंगल्यावर ती धुणी भांडी करू लागल्या.  त्यातून कुटुंबाच्या जेवणाची जेमतेम सोय झाली. गरजांची तोंडमिळवणी करताना तिची दमछाक व्हायची. कधीतर उपचारासाठी देखील पैसे नसायचे. मंथन जात्याच हुशार होता. नागपूरच्या प...

दुर्लक्षित घटोत्कच बुध्द लेणीचे ‘आम्ही मार्गदीप’

इमेज
 दुर्लक्षित घटोत्कच बुध्द लेणीचे ‘आम्ही मार्गदीप’ -सर जेम्स प्रिन्सेप यांची जयंती व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राबवली स्वच्छता मोहीम -भारतीय पुरातत्व विभाग दखल घेणार? घटोत्कच लेणी (जंजाळा) : जंजाळा गावाजवळ असलेल्या घटोत्कच बुद्ध लेणीचे विलोभनीय दृश्य पर्यटकांना खुणावत आहे.

राष्ट्रध्वज : अशोकाच्या कल्याणकारी राज्याची पुनर्स्थापना

इमेज
राष्ट्रध्वज : अशोकाच्या कल्याणकारी राज्याची पुनर्स्थापना राष्ट्र ध्वजातील अशोक चक्र हे भारताच्या प्राचीन संस्कृतीतील अनेक बाबींचे प्रतीक आहे, ज्यास अशोकाच्या नावामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सम्राट अशोक हा केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या इतिहासातही महत्त्वाचा आहे. आज भारत ज्या संघर्ष व असहिष्णुतेच्या वातावरणातून जात आहे, त्यावेळेला अशोकाचे नाव अधिकच महत्त्वाचे बनते. कारण प्राचीन काळात भारताने काही विशिष्ट मूल्यांना धारण केले होते. त्यामुळेच तो आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकला. भारत हे कधीही संकुचित राष्ट्र नव्हते, त्याने दुसर्‍या राष्ट्रांचा कधीही तिरस्कार केला नाही. अनेक उलथापालथी घडल्या मात्र भारत प्राचीन काळापासून काही मूलभूत मूल्यांवर ठामपणे उभा आहे. त्याची पायाभरणीच या मूल्यांवर झालेली आहे. भारताची खरी ताकद या मूल्यांमध्येच आहे. त्यात सर्वात महत्त्वपूर्ण जे मूल्य आहे, ते म्हणजे स्वीकारर्हता. कोणत्याही राष्ट्रासाठी त्याचा ध्वज व राजमुद्रा ही प्रतिके अत्यंत महत्त्वाची असतात. या प्रतिकांमधून त्याची अस्मिता व त्याने ज्या मूल्यांचा आणि ध्येयांचा अंगिकार केला आहे, त्याची प्रचिती येत अस...

राष्ट्रपती : किती नामधारी किती वास्तविक ?

इमेज
राष्ट्रपती : किती नामधारी किती वास्तविक ?                महाराष्ट्रात राजकीय नाट्य घडत असताना देशात राष्ट्रपती निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय नाट्यास राष्ट्रपती निवडणुकीचाही एक पदर आहे, हे चाणक्ष लोक जाणतातच. एनडीएकडे त्यांचा उमेदवार निवडून आणण्याइतपत पुरेसे (अंदाजे सहा लाख) मतमूल्य आहे. तर विरोधी पक्षांच्या मतमुल्याची बेरीज जवळपास 3 लाख 89 हजार इतकी आहे. निवडून येण्यासाठी 543216 मते हवी आहेत. विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा हे एनडीए पुरस्कृत उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्यापेक्षा अधिक मुरलेले व देशभरात विविध राजकीय पक्षांशी संबंध असलेले आहेत. पूर्वाश्रमी भाजपमध्ये असल्याने सिन्हांना भाजपमधूनही मतदान होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भाजप आपला उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. सिन्हांनी आपण ‘रबरी स्टॅम्प राष्ट्रपती’ होणार नाही आणि श्रीमती मुर्मुंनी सुद्धा तसे आश्वासन द्यावे, असे आव्हान केले आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाचे स्थान व भूमिका काय आहे? त्याबाबत घटनाकारांचा काय दृष्...