दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

 डॉ. नागनाथ कोत्तापल्‍ले अन् बहुजन शासकची पत्रकार परिषद
; एक आठवण
माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन 



भास्कर सरोदे, औरंगाबाद :

ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले (74 ) यांचे आज (30 नोव्हेंबर 2022) अल्पशा आजाराने निधन झाले. डॉ. कोत्तापल्ले यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचा नोकरीतील अनुशेष मोठ्या प्रमाणात शिल्लक होता. डॉ. कोत्तापल्ले यांनी कुलगुरू पदाचा पदभार (2005-10) हाती घेताच त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने अनुशेष भरला. अनेकांच्या जीवनातील अंधार दूर झाला. ही बाब जातीयवादी तथा सरंजामवृत्ती असणार्‍यांच्या डोळ्यात खुपली. त्यांनी विद्यापीठातील काही ‘सुपारीबाज’ विद्यार्थी संघटना आणि विद्यापीठात ठाण मांडून बसलेल्या राजकीय नेत्यांच्या माध्यमातून डॉ. कोत्तापल्ले यांना त्रास द्यायला सुरूवात केली. मागासवर्गीयांचा अनुशेष भरला म्हणून जातीयवाद्यांच्या अंगाचा अंगार झाला होता. आज तेच ‘आम्ही मागसवर्गीय’ आहोत म्हणून आंदोलन करत आहेत. हा दुटप्पी व्यवहार महाराष्ट्रात कायम आहे. विद्यापीठातील जातीयवादाचा मुकाबला डॉ. कोत्तापल्ले धीरोदात्तपणे करत होते. तरीही अडचणी वाढतच होत्या.

यांवर उपाय काय? अशी चर्चा चालू असताना मुंबईहून बहुजन शासकचे हितचिंतक आणि लेखक शुद्धोदन आहेर यांचा फोन आला की, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना होणार्‍या त्रासाच्या विरोधात आणि डॉ. कोत्तापल्ले यांनी भरलेल्या अनुशेषाच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेणे गरजेचे आहे. ती पत्रकार परिषद बहुजन शासकच्या वतीने मी घ्यावी, असा त्यांचा आग्रह होता. यांसाठी मुंबईहून प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एन. एस. यादव हे पत्रकार परिषदेला संबोधित करणार होते. मी होकार दिला. शहरातील कार्तिकी हॉटेलच्या हॉलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेला नेहमीप्रमाणे तीन-चार जणांचा अपवाद सोडला तर मनुवादी मीडियाने पाठ फिरवली होती. तरीही कोतापल्ले सरांनी जोरदार बॅटींग केली. सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन सर्वसमावेशक असे पत्रकदेखील सर्वांना दिले. या पत्रकार परिषदेचा परिणाम असा झाला की, कारकीर्दीतील शेवटचे दीड वर्षे डॉ. कोत्तापल्ले यांचे जातीय त्रासाविना गेले ! बहुजन शासकची कार्यप्रणाली, प्रामाणिकपणा व मुंबईचे पाहुणे यांचा तो सामाईक परिणाम होता, असे वाटते. तोपर्यंत विद्यापीठातील जातीयवाद्यांच्या विरोधात ‘ब्र’ काढण्याचे कुणी धाडस करत नव्हते. ते धाडस बहुजन शासकने केले. अन्यायाच्या विरोधात लढण्याचे बहुजन शासक कायम धाडस करत आहे.

त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कधी भेटलो नाही, ही रूखरूख माझ्या मनात कायम राहील. फोनवरून अधूनमधून बोलत असू. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020’वर समीक्षात्मक लेख लिहिण्यासंबंधी सरांना मी विनंती केली होती. मात्र, डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यामुळे मला शक्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. नंतर त्यांनी ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 : भारतीयांच्या गुलामीचा जाहीरनामा’ हा ग्रंथ मी आणि डॉ. प्रभाकर गायकवाड संपादित तथा औरंगाबाद येथील जीवक प्रकाशनने प्रकाशित केलेला ग्रंथ सरांनी मागवून घेतला होता. सरांचे आपल्यातून असे अचानक जाण्याने ही आठवण ताजी झाली एवढेच. 

डॉ. कोत्तापल्ले यांचे कार्य आणि साहित्य समाजाला सतत प्रेरणा देत राहील. शिवाय कुलगुरू कसा असावा, याची अमीट छाप ते सोडून गेले आहेत. त्यांचा आदर्श इतर कुलगुरूंनी घेतला तर शिक्षणातील अनागोंदी दूर होईल, असा विश्वास वाटतो. परिवर्तनाच्या लढ्यातील साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य नेहमीच आठवणीत राहील, या भावनांसह सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. कोत्तापल्ले कुटुंबीय या दु:खातून लवकर सावरावे म्हणून मंगलकामना.

डॉ. कोत्तापल्‍ले यांचा कालपट :

साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मय प्रकारांत दर्जेदार वाङ्मय निर्मिती करणारे डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म 29 मार्च 1948 रोजी मुखेड (जि. नांदेड) या गावी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. बी.ए. आणि एम.ए. या दोन्ही परीक्षांत मराठवाडा विद्यापीठात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. ते कुलपतींच्या सुवर्णपदकाने सन्मानित झाले होते. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी 1980 साली पीएच.डी. पदवी संपादन केली. बीड येथील महाविद्यालयात 1971 ते 1977 या काळात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी अधिव्याख्याता आणि प्रपाठक या पदांवर 1977 ते 1996 या काळात काम केले.

1996 ते 2005 या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले. 2005 सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (1988-1989), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. श्रीगोंदा येथे 1999 साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि 2005 साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चिपळूण येथे 2012 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची साहित्यसंपदा :

‘मूड्स’ (कवितासंग्रह), ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’, ‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ (कथासंग्रह), ‘राजधानी’(दीर्घकथा संग्रह), ‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’(कादंबरी), ‘पापुद्रे’, ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि बोध’, ‘नवकथाकार शंकर पाटील’, ‘साहित्याचा अन्वयार्थ’, ‘मराठी कविता : एक दृष्टिक्षेप’, ‘साहित्याचा अवकाश’ (समीक्षात्मक), ‘गावात फुले चांदणे’ (प्रौढ नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी), ‘मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष’, ‘उद्याच्या सुंदर दिवसासाठी’ (ललित गद्य), ‘जोतीपर्व’ (अनुवादित ग्रंथ), ‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘शेतकर्‍यांचा असूड’, ‘पाचोळा आणि दहा समीक्षक’, ‘निवडक बी रघुनाथ’ (संपादन).

नागनाथ कोत्तापल्ले यांना मिळालेले पुरस्कार:

पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेले ग्रंथ असे

मूड्स (1976), संदर्भ (1984), गांधारीचे डोळे (1985), ग्रामीण साहित्य (1985), उद्याच्या सुंदर दिवसासाठी (2002). ‘ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध’साठी परिमल पुरस्कार (1985). ‘ज्योतिपर्व’साठी केशवराव विचारे पारितोषिक (2002). दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (2018). यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (2001). ‘राख आणि पाऊस’साठी बी. रघुनाथ पुरस्कार (1995). ‘राख आणि पाऊस’साठी महात्मा फुले पुरस्कार (1995). ‘साहित्य अवकाश’साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार.

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?