दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

भुजबळांचे काय चुकले?; विद्येची देवता हारिती, सरस्वती नव्हे!

 भुजबळांचे काय चुकले?; विद्येची देवता हारिती, सरस्वती नव्हे!



औरंगाबाद :

मुंबईत महात्मा फुले समता परिषद आयोजित सत्यशोधकांचा सत्कार समारंभ सोमवार, दि. 26 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत सरस्वतीची पूजा कशासाठी, त्याऐवजी महापुरुषांचे फोटो लावा, असा रोकडा सवाल ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला. त्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठवली जात असून त्यांच्या राजीनाम्यापासून ते त्यांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, शिवाय त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. खरं पाहिलं तर भुजबळांचे काय चुकले? त्यांनी मानवी चेतनेला चुचकारले आहे. यानिमित्ताने ब्राह्मणी छावणीच्या लबाडीलाच आव्हान दिले आहे. विद्येची देवता कोण? हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. बहुजन शासकचे मानद संपादक नितीन सावंत यांचे विशेष संपादकीय (30 सप्टेंबर 2022) बरेच बोलके असून या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यास मदतगार ठरू शकेल, इतके ते आश्‍वासक आहे.  

भुजबळ नेमकं काय म्हणाले? :

आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. शाळेमध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावला पाहिजे. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं, तर त्यांची पूजा कशासाठी करायची? असा रोखठोक सवाल छगन भुजबळ यांनी केला.

विशेष संपादकीय (बहुजन शासक, 30 सप्टेंबर 2022)

अब्राम्हणी परंपरेत रात्र हे विचार विनिमयाचे, डिबेटचे, औषधी कुटण्याचे वा तयार करण्याचे, रसविद्येचे थोडक्यात संस्कृती आणि आध्यात्मवादाचे केंद्र. मातृसत्तेत, स्त्रीसत्तेत हे सर्व रात्री चाले. म्हणून दिवटी, दीपमाळा यांना स्त्रीवादी सणवार उत्सवांत फार महत्व आहे. या कारणाने नवरात्रोत्सवात आजही आराधी, जोगती, गोंधळी रात्रभर जागरण करतात, गाणी म्हणतात, लोककथांचे कथन करतात. पितृसत्ताक पुरुषवर्चस्ववादी परंपरांनी नंतर उलटा सूड घेताना रात्र अशुभ मानली. अमावस्या अशुभ मानली. तसा प्रचार केला. म्हणून ब्राम्हणी व्यवस्थेचे विधी दिवसा होतात. त्यांच्या दृष्टीने दिवस शुभ तर तांत्रिक-मांत्रिक विधी रात्री होतात. अब्राम्हणी परंपरेत रात्र शुभ, काळा रंग शुभ. दक्षिण भारतीय संस्कृती काळ्या रंगाची द्रविडांची. या भागाची सर्वाधिक जुनी गणराज्ञी हारिती होय.

हरिती, श्रीशैलच्या स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेची गणमुख्या. कृष्णा नदीच्या खोर्‍यातील निर्ऋतीच्या परंपरेतील वैराज्याची ती राष्ट्री होती. भारतात फळे भाज्यांच्या शोधापासून ते मानवी मनाच्या आवस्थांपर्यंत, चमड्याच्या रोगांपासून शस्त्रक्रियांपर्यंत संशोधनाचे काम या श्रीशैल्यच्या स्त्रीराज्यात उभारीस आले होते. पुढे विविध क्षेत्रात तरबेज, निष्णात 64 योगीनी आणि 84 सिद्ध परंपरा या हारितीच्या स्त्रीराज्याच्या श्रीपर्वताच्या छायेतून उदयाली आली. हे स्त्रीराज्य एकेकाळी वैचारिक आणि तत्त्वज्ञानात्मक बाबतीत अतिउच्च आणि एक आगळावेगळा दबदबा ठेवून होते. म्हणून भारतीतील कुठल्याही तत्त्वज्ञाला आपल्या ज्ञानाची खोली तपासायची असेल तर तो अंतिम डिबेटसाठी या हारितीच्या स्त्रीराज्यात येत असे. येथे अनेक विचारवंत महिनोंमहिने किंवा कित्त्येक वर्षे महाडिबेट करत असत. हे हारितीचे स्त्रीराज्य दक्षिण भारतातील कृष्णा नदीच्या खोर्‍यातील द्रविडांची गणभूमी. वसुबंधू, दिग्नाग या महायानी स्कूलच्या तत्त्वज्ञानी, विचारवंतांनी मांडलेला द्वैती मनाचा सिध्दांत याच स्त्रीराज्याची देन आहे. मानवी मन द्वैती असते, हा शोध हारितीच्या स्त्रीराज्याचा. या हारितीच्या श्रीशैलमच्या स्त्रीराज्यात अनेक बौद्ध आचार्य डिबेटसाठी येत असत. शून्यवादाचे जनक नागार्जुन सुद्धा कित्त्येक वर्षे या परिसरातील पर्वतावर ज्ञानार्जन करत होते. म्हणून हारितीची मूर्ती नालंदा विद्यापीठाच्या समोर होती, हे चिनी प्रवाशांनी आपल्या नोंदीत नोंदवून ठेवले आहे. नालंदा विद्यापीठ हारितीला ज्ञानाचे प्रतीक मानत असल्याचे निदर्शनास येते. चक्रधरस्वामी तर 12 वर्षे येथे राहून गेलेले आहेत. याबद्दल रा.चिं. ढेरे यांनी ‘श्रीपर्वताच्या छायेत’ या ग्रंथात मांडणी केलेली आहे. स्त्रीराज्यातील विचार पुढील काळात चक्रधर स्वामी उजागर सांगत असत. मासिक पाळी वाईट नसते हा त्यातलाच एक विचार. जसा माणसाला शेंबुड तसी मासिक पाळी हे जाहिररित्या चक्रधर स्वामींनी सांगितलेले आहे. श्रीशैलच्या योगिनी मुक्ताबाई यांच्या शिष्यपरंपरेची एक शाखा विसोबा खेचरांच्याद्वारे संत नामदेवांपर्यंत येते. आयुष्यात एकदातरी श्रीशैलमला जावून मनाचा बळी देईल, असे संत नामदेव आपल्या अभंगात म्हटलेले आहेत. नाथ सांप्रदायाचे संस्थापक मच्छिंद्रनाथ या स्त्रीराज्यात कित्त्येक वर्षे राहिले. पुढे गोरक्षनाथ त्यांना भेटायला आल्यानंतर दोघांनी भारतभर नाथ सांप्रदाय वाढवला. म्हणजे नाथ आणि वारकर्‍यांची एक शाखा हारितीच्या स्त्रीराज्याचा जीवनरस घेऊन विकास पावत होती. लिंगायत धर्माच्या अनुभव मंड्डपचे पहिले आचार्य अलामप्रभु आणि दुसर्‍या आचार्या अक्कमहादेवी हे दोघेही श्रीशैलमचे होते. त्यांच्या समाधी तिथेच कर्दळीच्या बनात आहेत. हारितीच्या स्त्रीराज्यातून लिंगायत धर्माला दोन महान आचार्य मिळाले. म्हणजे नाथ, वारकरी, लिंगायत, महानुभाव यांचा श्रीशैलमच्या स्त्रीराज्याशी थेट संबंध आहे. याच स्त्रीराज्याने हे समतेचे, जातीअंताचे भक्ती सांप्रदाय जन्माला घातले. कालिदास हा ब्राम्हणी छावणीचा कवी मेघदुताला निरोप देताना म्हणतो, दक्षिणेत गेल्यानंतर तुला स्त्रीराज्य लागेल, तिथे क्षणभरही थांबु नकोस, पुढे जा! म्हणजे ब्राम्हणी छावणीला हे समतेचे तत्त्वज्ञान निर्माण करणारे स्त्रीराज्य डोळ्यात खुपत होते. याच स्त्रीराज्यातून कालिदासाला पराभूत करणारे तत्त्वज्ञ जन्माला आलेले होते. 14 विद्या आणि 64 कलांत एकापेक्षा एक निष्णात स्त्री पुरुष या स्त्रीराज्याने दिलेत. तरीही ब्राम्हणी व्यवस्थेने तिला लेकरे पळवून नेणारी राक्षसी वगैरे म्हणून रंगवले आहे. तिचे दुष्ट नेनीवेकरण केलेले आहे. येथे मृत शरीरांवर प्रयोग केले जात. रसविद्या, औषधोपचार शिकविले जात. खाण्यासाठी लागणार्‍या नव्या भाज्यांचा शोध लावला जाई. नालंदा विद्यापीठाच्या समोर हारितीची भव्य मूर्ती होती आणि तिची पूजा करून विद्यापीठ सुरू होई, असे चिनी प्रवासी फाइहान नोंदवून ठेवतो. म्हणजे ज्ञान परंपरेची जननी हारिती आहे, सरस्वती नव्हे. हा ढोबळमानाने हारितीची मुलगी हरिती, जी वैय्याकरण होती, तिच्या स्त्रीराज्याचा आढावा! वैचारिक आढावा. तिचा कुलपट, वाढत गेलेला गण, त्याचा विस्तार हे अजून उकल व्हायचे बाकी आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, ब्राह्मणी छावणीने हारितीला राक्षसी ठरवून सरस्वती आमच्यावर लादली. जिचा आणि आमच्या शिक्षणाशी तसूभरही संबंध नाही. म्हणून शिक्षणाची देवता असलीच तर ती केवळ हारिती असली पाहिजे, याबाबत संशोधन होणे गरजेचे आहे.  

नितीन सावंत, परभणी 

9970744142


(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?