दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

अभियंत्याची नोकरी सोडून घराघरांत हत्ती नेणारा माणूस…

 अभियंत्याची नोकरी सोडून घराघरांत हत्ती नेणारा माणूस…

लातूरचे गौतम साबळे यांचे अँजिओप्लास्टीनंतर अर्ध्या तासात निधन



भास्कर सरोदे, औरंगाबाद :

बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आदरणीय गौतम साबळे यांचे आज दि. 16 सप्टेंबर, 2022 रोजी दुपारी 4.30 च्या सुमारास निधन झाले. लातुरातील सुप्रसिद्ध विवेकानंद हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अँजिओग्राफी होऊन अँजिओप्लास्टी झाली होती. अँजिओप्लास्टीनंतर केवळ अर्ध्या तासातच त्यांचे निधन झाल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. दरम्यान, अभियंत्याची नोकरी सोडून बहुजन समाज पार्टीचा हत्ती घराघरांत नेणारा सच्चा कार्यकर्ता अनपेक्षितपणे काळाच्या पडद्याआड गेल्याने बहुजन समाजाची मोठी हानी झाली आहे.

बहुजन शासक सुरू केल्यानंतर 2007 साली गौतम साबळे यांची भेट झाली. अत्यंत अभ्यासू, विचाराने परिपक्‍व असणारे व्यक्‍तीमत्व. बहुजन चळवळीशी प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख. संघटन कौशल्यात त्यांचा हातखंडा. ‘होऊ शकत है’ याबाबत प्रचंड आशावादी. अलीकडील काळात बहुजन चळवळीची वाताहत पाहून कायम चिंतेत असायचे. अखेर या चिंतेनेच त्यांचा घात केला. गेल्या सात-आठ वर्षांपासून त्यांना अधून-मधून र्‍हदयाचा आणि शुगरचा त्रास जाणवायचा. फार काही सिरियस नव्हते. त्यामुळे नियमित कामकाज सुरू होते. या आठवड्यात र्‍हदयाचा त्रास जाणवला म्हणून युनिक हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केले. काळजीचे कारण नाही, पण एकदा अँजिओग्राफी करून घेतलेली बरी, असा डॉक्टरांनी सल्‍ला दिला. डॉक्टरच्या सल्ल्यानंतर कुटुंबीयांनी त्यासाठी तगादा लावला होता. डॉक्टर आणि घरच्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आज ते शहरातील सुप्रसिद्ध विवेकानंद हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. मात्र, अँजिओग्राफीनंतर अँजिओप्लास्टी झाली आणि अवघ्या अर्ध्या तासातच त्यांचे निधन झाले. नेमके कशाने निधन झाले, हे समजू शकले नाही. मात्र, घातपात तर नाही ना, अशी शंका घेतली जात आहे!

80 च्या दशकात मान्यवर कांशीरामजीच्या रूपाने बहुजन नायक भारतीय राजकारणाच्या पटलावर उठून दिसू लागला. फुले-शाहू-आंबेडकरांचा समतावादी विचार घेऊन ‘वोट हमारा, राज तुम्हारा…नही चलेंगा, नही चलेंगा’, ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागिदारी’, या घोषणांनी भारतातील बहुजन तरुणांत एक चेतना निर्माण झाली होती. गौतम साबळे नुकतेच एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. मान्यवर कांशीराम यांची बहुजन चळवळ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करू शकते, असा दुर्दम्य आशावाद पाहून गौतम साबळे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. लातूर जिल्ह्यात त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. प्रोजेक्ट कन्सल्टंट म्हणून काम करताना घराचा गाडा चालवला. उपाशी-तापाशी राहून बहुजन चळवळीची बांधणी केली. लातूर जिल्ह्यातील घराघरांत बहुजन समाज पार्टीचा हत्ती नेण्याचे श्रेय गौतम साबळे यांना दिले पाहिजे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी हत्तीचे बळ दिले. स्वाभिमान आणि स्वावलंबनाचे धडे देत चळवळ रूजविली. लातूर जिल्ह्यात बलाढ्य काँग्रेसपुढे बसपाने तगडे आव्हान उभे केले, हे विसरून चालणार नाही. केडरबेस आणि मिशनरी कार्यकर्ता म्हणून समाजात त्यांना आदर होता. त्यांच्या अचानक जाण्याने बहुजन चळवळीचा पाया खचला आहे.

मान्यवर कांशीराम यांच्या निधनानंतर बहुजन चळवळीला उतरती कळा लागली. अशा काळातही गौतम साबळे खचलेल्या कार्यकर्त्यांना धीर देत भक्‍कमपणे उभे राहिले. देश आणि राज्यातील गतिविधीवर त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. आम्ही तास्नतास चळवळीला उभारी कशी आणता येईल, यावर विचारमंथन करत असत. मधल्या काळात अनेकजण स्वार्थांध होऊन काँग्रेस-भाजपा-आरएसएसमध्ये गेले. मात्र, असा विचार गौतम साबळे यांच्या मनालाही कधी शिवला नाही. स्वत: उभं रहात, चळवळीला मोठं करायचं या ध्येयाने त्यांना पछाडले होते. म्हणूनच महत्प्रयासाने पेट्रोल पंप सुरू केला होता.  अर्थात कर्जबाजारी होऊनच त्यांनी तो उभारला. कर्जबाजारीपणातून बाहेर येण्यासाठी ते धडपडत होते. त्याबरोबरच बहुजन चळवळ गतिमान करण्यासाठी तळमळत होते. कायम पडद्यामागे राहून काम करणारे गौतम साबळे यांनी अलीकडे बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिवपद स्वीकारून कामाला नव्या दमाने सुरूवात केली होती. पार्टीचे काम करता करता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बहुजन चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा निष्ठावान कार्यकर्त्याला जयभीम!

मी त्यांच्या फोनचीच वाट पाहत होतो, पण...

काल रात्री 8 वाजता त्यांचा फोन आला. हा रुटीन कॉल आहे, तुमच्याशी बोलण्याने मन हलके होते. घरच्यांच्या समाधानासाठी अँजिओग्राफी करून घेतो. अँजिओग्राफीनंतर फोन करतो, असे ते रात्री बोलले. मात्र, हेच त्यांचे शेवटचे शब्द ठरतील असे वाटले नव्हते. मी आज त्यांच्या फोनची वाटच पाहत होतो. मात्र, दुपारी 4 च्या सुमारास त्यांच्या मेव्हुण्याचा फोन आला की, गौतम साबळे यांची तब्येत अचानक खालावली. थोड्यावेळाने गौतम साबळे यांच्या निधनाचे वृत्त आले. खूप चांगला माणूस गेला. बहुजन समाज पार्टीची लातूर जिल्ह्यात त्यांनीच बांधणी केली. योग्य संघटक मी त्यांच्या रूपाने पाहिला आहे. आम्ही सोबत काम केले आहे. 2007 ला बहुजन शासक घेऊन मी आणि अनिल माने लातूर जिल्ह्यात फिरत होतो. तेव्हा घराघरातून गौतम साबळे यांचेच नाव घेतले जात होते. तेव्हा त्यांच्या संघटन कौशल्याची परिचिती आली. तळागळात जाऊन काम करणारा, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारा कार्यकर्ता बहुजन समाजाने गमावाला, याचे फार दु:ख वाटते.

-महेश सिरसीकर, औरंगाबाद


(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?