पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

लोकशाहीचा विजय असो...

इमेज
लोकशाहीचा विजय असो... भास्कर सरोदे, छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणूक मतदानाला तीन-चार दिवस बाकी... पाचवेळा निवडणूक जिंकलेला आणि सहाव्यांदा निवडणुकीला उभा राहिलेला ‘पाटील’ उबदार गालिच्च्यावर लोळत पडलेला होता. गेल्या वर्षभरापासून एक पाय घरात, तर एक पाय दारात आणि सदा चिंतातूर असलेले कारभारी असे बेफिकीर लोळताना पाहून पाटलीण आचंबित होऊन कोड्यात पडली की,  ‘यासणी इतकी सवड कशी मिळाली म्हणायची!’ कासराभर दिवस डोक्यावर आला तरी कारभारी काही उठेना म्हणून पाटलीणने हटकले,  ‘अहो, तुम्हासणी झोप कशी काय येतीया म्हणायची? मतदानाला मोजून चार दिस राहिल्यात अन् तुम्ही बिनघोर लोळत्यात, हे काही समजत नाही बघा!’ ‘अहो, आम्ही आहोत म्हणलं! अशानं कसं चालायचं? कार्यकर्ते, पाठीराखे, समर्थक, तुमच्या आशीर्वादाने नुकतेच पक्षात आलेल उपरे, तुमची वाट पाहाताहेत म्हणलं.’ झोपेचं सोंग घेतलेला पाटील काही हूं का चूं करेना. (पाटलीण मनातल्या मनात ‘रातभर ढोसल्याली दिसतीया... अजून उतरलीच नाही की काय?’ असे म्हणून वाड्याबाहेर डोकावून पाहातात, तर काय सगळे कार्यकर्ते ताटकळलेले, पाटलाच्या आदेशाची वाट पाहात रेंगाळलेले, तर काही...

मराठवाडा मुक्‍ती दिन विशेष : स्वतंत्र मराठवाड्यात सुटेल मराठा आरक्षणाचा तिढा!

इमेज
  मराठवाडा मुक्‍ती दिन विशेष :  स्वतंत्र मराठवाड्यात सुटेल मराठा आरक्षणाचा तिढा! भास्कर सरोदे, छत्रपती संभाजीनगर : स्वतंत्र मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने देशाचे महामहीम राष्ट्रपती द्रोपती मूर्मू व राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे ‘स्वतंत्र मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्रा’ची मागणी केली आहे. मराठवाड्याच्या मागासलेपणाला राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांना जबाबदार धरण्यात येऊन देशाच्या समतोल विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्राची निकड स्पष्ट करताना स्वतंत्र राज्याची मागणी तीव्र केली आहे.  दरम्यान, आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी मराठा समाजाने मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा आग्रह धरावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या निवेदनावर भास्कर सरोदे, प्रा. डॉ. राजेंद्र शेजुळ, बाळासाहेब पवार, दुष्यंत आठवले, प्रा. डॉ. माणिक राठोड, इंजि. भीमसेन कांबळे, प्रा. डॉ. धम्मानंद गायकवाड यांच्या स्वाक्षरी आहेत. या निवेदनाची प्रतिलिपी प्रधानमंत्री, विरोधी पक्ष नेता (केंद्र व राज्य), गृहमंत्री (केंद्र व राज्य) व जिल्हाधिक...

माणूस फसगतीचा शिकार!

इमेज
  माणूस फसगतीचा शिकार! -शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे व्याख्यानमाला : उद्घाटन प्रसंगी ज्ञानेश महाराव यांचे उद‍्गार छत्रपती संभाजीनगर : ‘उठावा महाराष्ट्र देश’ या विषयावर मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, विचारमंचावर उपासिका विठाबाई माधवराव बोरडे, शिवव्याख्याते प्रदीप सोळुंके व उपासक मिलिंद दाभाडे. भास्कर सरोदे, छत्रपती संभाजीनगर : ज्ञान-विज्ञानाचा अभाव, समृद्ध संत परंपरेचा विसर, धर्म आणि जातीच्या फेर्‍यातून बाहेर काढण्यासाठी ‘उठावा महाराष्ट्र देश’ आहे. संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या विचारांनीच माणूस पुढे जाईल. धर्मग्रंथ, पोथ्या, पुराणं  यांनी आमची फसवणूक केली आहे. मात्र, या सगळ्यांची तपासणी वा चिकित्सा करणारे एकमेव संविधान आहे. वेगवेगळ्या माध्यमातून माणसाची फसगत झालीय. त्यातून बाहेर पडण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची कास धरा, असे उद‍्गार ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी काढले. शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे पहिल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवव्याख्याते...

तिमिरातूनी तेजाकडे...: सागरवाडी चाले विदेशाची वाट!

इमेज
तिमिरातूनी तेजाकडे...: सागरवाडी चाले विदेशाची वाट! ग्राऊंड रिपोर्ट, भास्कर सरोदे छत्रपती संभाजीनगर : येथून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर बदनापूरच्या उत्तरेला 10 किलोमीटर अंतरावर जवळपास 500 उंबर्‍याची वाडी. नाव सागरवाडी. नावाचा इतिहास सापडत नाही. सापडणार तरी कसा? वाडीच ती. आजुबाजूचा परिसर डोंगरदर्‍यांनी वेढलेला. सरकार पातळीवर उपेक्षा. मात्र, 1959 ला शिक्षणाची वात पेटली अन् तिच्या ज्योतीने या वाडीचा इतिहास-भूगोल बदलला. सातासमुद्रापार या वाडीचा डंका वाजायला लागला. दुसर्‍या-तिसर्‍या पिढीतील तरुण-तरुणी जगाच्या कॅनव्हासवर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. छोट्याशा वाडीतून शेकड्याने नोकरदार आणि तब्बल आठजण विदेशात आहेत. हे देशातील दुर्मीळ उदाहरण असले पाहिजे! त्यातील एकजणाने तर युनोपर्यंत धडक दिलीय. तिमिरातूनी तेजाकडे निघालेली सागरवाडी शैक्षणिक क्रांतीला जन्म देऊन उजेडात आली. ‘विदेशात विसावलेली सागरवाडी’ या नावानेही सागरवाडी ओळखली जाईल! अशा या जगात उठून दिसणार्‍या वाडीला कुतूहलापोटी भेट दिली. त्याचाच हा ग्राऊंड रिपोर्ट! निवृत्त पोलीस उपअधीक्षक वामनराव खरात यांच्या आत्मचरित्राच्या अनुषंगाने स...

75 वर्षांत संवैधानिक पुरेशा प्रतिनिधीत्वाला कोलदांडा!

इमेज
  75 वर्षांत संवैधानिक पुरेशा प्रतिनिधीत्वाला कोलदांडा! -अंशत: नोकर्‍यांवर बोळवण : शासकीय आस्थापना सेवा तसेच शासनाच्या अधिन सर्व सेवा क्षेत्रांत आरक्षण धोरणानुसार अंमलबजावणी करण्याची अनुसूचित जाती-जमाती हितकारणी सभेची मागणी छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्‍तांना निवेदन सादर करते प्रसंगी डावीकडून किशोर मस्के, अनंत खोब्रागडे, अ‍ॅड. आतीश दासूद, हेमंत खोतकर, विलास कटारे, इंजि. भीमसेन कांबळे, भास्कर सरोदे, एकनाथराव त्रिभुवन, राज चौथमल, सिद्धार्थ पवार, निकाळजे उपस्थित होते.

स्वतंत्र मध्य महाराष्ट्र मागणीला जोर

इमेज
  स्वतंत्र मध्य महाराष्ट्र मागणीला जोर स्वतंत्र मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्र संघर्ष समितीचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे छत्रपती संभाजीनगर : स्वतंत्र मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्राच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी विनोद रुखमाबाई गोंडूराव खिरोळकर यांनी स्वीकारले. यावेळी भास्कर सरोदे, प्रा. डॉ. राजेंद्र शेजूळ, प्रा. डॉ. माणिक राठोड, प्रा. डॉ. धम्मानंद गायकवाड, इंजि. भीमसेन कांबळे, बाबासाहेब पवार यांचा शिष्टमंडळात समावेश होता. छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा सर्वच क्षेत्रात मागासलेला आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योगाबाबत परिस्थिती सोचनिय आहे. मानव विकास निर्देशांकात मराठवाड्याचे आठही जिल्हे मागास दर्शविले आहेत. मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी ‘मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्र’ राज्य निर्माण करावे, असे स्वतंत्र मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्र संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी विनोद रुखमाबाई गोंडूराव खिरोळकर यांनी निवेद...

‘बिनधास्त’ आणि ‘स्थितप्रज्ञ’ अभियंत्यांचा सेवापूर्ती कार्यगौरव

इमेज
‘बिनधास्त’ आणि ‘स्थितप्रज्ञ’ अभियंत्यांचा सेवापूर्ती कार्यगौरव कुशल कर्मामुळे होतो यशाचा मार्ग प्रशस्त- झाल्टे छत्रपती संभाजीनगर :  महापारेषणचे निवृत्त कार्य संचालक रोहिदास मस्के यांचा सेवागौरव करताना जे. एस. पाटील, सोबत रोहिदास मस्के यांच्या सहचारिणी प्रा. कुसूम मस्के व भुजंग खंदारे आदी. छत्रपती संभाजीनगर : अभियंत्यांनी आपल्या कामाचा परीघ वाढवला पाहिजे. सेवा कार्यकाळात एकदा तरी कठीण ठिकाणी काम केले पाहिजे. माणसांची कुशल कर्म यशाचा मार्ग प्रशस्त करतात. आज ज्या दोन अभियंत्यांचा सेवापूर्ती कार्यगौरव होत आहे, त्यांचे कुशल कर्म प्रबळ होते म्हणूनच ते आव्हानात्मक जबाबदार्‍या पार पाडू शकले, असे गौरवोद्वार निवृत्त संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी तथा माजी ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख सल्‍लागार उत्तमराव झाल्टे यांनी काढले. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन आणि बॅकवर्ड क्लास सिनिअर इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित महापारेषणचे निवृत्त कार्य संचालक रोहिदास मस्के व महापारेषणचे निवृत्त अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे यांच्या सेवापूर...

संविधान, गांधी आणि हरिजन!

इमेज
 संविधान, गांधी आणि हरिजन! भास्कर सरोदे : विशेष संपादकीय (बहुजन शासक, दि. 7 जून 2024) : 18 वी लोकसभा निवडणूक भारतीय संविधानाला मध्यभागी ठेऊन लढल्या गेली. ‘संविधान बदलणार?’ आणि ‘संविधान बचाव’ हे दोन शब्द केंद्रस्थानी होते. प्रामुख्याने ‘इंडिया’ आणि ‘एनडीए’ या दोन आघाड्यांमध्ये लढत होईल याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. एकाधिकारशाही वा द्विपक्षीय पद्धती हे भारतीय लोकशाहीविरोधी कृत्य लोकांच्या लक्षात येणार नाही, इतक्या कुशलतेने हाताळण्यात आले. केंद्रात राष्ट्रीय स्वयं सेवक संघप्रणित भाजपची सत्ता आल्यापासून संविधानाच्या विरोधात जाहीरपणे जाणीवपूर्वक बोलले गेले. दिल्‍लीत संविधान जाळले, संविधान बदलण्याची भाषा करण्यात आली, मोदी सरकारचे तर हरएक पाऊल संविधानविरोधी असताना फारसा आवाज उठला नाही. जसजशी सार्वत्रिक निवडणूक जवळजवळ येत गेली तसतशी संविधानाच्या समर्थनार्थ मतं प्रदर्शित होऊ लागली. ‘निर्भय बनो’ ते ‘संविधान बचाव’चा पुकारा करण्यात आला. अत्यंत सुनियोजितपणे समाजमन घडविण्यासाठी बुद्धिजिवी, वकील, प्राध्यापक, तथाकथित विचारवंत, साहित्यिक, डॉक्टर सरसावले. संविधान विरोधकांनीही ‘पुन्हा सत्तेत आलो तर...

जनतेवर करांचा भार : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगवर कोट्यवधींची उधळपट्टी

इमेज
  जनतेवर करांचा भार : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगवर कोट्यवधींची उधळपट्टी भास्कर सरोदे : छत्रपती संभाजीनगर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसर्‍या प्री-वेडिंग सोहळ्याला थाटात सुरुवात झाली आहे. लक्झरी क्रूझ ‘सेलिब्रिटी असेंट’ या तरंगते रिसॉर्टमधून इटली ते फ्रान्स असा तीन दिवसांचा ‘न भूतो न भविष्यती’ प्रवास सुमारे 800 पाहुणे करताहेत. भारतीय म्हणून या सोहळ्याचा आनंद आहेच! मात्र, देशात प्रचंड बेरोजगारी, कुपोषण, दारिद्र्य, भूकमारी असताना जनतेच्या करातून सरकारने पोसलेल्या उद्योगपतीने अशी कोट्यवधींची पाण्यात उधळपट्टी करावी का, हा संवेदनशील माणसाला पडलेला प्रश्‍न आहे. पहिल्या प्री-वेडिंगवर खर्चले 1250 कोटी! : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्‍न जुलैमध्ये आहे. यापूर्वी पहिली प्री-वेडिंग सेरेमनी जामनगर येथील रिलायन्स कंपनीच्या अ‍ॅनिमल रेस्क्यू सेंटर ‘वनतारा’ येथे उत्साहात पार पडली. यासाठी सुमारे 1250 कोटी रुपये खर्च आल्याचे बोलले जाते आहे.  5-स्टार तरंगत्या रिसॉर्टमधून प्रवास : दुसरी प्री-वेडिंग सेरेमनी 28 ते 30 मे दरम्या...

पोर्शे कार अपघात आणि राज्यसंस्था

इमेज
 पोर्शे कार अपघात आणि राज्यसंस्था पुणे : कल्याणनगरी येथे मोटारसायकलवर जाणार्‍या दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांना पाठीमागून येऊन धडक देणारी हीच ती पोर्शे तायकन कार. एका बिल्डरच्या 17 वर्षी मुलाने बेधुंद चालवून या दोन अभियंत्यांचा बळी घेतला.

रीडर ते रियासतकार : गो. स. सरदेसांईंचा लेखन प्रवास...

इमेज
 रीडर ते रियासतकार :  गो.  स.  सरदेसांईंचा लेखन प्रवास... -राजाराम सूर्यवंशी आज दि. 17 मे 2024 रोजी सुप्रसिद्ध इतिहासकार, लेखक, विद्वान गोविंद सखाराम सरदेसाई यांची 159 वी जन्मतिथी आहे. तथापि, महाराष्ट्रात ती कोठेही साजरी केली जात नाही. जाणार नाही. कारण राजे-रजवाडे आणि राजकारणी यांच्याशिवायही काही कर्तृत्ववान माणसेही इतर क्षेत्रात व विशेषतः ज्ञानाच्या क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रात होऊन गेलेत हे आम्हाला शिकवले जात नाही. त्यात लेखक व इतिहासकार हे दुर्लक्षांचे विषय आहेत. कारण ज्ञान व विद्येची उपासनाच आपल्याकडे केली जात नाही. पर्यायाने लेखक, विचारवंत यांना मानाचे स्थान दिले जात नाही. पैसा कमवतो तो मोठा! मग तो पैसा कुठल्याही मार्गाने येवो, आणला जावो, त्याचा उदो उदो केला जातो किंवा सत्तेच्या व अधिकाराच्या परिघात जो फिरतो त्याचाही उदो उदो केला जातो. मात्र, लेखक, कवी, साहित्यिक व विचारवंताला अनुल्लेखाने मारले जाते. जिवंतपणी व मेल्या नंतरही! ही आपली सामाजिक शोकांतिका आहे.  वास्तविक लेखक, कलाकार, मूर्तीकार, साहित्यिक, चित्रकार, विचारवंत हे समाजाचे भूषण असतात. त्यांच्या तपात...

शपा, परशुराम व सुभाषचंद्र सोनार!

इमेज
शपा, परशुराम व सुभाषचंद्र सोनार!       -राजाराम सूर्यवंशी हिंदू धर्मातील भगवान विष्णूचा सहावा अवतार म्हणजे परशुराम अवतार. या परशुरामाने 21 वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांचा निप्पात करून ती पृथ्वी त्याने ब्राह्मणांना दान दिली वा अर्पण केली होती, असा पुराणात उल्लेख आहे. या दशावतारातील चौथा अवतार रामाचा होता, तर पाचवा अवतार कृष्णाचा आणि सहावा अवतार परशुरामाचा दाखवला व लिहिला गेला आहे. हा ब्राह्मण पुत्र चिरंजीव आहे, असे पुराणांचे म्हणणे आहे. या अमर परशुरामाला महात्मा फुलेंनी 1 ऑगस्ट 1872 रोजी जूनी गंज पेठ, घर नंबर 527 वरून एक पत्र पाठवले होते. त्यात लिहिले होते की, ‘अरे दादा परशुरामा, तु चिरंजीव आहे, असे ब्राह्मणांच्या ग्रंथावरून समजले आहे........तरी तु तोंड चुकवून इकडे तिकडे फिरू नको. हे पत्र मिळाल्यानंतर सहा महिन्याच्या आत तु तुझे अस्तित्व दाखव व तुझ्या चमत्कारांनी इंग्रज , फ्रेंच वैगरे लोकांना पळवून लाव........’. महात्मा जोतीराव फुलेंचे हे पत्र काही परशुरामापर्यंत पोहचले नव्हते. कारण परशुराम हा राम व कृष्णांकडून शिल्लक राहिलेली पुरुषसत्तावादी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्या...

अक्षय तृतीया नव्हे, आखाजी!

इमेज
  अक्षय तृतीया नव्हे, आखाजी!  -पुजेचा स्त्रियांनाच मान; ब्राह्मण वा पुरुष का करत नाहीत पूजा?                                                 -राजाराम सूर्यवंशी ब्राह्मणी पुरुषसत्ताक समाजपद्धतीचा कट्टर पुरस्कर्ता परशुराम यांची जयंती म्हणजे अक्षय तृतीया!, तर भारतीय कृषक समाजाचा स्त्रीसत्ताक उत्सव म्हणजे आखाजी. अक्षय तृतीया ही हिंदू उच्चवर्णिय समाजामध्ये प्रचलित आहे. आजच्या तिथीला परशुराम यांचा माते रेणुकेच्या पोटी जन्म झाला होता. ते ऐवढे ब्राह्मण्यग्रस्त  होते की, त्यांनी आयुष्यभर क्षत्रियांचा म्हणजेच शेतकरी जातींचा विरोध केला होता.  येथे क्षत्रिय या शब्दाचा दुसरा अर्थ मातृसत्ताक समाजाचे प्रतिनिधी असा होतो. ‘क्षत्र’ या शब्दाचा मूळ अर्थ स्त्री होतो, असे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी अर्थवेदाचे मराठी भाषांतर या ग्रंथाच्या पान तेरावर नमूद केले आहे. म्हणून क्षत्रिय म्हणजे स्त्रीसत्ताक व नंतरच्या मातृसत्ताक समाजपद्धतीचा, समतावादी विचारांचा प्रतिनि...

महात्मा फुले व मराठी साहित्य...!

इमेज
महात्मा फुले व मराठी साहित्य...! -राजाराम सूर्यवंशी ,पालघर जगातील एकमेव जातिव्यवस्थाक देश म्हणजे भारत. जातिव्यवस्था ही सामंतशाही व्यवस्थेचे व हिंदू उच्चवर्णियांचे सांस्कृतिक व जातीय निपज आहे. म्हणून हिंदूधर्म म्हणजे जातिव्यवस्थाक धर्म; जो शूद्रातिशूद्रांच्या जातीय व आर्थिक शोषणावर उभा आहे. आपल्या देशातील शूद्रातिशूद्र व बहुजन समाज हा सामाजिक क्रांतीसाठी कधीही तयार नव्हता व आजही तयार नाही...त्याऐवजी तो स्वतःचे ब्राह्मणीकरण करून स्वतःला अपग्रेड करून घेतो व ब्राह्मणशाहीचे हातचे कटपुतळी बाहुले बणून आपल्याच शूद्रातिशूद्र वा बहुजन समाजाचे सर्वांगीण शोषण करण्यात उच्चवर्णियांना मदत करतो. त्याच्या या अपग्रेडेड धारणेचा ब्राह्मणशाहीला कुठेही त्रास होत नाही. उलट ब्राह्मणशाही बहुजनांच्या जातीय आणि आर्थिक शोषणासाठी त्यांचा पुरेपुर वापर करून घेते व पाहिजे तेव्हा त्याची जातीय पत दाखवून त्याला आपल्या स्पर्धेतून बाद करते. शिवाय सर्व जातीय स्त्रियांना पुरुषसत्ताक बेड्यात अडकवून ठेवण्यात यांचा उपयोग करते. आपल्या देशात स्त्री शोषणात ब्राह्मणजातीयस्त्रियांचे धार्मिक शोषण अत्यंत  पराकोटीचे होते. समताशून्...