दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

अक्षय तृतीया नव्हे, आखाजी!

 अक्षय तृतीया नव्हे, आखाजी! 
-पुजेचा स्त्रियांनाच मान; ब्राह्मण वा पुरुष का करत नाहीत पूजा?  

                                             

-राजाराम सूर्यवंशी
ब्राह्मणी पुरुषसत्ताक समाजपद्धतीचा कट्टर पुरस्कर्ता परशुराम यांची जयंती म्हणजे अक्षय तृतीया!, तर भारतीय कृषक समाजाचा स्त्रीसत्ताक उत्सव म्हणजे आखाजी.
अक्षय तृतीया ही हिंदू उच्चवर्णिय समाजामध्ये प्रचलित आहे. आजच्या तिथीला परशुराम यांचा माते रेणुकेच्या पोटी जन्म झाला होता. ते ऐवढे ब्राह्मण्यग्रस्त  होते की, त्यांनी आयुष्यभर क्षत्रियांचा म्हणजेच शेतकरी जातींचा विरोध केला होता. 
येथे क्षत्रिय या शब्दाचा दुसरा अर्थ मातृसत्ताक समाजाचे प्रतिनिधी असा होतो. ‘क्षत्र’ या शब्दाचा मूळ अर्थ स्त्री होतो, असे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी अर्थवेदाचे मराठी भाषांतर या ग्रंथाच्या पान तेरावर नमूद केले आहे. म्हणून क्षत्रिय म्हणजे स्त्रीसत्ताक व नंतरच्या मातृसत्ताक समाजपद्धतीचा, समतावादी विचारांचा प्रतिनिधी म्हणजे क्षत्रिय.
आज क्षत्रियचा अर्थ लढवय्या मराठा समाज वा जाती असा जातीवाचक होतो ; परंतु महात्मा फुले यांच्या विचारधारणेने ‘महाराष्ट्रात राहणारा तो मराठा’ असा आहे व तो बरोबर आहे.
पुराण कालखंडात मातृसत्ताक समाज व्यवस्था पुरुषसत्ताक समाज पद्धतीत बदलण्यासाठी राम आणि कृष्णाप्रमाणे परशुरामानेही भरपूर प्रयास केला होता. त्याला स्त्रीसत्तावादी मातृसत्ताक समाजाच्या प्रतिनिधींनी प्राणपणाने विरोध केला होता. तेव्हापासून परशुराम हा कधीच बहुजन समाजाचा दैवत बनला नाही व आदरणीयही राहिला नाही. म्हणजेच बहुजनवादी मातृसत्ताक समाज हा पुरुषसत्तावादी समाजव्यवस्थेला शरण गेला नाही. त्यांच्या नेणिवेत आजही ती मातृसत्ताक समाजव्यवस्था घट्ट बसली असल्याने हा क्षत्रिय मराठी वा बहुजन समाज आजच्या दिवशी अक्षर तृतीया नव्हे, तर आखाजी हा मातृवंशीय स्त्रीसत्ताक सण साजरा करतो.  
कृषिमाया व स्त्रीसत्तेची प्रतिनिधी असलेली घागर पाण्याने भरून तिची पूजा करतो. आंब्याच्या रसाचे पुरणपोळीसोबत त्या घागरेला म्हणजेच आखाजीला नैवद्य दाखवतो. ‘यावर्षी पीकपाणी भरपूर होऊन कृषकसमाज संपन्न होवो’, अशी कामना करतो. तसेच मातृदेवतांना स्मरण करतो.
याउलट मातृसत्ताक व्यवस्था नाकारून पुरुषसत्ताक व्यवस्था निर्मितीत सहकार्य  करणारा म्हणून उच्चवर्णिय समाज परशुराम यांच्या जन्माचा अक्षय तृतीया हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा  करतो. उच्चवर्णिय समाज व बहुजन समाज यांच्यातला हा सांस्कृतिक संघर्ष आहे. ‘स्त्रियांनी शेतीचा शोध लावला’, असे प्राच्यविद्यापंडित सत्यशोधक शरद पाटील यांनी स्त्री-शूद्रांची गुलामगिरी  या ग्रंथात सप्रमाण सिद्ध केले आहे. 
आखाजीला पावसाच्या पाण्यावर गाळपेर शेती केल्यानंतरच्या हिवाळ्यात शेतीमधून निर्मित झालेले गहू व ऊसापासून तयार केलेली पुरणपोळी, कुरडाई व सांजर्‍या आणि उन्हाळी शेती उत्पादन डांगर (खरबूज), यांचाही नैवद्य आखाजीला दिला जातो. 
आखाजीला जो माठ वा घागर पुजली जाते ती पृथ्वीचे म्हणजेच वर म्हटल्याप्रमाणे स्त्रीसत्तेची प्रतिनिधी आहे. तिलाच ‘क्षत्र’ किंवा भूमातेचे प्रतीक  म्हटले जाते. त्यात भरले जाणारे पाणी हे आकाश देवतेचे प्रतीक मानले जाते. त्यांचे एकत्रित पूजन केले जाते. ही शेतीच्या सुफलिकरणाची माया आहे.
आता आखाजी या शब्दाचा का अर्थ पाहूया...
आखाजी हे अक्षर दो शब्दांनी मिळून बनलेले आहे, 
आख + आजी = आखाजी.
‘आख’ म्हणजे आखणी करणे किंवा अंदाज घेणे. येणार्‍या पावसाळ्यात पडणार्‍या पावसाचा शोध घेणे आणि त्यानुसार या पावसाळ्यात कशी व कोणती शेती करायची याची आखणी (योजना) करणे म्हणजे ‘आख’ वा आखणी. 
कानदेशाची मातृदेवता कानुबाई यांच्या राजवटीचा जो भौगोलिक प्रदेश आहे, त्या संपूर्ण प्रदेशात आजच्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहाने, पुरण पोळीचे गोडधोड पक्वांन बनवून, आंबा व निंबाच्या झाडांना मोठ मोठे झोके बांधून माहेरी आलेल्या मुली-सुना व घरातील कर्त्या महिलांकडून हा सण मोठ्या आनंदाने, कानुबाई व आखाजीचे गाणे गाऊन साजरा केला जातो.
पुढे मोंघल प्रशासनाच्या कालखंडात ‘कानदेशाचा’अपभ्रंश होऊन तो ‘खानदेश’ असा बनला आहे.
व ‘आजी’ म्हणजे कृषीमायेचे ज्ञान व हक्क ज्यांच्या आधीन आहेत, त्या आजी वा घरातील सम्राज्ञी असा आजीचा अर्थ आहे.
अर्थात, आखाजीचा अर्थ पुढील वर्षावासात कुठले धन-धान पिकवायचे, त्याचे काय नियोजन करायचे, त्यासाठी नवीन सालगडी, सालदार किती व कसे नेमायचे, हा सर्व व्यवहार घरातील कर्त्या महिलेच्या वतीने घरातील पुरुष  सामूदायिकरित्या आजच्या दिवशी करीत असतात. 
या सणात व नेहमीप्रमाणे घरातील व समाजातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा मोठा सहभाग असतो. तो काही त्यांना जाहिरात करून सांगावा लागत नाही. तो नेणिवेद्वारा आपोआप आलेला असतो.
या आखाजी सणाची विशेषतः ही आहे की, या सणाची पूर्वतयारी व पूजा  फक्त महिला करत असतात. तसे, मराठी मराठा बहुजन समाजातील सर्वच सण हे स्त्रीप्रधान आहेत. त्यांच्या पुरोहीत या स्त्रिया असतात. म्हणून या आखाजीच्या सणात ब्राम्हण तर नाहीच, पण घरातील पुरुषही या सणाचा केंद्रबिंदू नसतो. केवळ स्त्रीयांच्या हातून याची मांडणी होते.
हा सण साजरा होईपर्यंत म्हणजे आखाजीला घागर-जलकुंभ-पूजली जात नाही, तोपर्यंत घरातील सर्व वरिष्ठ प्रतिनिधी, बाजारात व आपल्या वाडीत, मळ्यात, गोठ्यात कितीही आंबे आले आसू देत; परंतु आंबा सेवन करीत नाहीत. तसे ‘व्रत’ आजही पाळले जाते! 
ब्राम्हणी पुरुषसत्ताक छावणीने आखाजीला  विरोध करून, त्याला अक्षय तृतीया हा पर्यायी सण उभा करून एक सांस्कृतिक संघर्ष उभा केला होता. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली होती, असे पुराणात मोठ्या गौरवाने लिहिले गेले आहे. तरीही क्षत्रिय हा या पृथ्वीतलावर शिल्लक राहिला आहेच ना! याचा अर्थ परशुरामाने आपली स्त्रीसत्ताक-मातृवंशक समाजपद्धती बदलण्याचा 21 वेळा भरपूर प्रयत्न केला. त्याऐवजी पुरुषसत्ताक विषमतावादी समाजपद्धती रुजविण्याचा आटापीटा केला. मात्र, त्यात त्याला शंभर टक्के यश आले नाही. स्त्रीसत्ताक मातृवंशक समतावादी समाजाच्या प्रतिनिधींनी परशुरामाला भरभक्कम विरोध केला. त्यात आपले 21 पुरुष-स्त्रिया यांना वीरमरण आले; परंतु त्या विषमतावादी पुरुषसत्तेला शरण गेल्या नाहीत. त्यांनी नेणीवेत आपली मातृसत्ताक समाजपद्धती व संस्कृती टिकवून ठेवली, त्यातलीच एक म्हणजे आखाजी होय.
दिवाळी हा कृषिमायेनंतरचा अर्थात पावसाळानंतरचा, शेतातलं पीक-धान्य खळ्यात आल्यानंतचा जसा उत्सव आहे। तसा आखाजी हा कृषीमायेपूर्वीचा, म्हणजे नवीन कृषी हंगाम सुरु होण्याचा उत्सव आहे. म्हणूनच खानदेशातील लेकी-बाळी या दिवाळी व आखाजीला माहेरी येत असतात.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही आखाजीच्या दिवशी नवीन सालदार नेमतात. नवीन कृषी पर्व सुरु होते. पावसाची चातकासारखी वाट पाहाणे सुरु होते. शेतकरी घरातील लग्नकार्य उरकवून घेतो. असा हा आखाजीचा सण असून तो बहुजन समाजाचे अब्राह्मणी सांस्कृतिक-स्त्रीसत्ताक मातृवंशक समाजाचे  नेतृत्व आपल्या नेणिवेद्वारे करत आला आहे. म्हणून बहुजन समाज जो सण साजरा करतो तो आखाजी आहे, तर उच्चवर्णिय समाज आजच्या दिवशी जो सण साजरा करतो, अक्षय तृतीया अर्थात परशुराम जयंती असते.


-राजाराम सूर्यवंशी ,पालघर
Mob. no. : 9503867602

(लेखक हे सामाजिक विचारवंत असून त्यांच्या ‘युगस्त्री सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या असून या पुस्तकावर ‘सावित्री एक क्रांती’ ही दूरदर्शन मालिका चालवली गेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने समिती व महात्मा फुले चरित्र साधने समिती यांचे ते सन्माननिय माजी सदस्य आहेत.)


Save Journalism!, Save Democracy!!

DONATE...

BAHUJAN SHASAK MEDIA

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?