दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

संविधान, गांधी आणि हरिजन!

 संविधान, गांधी आणि हरिजन!


भास्कर सरोदे : विशेष संपादकीय (बहुजन शासक, दि. 7 जून 2024) :

18 वी लोकसभा निवडणूक भारतीय संविधानाला मध्यभागी ठेऊन लढल्या गेली. ‘संविधान बदलणार?’ आणि ‘संविधान बचाव’ हे दोन शब्द केंद्रस्थानी होते. प्रामुख्याने ‘इंडिया’ आणि ‘एनडीए’ या दोन आघाड्यांमध्ये लढत होईल याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. एकाधिकारशाही वा द्विपक्षीय पद्धती हे भारतीय लोकशाहीविरोधी कृत्य लोकांच्या लक्षात येणार नाही, इतक्या कुशलतेने हाताळण्यात आले. केंद्रात राष्ट्रीय स्वयं सेवक संघप्रणित भाजपची सत्ता आल्यापासून संविधानाच्या विरोधात जाहीरपणे जाणीवपूर्वक बोलले गेले. दिल्‍लीत संविधान जाळले, संविधान बदलण्याची भाषा करण्यात आली, मोदी सरकारचे तर हरएक पाऊल संविधानविरोधी असताना फारसा आवाज उठला नाही. जसजशी सार्वत्रिक निवडणूक जवळजवळ येत गेली तसतशी संविधानाच्या समर्थनार्थ मतं प्रदर्शित होऊ लागली. ‘निर्भय बनो’ ते ‘संविधान बचाव’चा पुकारा करण्यात आला. अत्यंत सुनियोजितपणे समाजमन घडविण्यासाठी बुद्धिजिवी, वकील, प्राध्यापक, तथाकथित विचारवंत, साहित्यिक, डॉक्टर सरसावले. संविधान विरोधकांनीही ‘पुन्हा सत्तेत आलो तर संविधान बदलणारच’, अशा वल्गना करायला सुरुवात केली. हे कसं ठरवून केले गेलं. नवगांधी (राहुल गांधी) च्या हाती संविधान आणि देश कसा सुरक्षित राहील, पूर्वीची काँग्रेस नसून बदललेली काँग्रेस आहे, हे जनमनावर बिंबविण्यात आले. या आधारावरच इंडिया आघाडी बनविण्यात आली. ती बनवताना भारतातील तिसर्‍या क्रमांकाची बहुजन समाज पार्टी आणि महाराष्ट्रात निर्णायक जनाधार असलेली वंचित बहुजन आघाडी दूर कशी राहील, याची रणनिती आखण्यात आली. गांधीवादी ‘हरिजन’ सोबतीला होतेच. या हरिजनांच्या माध्यमातून बहेन कु. मायावती, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे कसे भाजपसाठी काम करत आहेत, याबाबत राळ उठविण्यात आली. या दोघांच्या विरोधात शिव्याश्यापांचा वर्षाव होऊ लागला. हे दोघे कसे समाजद्रोही आहेत, त्यांना समाजाचं काहीच देणंघेणं नाही, दिल्या तेवढ्या जागांवर समाधानी राहायचे होते नं, असा आग्रह धरण्यात आला. शिवाय इंडिया आघाडीबरोबर गेल्यानं समाजाचं कसं भलं होणार, याबाबत आडाखे बांधले जाऊ लागले. बाबासाहेब, नव्हते का काँग्रेसच्या सत्तेत सहभागी झाले...आदी. बाबासाहेबांनी आखलेल्या धोरणाला हे हरिजन तडजोड म्हणू लागले. वगैरे वगैरे... आपल्या उद्देशात सत्ताधारी वर्ग सफल झाला. मात्र, हरिजनांचे काय, हा प्रश्‍न अजूनही अनुत्तीत आहे. त्यांच्या वाट्याला किती जागा मिळाल्या?, प्रत्येक क्षेत्रात समान प्रतिनिधित्व, सामाजिक न्याय आणि जात निर्मूलनाचे काय, याविषयी कोणताही ‘हरिजन विचारवंत’ भाष्य करताना दिसत नाही, ही शोकांतिका मानली पाहिजे. 

संविधानाच्या अनुषंगाने ज्या शंका-कुशंका घेण्यात आल्या त्या सगळ्या भारतीयांच्या डोळ्यात धूळफेक होती, हे आंबेडकरवाद्यांनी (हरिजनांनी नव्हे) पूर्वीच्या अनुभवातून हेरलं होतं. म्हणून कोणत्याही भूलथापांना बळी न पडता त्यांनी स्वतंत्र बाणा दाखवला, हे सशक्‍त लोकशाहीसाठी गरजेचे आहे. सुरुवातीपासून संविधानाचा सर्वाधिक लाभ या देशातील उच्चवर्णियांना झाला. राजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग, सहकार, व्यापार, मीडिया, न्यायव्यवस्था, नोकरी आदी क्षेत्रांवर दृष्टिक्षेप टाकला, तर या सर्व क्षेत्रांवर उच्चवर्णियांचा बोलबाला दिसून येतो. नोकरी सोडली, तर इतर क्षेत्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचे प्रतिनिधित्व नगण्य दिसते. याबाबत कधी आवाज उठवला जात नाही. ज्यांच्या वळचणीला बसून ज्ञान पाजळणारे स्वाभिमानाने कधी आपल्या वाट्यावर दावाही ठोकत नाहीत. कायम भिकार्‍यांच्या भूमिकेत राहून चिरीमिरी पदरात पाडून घेण्यातच धन्यता मानतात. मग, खर्‍या अर्थाने संविधानाचे लाभार्थी लोक संविधान बदलतील कसे? हा साधा प्रश्‍न त्यांच्या मनाला शिवत नाही. संविधान बदलले, तर या देशात यादवी माजेल. ज्या समाज घटकांनी समाजद्रोही, देशद्रोही कृत्य केले, विषमतेची पाठराखण केली, त्यांना या देशात जगता येईल?

ईव्हिएम आणि निवडणूक आयोग दिमतीला असल्याने आरएसएस-भाजप निश्‍चिंत आहेत. काँग्रेसला जीवनदान देऊन भाजपची सत्ता राखणे हा दुहेरी हेतू, उच्चवर्णिय, भांडवलदार वर्गाचा आहे. त्यात त्यांना यश आले. तुमच्या हातात काय पडले, याविषयी चिंतन करणे गरजेचे आहे. हे संपादकीय निवडणूक निकाल लागण्याआधी लिहिले आहे. सत्ता कोणाची येणार, यापेक्षा त्या सत्तेत आम्ही कुठे आहोत, हा प्रश्‍न स्वत:ला विचारला पाहिजे. निव्वळ पालखीचे भोई होऊन जगण्यापेक्षा स्वाभिमानी आंबेडकरवादी म्हणून मरणे कधीही बेहतर!

संविधाननिर्मितीपासूनच आरएसएसचा संविधानाला विरोध होता, आजही आहे आणि उद्याही राहील! तथापि, गेल्या 60 वर्षांत पदोपदी संविधान पायदळी तुडविणार्‍या काँग्रेसला शेवटी संविधानाचाच आधार घ्यावा लागला. ही संविधानाची ताकद आहे. देशाची सद्यपरिस्थिती सर्जनशील चित्रकाराने आपल्या चित्रात टिपली आहे. संपूर्ण देश विविध प्रश्‍नांनी होरपळत असताना नवगांधी (राहूल गांधी!) संविधान घेऊन निघाल्याचे नंदकुमार जोगदंड या चित्रकाराने प्रतिकात्मक कलाकृतीतून दर्शविले आहे. चित्रकाराने आपली ही कलाकृती बहुजन शासकसाठी खास पाठवली आहे. आता हा नवगांधी संविधानिक मूल्यांची कशी रूजवणूक करतो, संविधानाशी किती प्रामाणिक राहतो, हे येणारा काळच ठरवणार आहे! 

Save Journalism!, Save Democracy!!

DONATE...

BAHUJAN SHASAK MEDIA

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा) 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?