पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

महात्मा फुलेंचा ‘एकमय लोक’, अस्पृश्यतेचा प्रश्न व र. वा. दिघेंचं वारकरी साहित्य!

इमेज
 महात्मा फुलेंचा ‘एकमय लोक’, अस्पृश्यतेचा प्रश्न व र. वा. दिघेंचं  वारकरी साहित्य! लेखांक-7 : वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध आपला भारत हा विविध संस्कृतींनी नटलेला देश आहे. त्याचबरोबर तो जेवढा शेतीप्रधान आहे, तेवढाच जातीप्रधान देश आहे. याशिवाय खूप मोठ्या प्रमाणावर भौगौलिक विविधता आहे व त्या अनुषंगाने अवतरली वा लादलेली भौगौलिक विषमताही आहे. येथेचं ही विषमतेची कहाणी संपत नाही. यात शैक्षणिक विषमता, प्रादेशिक विषमता, जात-जमातीय विषमतेचे सुक्ष्म पैलू अदृष्य स्वरूपात कार्यरत  असल्याने साहित्य क्षेत्रातही नागर, ग्रामीण, दलित व आदिवासी असे भेदही कार्यरत होत आले आहेत. महात्मा फुले म्हणायचे की, यातले सारे भेद नाहिसे केले तर, म्हणजेच हे सर्व भेदान्वित लोक एकमय झाले तर भारत एक राष्ट्र म्हणून खर्‍या अर्थाने विकसित होईल! एक राष्ट्र होईल!!  तथापि, हे कसे शक्य आहे? यासाठी महात्मा फुलेंनी त्याच्या काळातील प्रस्थापित राष्ट्रीय सभा, सार्वजनिक सभा व ग्रंथकार सभा या सभा विसर्जित करायला सांगितल्या होत्या. त्यांच्यावर टिका केली होती. महात्मा फुले यांचे म्हणणे होते की, शूद्रातिशूद्र...

महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार! : मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंच्या विधानाने खळबळ

इमेज
महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार! :  मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंच्या विधानाने खळबळ  अमरावती : बशावृत्त देशाला भेडसावणार्‍या समस्यांवरून देशवासियांचे लक्ष विचलित करण्यासाठी आरएसएस प्रणित अतिरेकी संघटना वा व्यक्‍ती कायम वादग्रस्त विधानं करत असतात. मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंनी महात्मा गांधी यांचे वडीलच बदलण्याचे धाडस करताना त्यांच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून अजूनही मनोहर कुलकर्णी मोकाट कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ‘महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत’, असे खळबळजनक वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंनी अमरावतीत एका कार्यक्रमात केले आहे. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडेच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. भिडे म्हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे...

मणिपूर : फुलनच्या धगधगत्या निखार्‍यांनो...

इमेज
  मणिपूर : फुलनच्या धगधगत्या निखार्‍यांनो... जाती उच्चत्व, लैंगिक अत्याचार्‍यांना ठेचणार्‍या आणि बुद्धाच्या धम्मपथावरून चालता चालता-लढता लढता शहीद झालेल्या फुलनदेवीचा आज (25 जुलै) शहीद दिन. आज मणिपूरमधल्या कुकी जमातीच्या स्रियांनाही फुलन देवीसारख्याच अत्याचारांना सामोरे जावे लागतेय. त्यांच्या नग्न धिंडीचीही पाठीराखी सत्ता आणि व्यवस्था पत्थरदिल झाली असताना फुलनच्या धगधगत्या अंगार्‍यांना पेटते करायचे काम 25 जुलै 2021 ला पत्रकार रवी भिलाणेंनी केले होते. संदर्भ जुना असला तरी मणिपूरच्या पुरुषी मानसिकतेवर अचूक बोट ठेवणारा आहे. फुलनच्या हौतात्म्याला क्रांतिकारी जयभीम करताना रवी भिलाणेंच्या लेखणीने पेटवलेले हे निखारे काळीज असलेल्या आपल्या सार्‍यांसाठी... शहाणी राणी फुलनदेवी...  ‘‘... फुलन देवी, जीने तिच्यावर बलात्कार करणार्‍या उच्चवर्णीयांच्या गावात घुसून दिवसाढवळ्या 22 मुडदे पाडले होते. चंबळच्या खोर्‍यातील डाकुराणी फुलनदेवी. बँडीट क्वीन!  ...1996 ला जरी ती खासदार म्हणून निवडून आली असली तरी 1998 ला मुंबईत आली तेव्हा ती खासदार नव्हती. अर्थात 1999 ला ती पुन्हा खासदार म्हण...

र. वा. दिघे : अस्सल मराठी मातीतला वारकरी-शेतकरी कादंबरीकार

इमेज
र. वा. दिघे : अस्सल मराठी मातीतला वारकरी-शेतकरी कादंबरीकार  लेखांक 6 : वारकरी संत साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध  महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा, कुणबी व बहुजन समाज हा वारकरी आहे. आज तो शिक्षण व साहित्यातही आपले योगदान देत आहे. तथापि, त्याला जे साहित्य सहज उपलब्ध होते ते ब्राह्मणी साहित्य आहे. जे कपोलकल्पित कथा, कादंबर्‍यांनी ओतप्रोत भरलेले आहे. या नवशिक्षित शेतकरी-वारकरी तरुणाला त्यात त्याचे शेतकर्‍याचे, वारकर्‍याचे प्रतिबिंब दिसत नाही. त्या साहित्यात त्याला वारकरी हिरो-नायक सापडत नाही. डॉ. आनंद यादव यांची ओळख महाराष्ट्रातला ग्रामीण साहित्यिक अशी झाली आहे; परंतु त्या आनंद यादवांच्या साहित्यातही वारकरी हिरो आढळत नाही.  आपल्या ग्रामीण साहित्याची ओळख वारकरी साहित्य अशी झाली पाहिजे. ती तशी नाही, म्हणून आजचे सर्व ग्रामीण साहित्यिक हे आतून पंडित साहित्याशी नाळ जोडू पहात आहेत, असा जर कोणी निष्कर्ष  काढला तर तो वावगा म्हणता येणार नाही. खर्‍या अर्थाने म्हटले तर ग्रामीण जीवनातून वारकरी वजा केला तर त्याचे उत्तर शून्य हे येते. असा हा सर्वार्थाने ग्राममय जीवन जगणारा वारकरी शेतक...

लेखांक -5 : वारकरी साहित्य आणि संप्रदाय : शोध आणि बोध!

इमेज
  लेखांक -5 : वारकरी साहित्य आणि संप्रदाय : शोध आणि बोध!  वारकरी साहित्य व संप्रदायाची सामाजिक प्रबोधनाची भूमिका. वारकरी साहित्याची भूमिका समतावादी, जीवनाकडे समग्रपणे पहाणारी भूमिका आहे. समग्रपणे म्हणजे सांसारिक, प्रापंचिक, पारमार्थिक, ऐहिक व भौतिक जीवनाच्या सर्व अंगांना व्यापणारी भूमिका आहे. कारण वारकरी हे सुधारकांप्रमाणे विवाहित-सांसारिक होते. त्यातून त्यांना जीवनाचे कडू-गोड अनुभवाचे चटके बसले होते. त्या अनुभवातून त्यांची एकंदर मानवजातीय समाजाबद्दल जी मनोभूमिका तयार झाली होती, त्यामुळे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व समग्र बनला होता.  याउलट आचार्य, महंत, शंकराचार्य हे ब्रह्मचारी होते. त्यांची भौतिक, ऐहिक व प्रापंचिक जीवनाबद्दलची भूमिका नकारात्मक होती. जगं मिथ्या, ब्रह्मं सत्यं अशी त्यांची भूमिका होती. म्हणजे ज्या जगात आपण सतत जगतो, ज्यात वावरतो, ज्याला अनुभवतो, ज्यातून जीवनातील सुख-दुःखाचा अनुभव होतो, ज्या सृष्टीच्या विशाल आविष्कारांनी माणूस मोहित होतो, पुलकित होतो असे वास्तविक जग मिथ्या म्हणजे भ्रम आहे, असा त्यांचा सतत उपदेश असायचा. ब्रह्मं सत्य म्हणजे...

लेखांक-4 : वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध

इमेज
 लेखांक-4 : वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध  वारकरी संप्रदायात सर्वांना समान दर्जा होता. समान स्थान होते. संत नामदेव, संत तुकाराम, संत नगाजी महाराज आदी शूद्रवर्णिय संतांकडूनही काहींनी शिष्यत्वाची दीक्षा घेतली होती. संत तुकाराम शिष्या बहिणाबाई या जातीने ब्राह्मण होत्या. तसेच संत नगाजी महाराज व वाठारचे संत वाग्देव महाराज यांच्याकडूनही बर्‍याच ब्राह्मणांनी शिष्यत्वाची दीक्षा घेतली होती.  सर्वात महत्वाचे म्हणजे चक्रधर-ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकाराम व नगाजी महाराजांपर्यंत सर्व संत डिकास्ट झाले होते. समाजातील जाती-वर्ण-लिंगभेदाला या संतांनी तिलांजली दिली होती. खुद्द ज्ञानेश्वरांना प्रेरणा मुक्ताबाईपासून मिळाली होती. ज्ञानेश्वरांआगोदर मुक्ताबाई अभंग-ओव्या रचू लागल्या होत्या. तसेच ज्ञानेश्वरांनंतर ज्ञानेश्वरी ही सच्चिदानंद बाबांनी लिहून काढली होती. चोखोबांचे अभंग अनंत भट नावाचा ब्राह्मण लिहून देत होता. त्याकाळीही काही सुज्ञ ब्राह्मण स्वतःहून पुढे येऊन शूद्रांना अभंग लिहिण्यात साथ देत होते. या गोष्टीला फार मोठे सामाजिक महत्त्व आहे. ही किमया वारकरी संप्रदायाची होती. कारण ...

इतिहासात झाकोळलेले स्त्रीरत्न : जोती-सावित्रीला घडविणार्‍या सगुणाबाई क्षीरसागर!

इमेज
इतिहासात झाकोळलेले स्त्रीरत्न : जोती-सावित्रीला घडविणार्‍या सगुणाबाई क्षीरसागर! एकोणिसाव्या शतकातील एक झाकोळलेले स्त्रीरत्न व सावित्रीबाई फुलेंची किंगमेकर असलेल्या सगुणाबाई क्षीरसागर यांची आज दि. 6 जुलै रोजी 169 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने सगुणाबाईंना त्यांच्या कार्याला शतशः अभिवादन! मित्रांनो, सावित्रीबाईंचे नाव उच्चारताच सावित्रीबाईंना घडविणार्‍या तीन व्यक्ती कायम डोळ्यासमोर येतात. 1) महात्मा जोतीराव फुले, 2) अमेरिकन मिशनच्या मिसेस फरार व 3) सगुणाबाई क्षीरसागर!  होय, सगुणाबाई क्षीरसागर!  हे नाव फारसे एकिवात नाही किंवा त्यांची कोणी दखलच घेतली नाही. त्यामुळे त्या ओळखीच्या वाटत नाही. हे खरं आहे; परंतु आपणा सर्वांना हे चांगले ज्ञात आहे की, कोणतेही काम एकखांबी तंबू नसते. त्याला बर्‍याच जणांचा हातभार लागलेला असतो. तसेच महानायक व महानायिका तयार होताना अनेक जणांनी त्यासाठी खस्ता खाल्लेल्या असतात. आपला समाज अजूनही व्यक्तीपूजक आहे, समुहपूजक नाही. आपण समुहपूजक बनल्याशिवाय सहकाराचे तत्त्व आपल्यात भिनणार नाही. सावित्रीबाई फुले आता आपणाला चांगल्याप्रकारे ज्ञात झाल्या आहेत; परंतु नायग...

अजित पवारांचे बंड! : पंचगव्याने धुतली जातील का पापं?

इमेज
अजित पवारांचे बंड! : पंचगव्याने धुतली जातील का पापं? भास्कर सरोदे, औरंगाबाद (रविवार, दि. 2 जुलै 2023) : राष्ट्रवादी काँग्रेसचे उपनेते अजित पवार यांनी पुन्हा बंड करत दुसर्‍यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 30-40 राष्ट्रवादीचे आमदार असल्याचा दावा केला जातो आहे. ‘ते गेलेत का त्यांना पाठविले’, हा संभ्रम कायम आहे. तथापि, अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्‍ल पटेल, हसन मुश्रीफ हे चार नेते ईडीच्या चौकशीच्या फेर्‍यात अडकलेत. आता धुतल्या तांदळासारख्या असलेल्या भाजपबरोबर गेल्याने त्यांचे पंचगव्याने शुद्धीकरण होईल! त्यांची सारी पापं धुतली जातील! पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर समाजाचे चरित्र अधोरेखित करणारा आहे! अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. जरंडेश्‍वर साखर कारखाना विक्रीत अजित पवारांवर टांगती तलवार आहे. प्राप्‍तिकर विभागाने अजित पवारांच्या बहिणींच्या घरांवर छापा टाकला होता. कारवाईची सतत टांगती तलवार ठेवून अजित पवारांसाठी भाजपने गळ टाकलेला होता. छगन भुजबळ यांना अटक झाली होती. प्रफुल्‍ल पटेल यांचीही चौकशी झाली आहे. हसन मुश्रीफ हे साखर कारखाना घोटाळ्यात अडकले आहेत...

लेखांक-3 : वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध

इमेज
 लेखांक-3 : वारकरी साहित्य व संप्रदाय :  शोध आणि बोध   ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत, लेखक राजाराम सूर्यवंशी यांचा ‘वारकरी साहित्य आणि संप्रदाय : शोध आणि बोध!’ या लेखांकाची मालिका बहुजन शासक, बहुजन शासक मीडियांच्या वाचकांसाठी देत आहोत. ही मालिका वारकरी संप्रदायाविषयीचे मळभ दूर करणारे ठरेल, इतके ते ऐतिहासिक संदर्भांनी परिपूर्ण, विश्‍वासार्ह आणि दर्जेदार असून वाचकांसाठी पंढरीच्या वारीची मेजवाणी ठरणार आहे. -संपादक  वारकरी साहित्य असो, विद्रोही साहित्य असो, ग्रामीण साहित्य असो वा अभिजन साहित्य असो सर्वसमावेशकता हे त्यांच्या मुख्य प्रवाहाचे लक्ष्य असायला हवे.  ही सर्वसमावेशकता नुसती बोलकी नसावी, तर वारकर्‍यांसारखी, वारकरी पंथासारखी कृतिशील असावी. मराठी बोलणारी व्यक्ती, भले ती कोणत्याही जाती-धर्माची असो ती वगळता कामा नये! यावर तिचा कटाक्ष हवा, जसा वारकरी साहित्याचा होता. ज्ञानेश्वरांच्यापूर्वी मराठी साहित्याचे लेखन हे प्रायः संस्कृत भाषेत केले जात असे आणि ही संस्कृत भाषा लक्ष्मण मानेंच्या शब्दात  साडेतीन टक्क्यांची भाषा होती, जी बहुजनांना वर्ज्य होती. एवढेच नव्हे तर ...