दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

जनतेवर करांचा भार : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगवर कोट्यवधींची उधळपट्टी

 जनतेवर करांचा भार : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगवर कोट्यवधींची उधळपट्टी


भास्कर सरोदे : छत्रपती संभाजीनगर

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसर्‍या प्री-वेडिंग सोहळ्याला थाटात सुरुवात झाली आहे. लक्झरी क्रूझ ‘सेलिब्रिटी असेंट’ या तरंगते रिसॉर्टमधून इटली ते फ्रान्स असा तीन दिवसांचा ‘न भूतो न भविष्यती’ प्रवास सुमारे 800 पाहुणे करताहेत. भारतीय म्हणून या सोहळ्याचा आनंद आहेच! मात्र, देशात प्रचंड बेरोजगारी, कुपोषण, दारिद्र्य, भूकमारी असताना जनतेच्या करातून सरकारने पोसलेल्या उद्योगपतीने अशी कोट्यवधींची पाण्यात उधळपट्टी करावी का, हा संवेदनशील माणसाला पडलेला प्रश्‍न आहे.

पहिल्या प्री-वेडिंगवर खर्चले 1250 कोटी! :

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्‍न जुलैमध्ये आहे. यापूर्वी पहिली प्री-वेडिंग सेरेमनी जामनगर येथील रिलायन्स कंपनीच्या अ‍ॅनिमल रेस्क्यू सेंटर ‘वनतारा’ येथे उत्साहात पार पडली. यासाठी सुमारे 1250 कोटी रुपये खर्च आल्याचे बोलले जाते आहे. 

5-स्टार तरंगत्या रिसॉर्टमधून प्रवास :

दुसरी प्री-वेडिंग सेरेमनी 28 ते 30 मे दरम्यान होणार आहे. लक्झरी क्रूझ ‘सेलिब्रिटी एसेंट’मधून इटलीहून निघून 4380 किलोमीटरचा प्रवास करून सदर्न फ्रान्सला पोहोचणार आहे. माल्टा येथून मागवलेले क्रूझ हे 5-स्टार तरंगते रिसॉर्ट आहे. या क्रुझची आसन क्षमता 3279 आहे. या सेरेमनीसाठी 800 पाहुण्यांपैकी 300 व्हीव्हीआयपी असतील. त्यांच्या दिमतीला जगातल्या सगळ्या सुविधा असतील. इटलीच्या पालेर्मो पोर्ट येथून प्रवासाला निघणार्‍या क्रूझवर जगभरातील पाहुणे 12 विमानांनी इटलीला आणण्यात आले. या प्रवासाची जबाबदारी युरोपियन टूर ऑपरेटर कंपनी अलोस्ची ब्रदर्सवर सोपविण्यात आली आहे, असे भरभरून वर्णन माध्यमांमधून करण्यात आले आहे.

चांदीच्या कलाकृती देणार भेट :

द हिंदूच्या रिपोर्टनुसार तेलंगणा राज्यातील सिल्वर फिलिग्री ऑफ करीमनगर येथील हस्तशिल्प कल्याण सोसायटीला रिलायन्स रिटेलच्या स्वदेश स्टोरच्या माध्यमातून सिल्वर कलाकृतींची ऑर्डर देण्यात आली आहे. हाय-प्रोफाईल पाहुण्यांना या सिल्वर कलाकृती भेटस्वरूपात देण्यात येणार आहेत. हा सोहळा न भूतो न भविष्यती बनविण्याच्या दृष्टीने अंबानी परिवाराकडून नियोजन करण्यात आले असून त्यावर कोट्यवधींची उधळण करण्यात येत आहे. अशावेळी सरकारी ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स संस्था कुठे असतात, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्‍न आहे.

कर्जमाफी उद्योजकांच्या पथ्यावर :

मोठ्या उद्योगांना जमीन, वीज, पाणी मोफत अथवा सवलतीच्या दरात दिले जाते. जनतेचा बँकामधील पैसा बड्या उद्योगपतींच्या घशात घातला जातो. चालाखीने उद्योग दिवाळखोरीत दाखवून कर्ज भरण्यास टाळाटाळ केली जाते. काही वर्षांनी तेच कर्ज माफ केले जाते. मिळालेल्या या कर्जमाफीतून उद्योगपती मजा मारत आहेत. पीटआयने 6 ऑगस्ट 2022 रोजी वृत्त दिले. त्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ट्विटचा आधार घेतला आहे. ते म्हणतात, ‘सूट-बूट सरकार’ने ‘मित्रांना’ ताटात भेट देऊन 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. 2017-18 पासून, या सूट-बूट सरकारने 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे 7 लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.’ 

माहिती अधिकार कार्यकर्ता प्रफुल्‍ल शारदा म्हणतात, 2015 ते 30 जून 2021 पर्यंत 11 लाख 19 हजार कोटींचे कर्ज राईट ऑफ करण्यात आले. तथापि, रिकव्हरी केवळ 1 लाख करोड आहे. 10 लाख कोटींचा अद्यापही शॉर्टफॉल आहे.

मुकेश अंबानी सर्वांत मोठा कर्जदार! :

डिसेंबर 2022 पर्यंत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजवर 3.04 लाख कोटींचे कर्ज होते. ‘ब्लूमबर्ग’नुसार पुढील दोन अडीच वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजला 2.5 लाख कोटी कर्ज फेडणे गरजेचे होते. यासाठी नवीन कर्ज घेऊन वा कर्जमाफी मिळवून अंबानी कर्जमुक्‍त होतात. सरकारला खड्ड्यात घालून कर्जमुक्‍त होणे ही उद्योजकांची युक्‍ती शेवटी जनतेला सहन करावी लागते. सरकार बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करताना जनतेची सर्रास लूट करत आहे. जनतेवर शेकडो प्रकारचे कर लादून लुबाडणूक केली जातेय. जीएसटीच्या नावाखाली तर पदोपदी सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. तिकडे मुकेश अंबानी स्वत:च्या मुलाच्या लग्‍नपूर्व सोहळ्यावर कोट्यवधींची उधळण करत आहे.

80 कोटी जनतेला रेशन :

मोदी सरकारच्या दाव्यानुसार 140 कोटी जनतेपैकी 80 कोटी जनतेला सरकार रेशन पुरवत आहे. म्हणजेच 80 कोटी जनता दारिद्र्यात जीवन जगत आहे. ही बाब निश्‍चितच नामुष्कीची आहे. देशाच्या अनेक भागात भूकमारी, कुपोषण सुरू आहे. बेरोजगारीने कळस गाठला आहे. अशा परिस्थितीत मुकेश अंबानी मुलाच्या लग्‍न सोहळ्यावरील खर्चाचे रेकॉर्ड तोडू पाहत आहेत. एक नाही तर दोन प्री-वेडिंगवर कोट्यवधींची उधळपट्टी होत असताना सर्वसामान्य जनता मूक होऊन बघत आहे. 


Save Journalism!, Save Democracy!!

DONATE...

BAHUJAN SHASAK MEDIA

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा) 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?