दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वृध्देचे आमरण उपोषण

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वृध्देचे आमरण उपोषण

-गंगाखेड नगर परिषद प्रशासनाची टोलवाटोलवी

-हक्‍काच्या पैशांसाठी दोन वर्षापासून सफाई कर्मचारी महिलेचा संघर्ष



समीर रोडे, परभणी :
प्रजासत्ताकदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्त झेंडावंदन, सलामी, कडक भाषणं, ढीगभर आश्‍वासनांची खैरात झडली जाईल. गेल्यावर्षी याच दिवशी कोणती आश्‍वासने दिली होती, याचा विसर ठरलेलाच. औपचारिकता म्हणून भारतीय संविधानाच्या उद्देशिका वाचनाचा सोहळा पार पडेल. ‘आम्ही भारताचे लोक... हे संविधान स्वत:प्रत अर्पण करीत आहोत...’, असे गर्वाने सांगितले जाईल. मात्र, संविधानानुसार वागणार नाही, असे वर्तन गंगाखेड नगर परिषदेचे प्रशासन करीत आहे. 60 वर्षाची वयोवृध्द महिला जीवघेण्या थंडीत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या हक्‍काच्या पैशांसाठी आमरण उपोषणाला बसली आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाशी खेटा घेऊनही उपयोग न झाल्याने या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
जनाबाई गणपती साबळे असे या सेवानिवृत्त सफाई कामगार महिलेचे नाव आहे. गंगाखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना त्यांनी 4-1-2022 व 19-1-2022 च्या विनंती अर्जान्वये पैसे न मिळाल्यास परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तथापि, प्रशासनावर त्याचा काहीएक परिणाम झालेला नाही, हे विशेष. प्रजासत्ताक दिनाची केवळ औपचारिकता पार पाडणार्‍या प्रशासनाला सामान्यजणांचे दु:ख कळू नये, यातून त्यांची असंवेदनशीलता लक्षात येते.
निवेदनात त्या म्हणतात, ‘मला वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरवून सेवानिवृत्त करण्यात आलेले आहे. माझी सेवा उपदान रक्‍कम 4,54,300/-रूपये व रजारोखीकरण 89,340/-रूपये अशी एकूण रक्‍कम 5,43,640/- मान्य करण्यात आलेली आहे. त्यापैकी 89,340/-रूपये प्राप्‍त झाले असून उर्वरित रक्‍कम मी सेवानिवृत्त झाल्यापासून वेळोवेळी अर्ज करूनही उपलब्ध झालेली नाही’. शिवाय 4 महिण्याचे पेन्शन एरियस रक्‍कम येणे थकित असल्याचे जनाबाई यांनी निवेदनात म्हटले आहे.
जनाबाई साबळे यांच्या विनंती अर्जाला वारंवार केराची टोपली दाखविण्यात आली. वास्तविक पाहता अनेकांना त्यांच्या हक्‍काची रक्‍कम अदा करण्यात आलेली आहे. मात्र, गरीब महिलेला कुणी राजकीय गॉडफादर नसल्याने त्यांची फरफट सुरू आहे. उतारवयात गुडघेदुखीने जर्जर झालेल्या जनाबाईंना ऑपरेशनसाठी पैसे हवे आहेत. निकड बघूनही गंगाखेड नगर परिषद प्रशासनाला पाझर फुटत नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे.
ऑपरेशन करावयाचे आहे
मी गेल्या दोन वर्षांपासून माझ्याच पैशांसाठी तगादा लावला आहे. माझ्या पायाचा आजार बळावल्याने ऑपरेशन करणे अनिवार्य आहे. त्यांना डॉक्टरांचे सर्टिफिकेट दाखवूनही काहीच फरक पडत नाही. म्हणून आमरण उपोषण करत आहे.
-जनाबाई साबळे, उपोषणकर्त्या, गंगाखेड
निधी उपलब्ध नाही
गंगाखेड नगर परिषदेकडे निधीच उपलब्ध नाही. सरकार निधी देत नाही. अशी प्रकरणे जवळपास 20 असून त्यांची रक्‍कम जास्त आहे. तरीही आम्ही टप्प्याटप्प्याने त्यांची रक्‍कम अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
-श्री. जाधव, मुख्याधिकारी
जाणीवपूर्वक सुरू आहे त्रास
आईचे गुडघे दुखताहेत. डॉक्टरांनी गुडघे रिप्लेशमेंट सांगितले आहे. दोन वर्षांपासून अर्ज विनंत्या करत आहे. मात्र, नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक आम्हा गरिबांना त्रास देत आहे. येथे सध्या प्रशासक असला तरी राजकीय हस्तक्षेपानेच कारभार हाकला जात आहे.
-शंकर साबळे, उपोषणकर्त्यांचा मुलगा, गंगाखेड

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?