रोहन माळवदकर (विजयस्तंभ स्मारकाच्या रखवालदाराचा बेईमान वंशज) संघाच्या गोटात आणि आनंद दवेच्या जिभेतील ऍस्पी फुत्कार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रोहन माळवदकर (विजयस्तंभ स्मारकाच्या रखवालदाराचा बेईमान वंशज) संघाच्या गोटात आणि 'आनंद दवे'च्या जिभेतील ऍस्पी फुत्कार
भारतीय भूप्रदेशांत अनेक जातीच्या विषारी सापाच्या प्रजाती अस्तित्वात आहेत. विशेषतः मन्यारी, घोंनस, कोब्रा प्रजाती ह्या जीवघेण्या म्हणून ओळखल्या जातात. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातील ASP ऍस्प जातीचा लाल रंगाचा छोट्या चणीच्या दीड फूटलांबीच्या ASP चे वैशिष्ट्ये असे की, ' तो त्याच्या अंगातून सतत रसायनयुक्त विष बाहेर फेकत असतो. एव्हढेच नव्हे तर तो जिथे वास्तव्यास असतो तिथे कुठलीच वनस्पती उगवत नाही. त्याच्या त्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे दक्षिण आफ्रिकन लोकं ASP चे वास्तव्य चटकन ओळखतात. तशाच एका विदेशी प्रजातींपैंकी ब्रा.म.संघाचा आनंद दवे असायला हवा!'
एक तर छत्रपती शिवरायांनी कष्टाने अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या मदतीने रक्ताच्या आहुत्या देऊन निर्माण केलेले रयतेचे राज्य उणे पुरे 39-40 वर्षेच टिकवले. 17 नोव्हेंबर 1713 ते 1818 अशी 104 वर्षे 44 दिवस पेशव्यांची निरंकुश सत्ता.त्यांच्याच सत्तेतील 14 जानेवारी 1761 च्या पानिपतातील नामुष्कीयुक्त हार फुकाचा विजयात रूपांतरित केली. कालचे रोहन माळदकरांचे 204 वर्षांनी भीमा कोरेगांवच्या लढाईच्या अनुषंगाने लिहिलेली अनैतिहासिक पुस्तिका आणि त्या दवे नावाच्या ऍस्पने केलेली त्याची पाठराखण अन् त्याचा विषारी फुत्कार म्हणजे त्याला संघीय किनार आहे. जे अनैतिहासिक आहे, जे अवैज्ञानिक आहे त्याच्या कुलीन इतिहासकार व लादलेल्या सांस्कृतिक दहशतवादाच्या आधारे वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न करणे, जो वैभवशाली इतिहास, बहुजनांतील शूर-विरांच्या गाथा त्या असत्य व विस्मरणांत टाकणे, त्यासाठी ओबीसीच्या भुजबळ-अमोल कोल्हे असो की, हा अगदीच नगण्य माळवदकर असो, त्यांना हताशी धरून असत्य पेरण्याचा प्रयत्न वारंवार झाला सुद्धा.
जसा या देशाचा राजधर्म बौद्ध धर्म व बौद्ध संस्कृती ई स.पूर्व 528 ते ई.स.नंतर 712 पर्यंत 1240 वर्षें अव्याहतपणे चालली. तो धर्म पुढे 12 व्या शतकापर्यंत (मोगल आगमनापर्यंत) टिकून राहिला, ते चिरसत्य वैदिक संस्कृतीने मोडण्याचा प्रयत्न केला, तो असफल झाला. तसेच अनेक ऐतिहासिक घटनांची वास्तव नोंद न घेता वैदिकांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ऐतिहासिक सत्याची अदला-बदल केली गेली. जसे की,..
(1) विद्येच्या आद्य देवतेची जागा सावित्रीबाई फुले ऐवजी अशिक्षित, अनपढ सरस्वतीला बहाल केली (जिचा जन्म कुठे, केव्हा, कुणाच्या पोटी, काहीही पुरावे नाहीत).
(2) 23 जानेवारी 1664 ला शहाजी राजे यांचा मृत्यू झाला. मात्र माँ जिजाऊ सती गेल्या नाही. माँ जिजाऊंनी 165 वर्षांपूर्वी सतीची चाल बंद करूनही 1829 साली बंगालचे राजाराम मोहन रॉय यांच्या खात्यांत ते श्रेय टाकून रॉयना जिजाऊच्या जागी बसवले.
(3) पुणे-जेजूरी- पुरंदरचा परिसरातील (भिवरी-किकरी) उमाजी नाईक (बेरड) आद्य क्रांतीकारक (1841 ला फासी) असूनही एक (13 वर्षीय) सैन्य कारकून वासुदेव बलवंत फडके याला नाईकांच्या जागी बसवले.
(4) आदिवासी शूर झलकारीबाईच्या जागी झाशींची राणी लक्ष्मीबाई बसवली.
अशा अनेक ऐतिहासिक चौर्यकर्म करण्याच्या सवयी वैदिकांना जडलेल्या होत्या. ते कांही काळापर्यंत टिकले अन् झाकूनही गेले.
पण 19 व्या शतकांत महात्मा फुले नांवाच्या थोर क्रांतीकारी इतिहासकाराने व पुढे बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महाज्ञानसूर्याने या अनैतिहासिक गोष्टींचा जगासमोर पर्दाफाश केला. तेव्हा प्राचीन बौद्ध धम्म संस्कृती आणि शेकडो ऐतिहासिक वास्तव समोर आले. हीच सनातनी, संघ आणि आनंद दवे सारख्या ऍस्पची अडचण ठरतेय. म्हणून इतिहासाचे विकृतीकरण करण्याच्या रूढ सवयी पुन्हा पुन्हा डोके वर काढताहेत. माळवदकर सारखा एक सामान्य (रखवालदार) प्यादा हाताशी धरून त्यांच्या समर्थनार्थ ऍस्प जसा रसायनयुक्त विष शरीरातून फेकतो तसा दवेच्या जिभेतून विषारी फुत्कारी वक्तव्य बाहेर पडले.
1 जानेवारी 2018 ची भीमा-कोरेगांव ची दंगल भिडे-एकबोटे-दवे आदी प्रवृत्तीने पूर्वनियोजित घडवली खरी; पण तिचे पडसाद जेव्हा जागतिक स्तरावर उमटायला लागले तेव्हापासून भीमा-कोरेगांच्या लढाईच्या निमित्ताने पेशवाईच्या अत्त्याचारी कहाण्या आणि त्यांचा खोटा इतिहास पुढे येताना दिसतोय म्हंटल्यावर माळवदकराच्या माध्यमातून ऐतिहासिक सत्त्यावर, तळपणार्या सूर्याकडे तोंड करून थुंकण्याचा केलेला हा क्षुद्र प्रयत्न.
ब्रिटिश सरकारने भीमा-कोरेगांवच्या लढाईनंतर 26 मार्च 1821 रोजी भव्यदिव्य विजयीस्तंभाचा शानदार पायाभरणी समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न केला. बंदुकीच्या फैरी अन् तोफांची राजसलामी देण्यात आली. 1822 रोजी त्या विजयस्तंभाचे काम पूर्ण झाले.
1 जानेवारी 1927 रोजी बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान इतिहासतज्ञाने ग्रँड डफ व अन्य भारतीय- ब्रिटिश इतिहासकारांच्या इतिहासाचे वाचन केल्यानंतर भीमा कोरेगांवास भेट दिली याचा अर्थ काय?
1941 ते 1946 व आजही महार रेजिमेंटच्या कॅप बॅजवर भीमा कोरेगांवच्या विजयीस्तंभाचे प्रतीक लावण्यात आले होते. तेव्हा भारत सरकारच्या संरक्षण व पुरातत्व खात्याने हे का मान्य केले?
या माळवदकर वंशजांनी आत्ता जे पुस्तक लिहून जो दावा केला आहे त्याचा पूर्वज विजय स्तंभाची देखभाल करणारा रखवालदार होता. विजयी स्तंभास एकूण 12 एक्कर जमीन दिली होती. यांच्याच पूर्वजांनी ती जमीन गिळंकृत केली. हडप केली. खोटे महसुली दस्ताऐवजाद्वारे मालकी हक्कांमध्येसुद्धा ही जमीन लावून घेतली.
पुढे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी, इतिहास संशोधकांनी ही मूळ दस्ताऐवज काढून तहसीलदार हवेली, उपविभागीय दंडाधिकारी हवेली, जिल्हा पुणे यांच्या न्यायालयात जेव्हा दाद मागितली तेव्हा त्या 12 एक्कर जमिनीचा निकाल विजयस्तंभाचे स्मारकाच्या बाजूने लागला. पुढे विभागीय आयुक्त पुणे यांनी सुद्धा तो निकाल कायम ठेवला. सध्या हे प्रकरण मा. उच्च न्यायालय मुंबई येथे न्याय प्रविष्ट आहे. तेथे पण निकाल स्मारकाच्या बाजूने लागणार याची 1000% खात्री या माळवदकर नावाच्या लुटारूस भनक, चाहूल लागल्याने त्याने हे पुस्तक आनंद दवे आदींचे हस्तक बनून जाणीवपूर्वक लिहिण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.
माझा त्या माळवदकरला प्रश्न आहे की,
(1) तुम्ही स्मारकाचे रखवालदार माळवदकर यांचे नात्याने कोण आहात?
(2) भीमा-कोरेगांवच्या लढाईमध्ये पराजय झाल्यानंतर शनिवारवाड्यावरील पेशव्याचा भगवा ध्वज काढून इंग्रजांनी त्यांचा युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकावला या जागतिक इतिहासातील नोंदी खोट्या आहेत हे तो सिद्ध करून दाखवेल का?
(3)स्मारक रखवालदार माळवदकर हा जमीन हडप करणारा, लुटारु बोगस, बेईमान आहे, हे महसूल न्यायालयाने नोंदवलेले निष्कर्ष मान्य आहेत का?
(4) माळवदकर यांच्याकडे ऐतिहासीक पुरावे आहेत का?
(5) एकूण किती सिद्धनाक झाले या बाबतचे ज्ञान आहे का? खरड्याच्या लढाईतीलनिजाम विरुद्ध मराठे (1795) सिद्धनाक दुसरा हा मराठ्यांच्या बाजूने लढला हे तरी माहीत आहे?
(6) ते इतिहास संशोधक आहेत काय?
(7) असल्यास संशोधनाची मान्यता मिळाली आहे की नाही त्या बाबतचे शोधनिबंध (Thesis Theory)घोषित केले आहेत काय?
(8) या पैकी कांहीच दस्ताऐवज, पुरावे, अभिलेखे नसतील तर त्यांच्या वंशजांनी हडप केलेल्या जमिनीच्या निराशेतून हे पुस्तक लिहिण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यांच्या पाठीमागे संघ/सनातनी हात असण्याची दाट शक्यता तर आहेच; पण एका नागवंशीय शूर जमातीचे शौर्य पुसण्याचा पुसटसा प्रयत्न आहे.
त्याला प्रसद्धी मिळावी हा एक स्टंटबाजीचा क्षुद्र प्रकार आहे.त्याला माध्यमानी विशेष प्रसिद्धी देऊ नये. सतत भ्रम, असत्य फैलावणे हा वैदिकांच्या रक्तातील गुण आहे. कारण ते अनैतिहासिक आहे बस्स एव्हढेच!
-(अनंतराव सरवदे, सेवानिवृत्त तहसीलदार, बीड.) |
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा