विश्वनिर्मितीचे गूढ उकलणारा दुर्मीळ ग्रंथ!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विश्वनिर्मितीचे गूढ उकलणारा दुर्मीळ ग्रंथ!
-महात्मा जोतीराव फुले लिखित; परंतु समग्र वाङ्मयातून सुटलेले बहुप्रतिक्षित ‘निर्मिकाचा शोध’ आणि ‘मनुस्मृतीचा धिक्कार’ वाचकांच्या भेटीला
भास्कर सरोदे, औरंगाबाद :
औरंगाबाद येथील जीवक प्रकाशनने महात्मा जोतीराव फुले यांच्या ‘निर्मिकाचा शोध’ आणि ‘मनुस्मृतीचा धिक्कार’ या दोन दुर्मिळ ग्रंथाचा एक संयुक्त ग्रंथ बनवून वाचकांच्या सेवेशी सादर केला आहे. राजमाता जिजाऊ जयंतीदिनी हा बहुमूल्य ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. ज्येष्ठ सत्यशोधक जी. ए. उगले यांनी प्रस्तावना लिहून या ग्रंथाची उपयुक्तता समाजासमोर ठेवली आहे. तर संपादक भास्कर सरोदे यांनी संपादकीयामधून विश्वाची निर्मिती या अनुषंगाने महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांना उजाळा दिला आहे. विश्वनिर्मितीचे गूढ, विश्वाचा निर्माता देव आहे काय? या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथातून मिळणार आहेत. त्यादृष्टीने हा ग्रंथ अनमोल ठरणार आहे.
मराठा राज्य समाप्तीसाठी या बाजीरावांचा जन्म! :
सत्यशोधक जी. ए. उगले आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, ‘दुसर्या बाजीरावांनी 23 वर्षे पेशवाई राजसत्ता उपभोगली. या 23 वर्षाच्या कालखंडात अन्य पेशव्यांप्रमाणे डोळ्यात भरणारी एकही लष्करी मोहीम त्यांनी राबविली नाही. क्षात्रधर्म अंगीकारला; पण या पेशव्यांनी क्षात्रधर्मालाच तिलांजली दिली. क्षात्रधर्माऐवजी कर्मकांड, पूजापाठ, ऐषआराम, चैनविलासात हे पेशवे आयुष्य कंठित केले. दिवसप्रहर एकपर्यंत पूजाअर्चा आटोपल्यावर, हे श्रीमंत पेशवे शनिवारवाड्यात जमणार्या सरदार जाहगीरदारांच्या देखण्या मनकवड्या, खट्ट्याळ बोलघेवड्या स्त्रियांच्या घोळक्यात रममाण होत असत. तेव्हा वाड्यावर येणार्या गरजवंतांना रिकाम्या हाताने परतावे लागे. त्यातच रिकामटेकड्या, पोटार्थी ब्राह्मणांच्या पंक्ती दर भोजनपंक्ती उठवित असत. हे पोटार्थी खुषमस्करे ब्राह्मण, दुसर्या बाजीरावांना ‘कृष्ण’ आणि ‘शिवांचा अवतार’ असल्याचे संबोधित असत. तेव्हा या देवाधिदेवांच्या उपाधीने श्रीमंत बाजीरावांना जन्माचे सार्थक झाल्याचे व कृत्यकृत झाल्याचे समाधान वाटत असे. ब्राह्मणांच्या या उपाधींनी ते मनोमन हरखून जात असत. दुसरीकडे दुसर्या बाजीरावांना मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाचा, या चंगळ वातावरणात पूर्णपणे विसर पडला. सामान्य जनतेच्या हितार्थ निर्माण झालेले स्वराज्य, दुसर्या बाजीरावांनी आद्यछत्रपतींच्या राज्यकारभारशाहीच्या विरूद्ध उफराटी राज्यकारभाराची चाल पाडून लयास नेले. या उफराट्या चालीमुळे अवघ्या पावनेदोनशे वर्षात मराठा साम्राज्य पडले. जणूकाही मराठा राज्य समाप्तीसाठी या बाजीरावांचा जन्म झाला होता की काय न कळे!’
दीक्षा शिंदेला जिवे मारण्याच्या धमक्या :
संपादकीयमध्ये भास्कर सरोदे यांनी विश्वनिर्मितीच्या अनुषंगाने विविध थिअरींचा धांडोळा घेतला आहे. औरंगाबादची 15 वर्षीय दीक्षा शिंदे ‘नासा’च्या ‘अर्थ सायन्स’च्या पॅनलवर अध्यक्ष म्हणून आहे. मात्र, अलीकडे तिला आणि तिच्या कुटुंबीयांना खूप मोठ्या मानसिक छळाला सामोरे जावे लागले. त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. दीक्षा शिंदेनी ‘नासा’च्या पॅनलवरून पायउतार व्हावे. ‘नासा’ने दीक्षावर बॅन करावा…आदी…आदी. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले असता सायबर शाखेने धक्कादायक माहिती उजेडात आणली. दीक्षा शिंदेच्या आईच्या मोबाईलमध्ये घुसखोरी करून या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्यांचे ईमेल पाठविण्यात आले. दीक्षा शिंदेंचा गुन्हा काय? त्यासाठी वाचा महात्मा जोतीराव फुले लिखित; परंतु समग्र वाङ्मयातून सुटलेले बहुप्रतिक्षित ‘निर्मिकाचा शोध’ आणि ‘मनुस्मृतीचा धिक्कार’ या ग्रंथाचे संपादकीय.
महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिलेल्या पुस्तिका दुर्मीळ आहेत. अत्यंत क्रांतीकारी विचारांनी ओतप्रोत भरलेल्या या पुस्तिका वाचकांना अनेक प्रश्नांची उत्तरे देणार्या आहेत. दोन पुस्तिकांचा मिळून तयार झालेला ग्रंथ लग्नकार्यात, वाढदिवसाला, सणासुदीला भेट म्हणून देण्यासारखा आहे. वाचक या संधीचा लाभ घेतील असा विश्वास आहे. खरे तर हा ग्रंथ सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीलाच (3 जानेवारी 2022) प्रकाशित करण्याचे नियोजित होते. तथापि, सरकारने लादलेल्या कोरोना महामारीमुळे जाहीर प्रकाशन करता आले नाही. प्रकाशनपूर्व नोंदणी करणार्या वाचकांना जास्त दिवस ताटकळत ठेवणे योग्य वाटले नाही. त्यामुळे कुठलेही औपचारिक प्रकाशन न करता राजमाता जिजाऊ जयंतीदिनी हा ग्रंथ थेट वाचकांच्या भेटीला आणला आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
पुस्तकासाठी संपर्क :
7875451080जीवक प्रकाशन, औरंगाबाद.
पुस्तकाची पाने : 64
किंमत : 60 रूपये
(स्पीडपोस्ट अथवा कुरियरचा खर्च वेगळा)
बुकींग :
Amita Bhaskar SarodeSBI A/C No : 34783131199
IFSC Code : SBIN0010791
Branch : MIT, Aurangabad.
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक' नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा