दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

छत्रपती संभाजीनगरात विद्रोह!

छत्रपती संभाजीनगरात विद्रोह! 


19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक राणा

भास्कर सरोदे, छत्रपती संभाजीनगर :

‘विषमतेला नकार आणि समतेला होकार’ देत ब्राह्मणी, भांडवली, पुरुषसत्ताक मूल्य आणि विषमतावादी सांस्कृतिक विचारांविरोधात ठाम भूमिका घेत पर्यायी साहित्य आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणार्‍या विद्रोही साहित्य चळवळीची व्यापकता जनमानसात रूजू पाहते आहे. 19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या चळवळीचा झंझावात दुसर्‍यांदा औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे घोंगावणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक, सुप्रसिद्ध इतिहास संशोधक तथा भाषातज्ज्ञ डॉ. अशोक राणा यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यसंघटक किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष अभियंता सतीश चकोर, निमंत्रक अ‍ॅड. धनंजय बोरडे, खजिनदार अ‍ॅड. के. ई. हरिदास उपस्थित होते.

विद्रोही संमेलनाचा आधार :

विद्रोही सांस्कृतिक चळवळ 1999 पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे. सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा विद्रोहीचा वैचारिक जाहीरनामा आहे. न्या. म. गो. रानडेंनी ग्रंथकार सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण महात्मा जोतीराव फुले यांना दिले तेव्हा ‘तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित होईल याचे बीज नाही’, असे म्हणत महात्मा फुले यांनी ‘उंटावरून शेळ्या वळणार्‍या घालमोड्या दादाच्या’ त्या संमेलात सहभाग होण्यास ठाम नकार दिला होता. आमचे ग्रंथकार तयार होतील, तेव्हा ते स्वाभिमानाने आपली संमेलने भरवतील असेही म्हटले होते. ग्रंथकार सभेचे 20 व्या शतकातील स्वरूप म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. हाच आधार विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला आहे.

तीन दिवस विद्रोही संमेलन :

दि. 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील आमखास मैदानावर संविधान मूल्यांना समर्पित 19 वे विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे. लोकसाहित्य व संस्कृतीचे अभ्यासक, इतिहास संशोधक व भाषातज्ज्ञ डॉ. अशोक राणा (यवतमाळ) हे अंमळनेर येथे भरलेले 18 वे विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामीण साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्याकडून सूत्रे हाती घेतील. संमेलनाचे उद्घाटन आश्‍चर्यकारकपणे दुसर्‍या राज्यातील साहित्यिकाच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.


छत्रपती संभाजीनगर : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांना प्रा. डॉ. राजेंद्र शेजूळ लिखित ‘संविधान : संभ्रम आणि वास्तव’ हा ग्रंथ भेट देताना जीवक प्रकाशनचे प्रकाशक तथा बहुजन शासकचे संपादक भास्कर सरोदे.


कोण आहेत डॉ. अशोक राणा? :

डॉ. अशोक लक्ष्मीबाई नारायणराव राणा यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1955 रोजी तारखेडा, अमरावती येथे झाला. माध्यमिक विद्यालयात कलाशिक्षक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे अध्यापक, अमरावती येथील महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागातून 2015 साली सेवानिवृत्त झाले आहेत. 1967 पासून त्यांनी लेखनास प्रारंभ केला आहे. अनेक विद्यापीठांत त्यांची साहित्य संपदा समाविष्ठ. चित्रलेखातील ‘असत्याची सत्यकथा’ आणि ‘मातृपूजन विश्‍वभजन’ या लेखमाला अतिशय वाचकप्रिय आहेत.

डॉ. अशोक राणा यांचा साहित्य क्षेत्रातील जन्मच ब्राह्मणी साहित्याच्या विद्रोहातून झालेला आहे. अत्यंत निर्भिड, स्पष्टवक्‍तेपणा, संदर्भाने परिपूर्ण अशी त्यांची लेखनशैली मराठी साहित्य क्षेत्रात परंपरावाद्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. समाजातील अज्ञान, भ्रम घालवण्याचा निकराचा त्यांचा प्रयत्न असतो. इतिहासातील अनेक संज्ञांचा निष्ठेने त्यांनी उलगडा केलाय. साहित्यासह अनेक ज्ञानक्षेत्रांना त्यांचा स्पर्श झाला आहे.

डॉ. अशोक राणा हे मराठी साहित्य, भाषा, इतिहास, लोकसंस्कृती, प्रबोधन, संत वाङमय, आधुनिक समीक्षा, चित्रकला, नाट्य अशा विविध विषयांमध्ये पारंगत संशोधक म्हणून ख्यातनाम आहेत. त्यांची संशोधन व प्रबोधनपर 76 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी ‘विलास सारंग यांच्या कथांवरील अतिवास्तववादी छाया’ तसेच ‘मराठी कथा व कवितांमधील नाग मिथक व प्रतिमा’ अशा आधुनिक व प्राचीन विषयांवरील अभ्यासापासून तरुण वयात संशोधनाला सुरुवात केली. त्यांनी भाषा व साहित्य या विषयात पाच ग्रंथ, प्राचीन इतिहास-मिथके-पुरातत्व-सण-उत्सवमध्ये 23, प्रबोधनपर-13, संत वाङमयसंदर्भात 5, जिजाऊ, शिवकाल, छत्रपती संभाजी, आहिल्यामाई या मध्य युगाच्या अंतिम चरणातील इतिहासाबद्दल 11, धर्म-ब्राह्मण धर्म, शिवधर्म 5 व संशोधन पद्धतीसंदर्भात 3 अशी 76 पुस्तके लिहिलेली आहेत. पाश्‍चात्य व आफ्रिकी मातृदेवता, भगवत गीतेतील चार्वाक, सरस्वतीची सत्यकथा, कॉ. शरद पाटील यांची मिथक चिकित्सा, बसवेश्‍वरांचा देव आदी विषयांसंदर्भातील 26 पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

डॉ. अशोक राणा यांना प्राप्‍त पुरस्कार :

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यसेवा पुरस्कार,

समता रैली समिती, अमरावती,दि. 14-04-2006, हस्ते आ. बच्चू कडू.

2) साहित्यरत्न राष्ट्रीय पुरस्कार, डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, शेगाव, दि.27-03-2010, हस्ते मा. शशीकांत खेडेकर, अध्यक्ष, जि.प. बुलढाणा.

3) विश्व पुस्तक दिनानिमित्त सन्मानपत्र, मनोविकास स्पेशल चिल्ड्रेन एज्युकेशन सोसायटी, अमरावती, दि.25-10-2010, हस्ते- डॉ. बबन बेलसरे.

4) प्राइड ऑफ प्लानेट पुरस्कार, पी. सी. बी. एस. एम. आर. इन्स्टिट्युट, इंडिया, दि.02-10-2012, हस्ते डॉ. देवीसिंह शेखावत.

5) सर्वोत्कृष्ठ वार्षिकांक पुरस्कार, समिधा-2015,

 सं. गा. बा. अमरावती विद्यापीठ, अमरावती, दि.-1-05-2015, हस्ते कुलगुरू डॉ. मोहन खेडकर.

6) डॉ. आ. ह. साळुंखे प्रतिभा गौरवपुरस्कार, प्रतिभा साहित्य संघ, महाराष्ट्र,2018

7) मराठवाडा साहित्य परिषदेचा भगवंत देशमुख विशेष वाङमय पुरस्कार,2024.


आनंद झाला...

परिवर्तनवादी चळवळीचे केंद्रस्थान तथा बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ठिकाणी होणार्‍या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवड झाली, हे कळल्यावर खूप आनंद झाला. कारण माझं पहिलं पुस्तकच ब्राह्मणांच्या जातीवादाविरोधातील आहे. वयाच्या 26 व्या वर्षी ‘साहित्यातील जात्यंधांची झुंडशाही’ या पुस्तकातून मी पारंपरिक मराठी साहित्याच्या विरोधात बंड पुकारात विद्रोह केला आहे. माझ्या या प्रयत्नाकडे प्रस्थापित साहित्यिकांनी फारच तुच्छतेने पाहिले होते. त्यांच्यापासून वगळल्यानंतर मला दलित पँथर, कम्युनिस्ट आणि बहुजन समाज पार्टीने जवळ केले. तेथे माझा खूप सन्मान झाला. यामुळे मला फुले-शाहू-आंबेडकर खर्‍या अर्थाने समजले, हे मी प्रांजळपणे कबूल करतो. तोच आधार माझ्या साहित्याचा राहिला आहे. 

-डॉ. अशोक राणा, यवतमाळ.

Save Journalism!, Save Democracy!!

DONATE...

BAHUJAN SHASAK MEDIA

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा) 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?