दात्यांना आवाहन : वॉचमनकी करून विद्यार्थी देतोय झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे…विद्यार्थीही असे की ज्यांच्याकडे वह्या, पुस्तकं, शालेय साहित्याचा अभाव!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दात्यांना आवाहन : वॉचमनकी करून विद्यार्थी देतोय झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे…विद्यार्थीही असे की ज्यांच्याकडे वह्या, पुस्तकं, शालेय साहित्याचा अभाव!
भास्कर सरोदे, औरंगाबाद (21 सप्टेंबर 2021) :
‘विश्वगुरू’ भारतातील औरंगाबाद या ‘ग्लोबल खेड्या’मधील भाग्यनगरातील झोपडपट्टीत ‘बिना छताची शाळा’ सुरू आहे. स्वत: वॉचमनकी करून एलएलबीचा विद्यार्थी मुले-मुली शिक्षण प्रवाहाबाहेर जाऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देत आहे. जिथे विद्यार्थ्यांकडे वह्या, पुस्तकं, शालेय साहित्याचा अभाव आहे. दोन्ही बाजुंनी अभावग्रस्तता; पण इच्छाशक्तीची श्रीमंती आहे. कोडग्या सरकारचे जाऊ द्या, दात्यांनो, एकदा तिथे जाऊन तर बघा, तुमच्या र्हदयाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही.
कोरोनाचे कारण पुढे करून सरकारने शाळेची कवाडं बंद केली. मुठभर श्रीमंतांची मुले-मुली मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉपवर ऑनलाईन आहेत, मात्र शिक्षणाचे माहिती नाही! वर्ष दोन वर्षे शाळा बंद झाल्या की, कोट्यवधी विद्यार्थी शाळाबाह्य होणार हे निश्चित. शाळाच नसल्याने भारताचे भविष्य अंधारात जाणार, हे सांगण्यासाठी भविष्य नसलेल्या भविष्यवेत्त्याची गरज भासणार नाही. वरून नवीन शिक्षण धोरणानुसार परदेशी विद्यापीठं, शाळा, महाविद्यालयांचा बाजार भरणार…कुणालाच गम नाही! चार दोन डोक्यांची ओरड सुरू आहे…बस्स! लोकशाहीत एका मताला मूल्य; पण एक आवाज दडपण्यासाठी सारी कसरत सुरू आहे. देशातील सार्वजनिक संपत्तीची विक्री जोरात, बाकी सारे अलबेल आहे!
प्राचीनकाळी ज्ञानकेंद्र असलेल्या आणि ऐतिहासिक पर्यटनाचा वारसा लाभलेल्या औरंगाबादेत भाग्यनगर ही उच्चभू्रंची वस्ती. या वस्तीच्या मधोमध 30-40 घरांची झोपडपट्टी. तिच्यावर तथाकथित बिल्डरांचा डोळा. बाबापेट्रोल पंपजवळ असलेली; पण नजरेस न पडणार्या या वस्तीतील चंद्रकला गढवे यांच्या खोलीत भगवान हिंमतराव सदावर्ते हा तिशीतील युवक विद्यार्थ्यांची शाळा घेतोय. शाळा कसली पडक्या भिंतीवर जीर्ण झालेली, हजारो छिद्रे आणि फाटलेली तुटलेली पत्रे टाकून खोलीवजा आडोशात ही शाळा भरते. पहिली ते नववीपर्यंतचे मुलं तिथे तास-दोन तास शिकतात. लाकडाच्या पाट्यांवर पाढे लिहिलेले, ओल्या जमिनीवर सतरंजी आणि चटई, भिंतीवर खूपच छोटा फळा, आजुबाजुला अस्ताव्यस्त पडलेले सामान. फक्त बसण्यापुरती जागा विद्यार्थ्यांनीच स्वच्छ केलेली. अशा विदारक परिस्थितीत भगवान या विद्यार्थ्यांचे भाग्य बदलायला निघालाय. वस्तीचे नाव भाग्यनगर; मात्र, विद्यार्थ्यांच्या भाग्यात साधं शिक्षणही नाही. बाजुलाच राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे प्रल्हाद भवन. जिथून मराठवाड्याचा कारभार हाकला जातो. त्यांच्याही ‘दक्ष’ नजरेला रस्त्यावर फिरणारी ही मुलं-मुली कधी दिसले नाहीत. कशी दिसणार? आता या कच्चा मालाची गरज संपलीय!
दात्यांना विनंती
भगवान सदावर्ते हा युवक गोर-गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहे; परंतु त्या विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साहित्य घेण्याकरीता पैसे नाहीत. झोपडपट्टीतील या मुला-मुलींना शैक्षणिक साहित्याअभावी शिकवताना अडचण येत आहे. त्यांच्याकडे शालेय साहित्य नाही. दात्यांनी त्यांना वह्या, पुस्तकं, कंपास, पेन्सिल, ड्रॉईंगबूक्स, स्केचपेन, कलरबॉक्स द्यावे, ही विनंती.
संपर्क : 9595957762
बुलढाणा जिल्हा, लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे या गावचा भगवान सदावर्ते. दोन एकर कोरडवाहू जमीन. आई-वडील मोलमजुरी करतात. पाच बहिणी, पाच भाऊ असा मोठा परिवार. चार बहिणींचे लग्न झालेले. सर्वात छोटी नववीत. एक भाऊ सिंहगड अभियांत्रिकीला, दुसरा श्रीनगरला अभियांत्रिकीला, एक जेईईची तयारी करतोय तर शेवटचा नववीत आहे. नववीतील दोघेही सुट्टीच्या दिवशी मोलमजुरीला जातात. भगवान शक्तीनगरातील एका अपार्टमेंटवर वॉचमन म्हणून काम करतो. साफसफाई करतो. राहण्याची सोय झाली. मेसचा खर्च देवगिरी कॉलेज मुलींच्या वसितगृहाच्या रेक्टर लता जाधव करतात. परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मित्रमंडळी मदत करतात. औरंगाबादेत एलएलबीचे शिक्षण घेत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करतो. कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद झाल्याने शक्तीनगरमधील स्मशानभूमीजवळील झोपडपट्टीतील मुले सैरभैर झाली, रस्त्यावर खेळू लागली, शिक्षणापासून दुरावली. असेच जर सुरू राहिले तर या मुलांचे भवितव्य धोक्यात येईल, म्हणून भगवानने एका पडक्या जागेत शाळा सुरू केली. मुलांना गोडी लागली तशी मनुवाद्यांच्या पोटात कळ उठली. शाळा बंद पाडण्यासाठी फिल्डिंग लावली. धमक्या दिल्या. भगवानने पोलीस ठाण्यास कळविले, तेव्हा कुठे सुरळीत सुरू आहे. भाग्यनगरातील झोपडपट्टीत पालकांचे मन वळवून त्याने शाळा सुरू केली. रेल्वेस्टेशन जवळील राजूनगरातही शाळा सुरू केली; परंतु जाण्यायेण्याचा खर्च परवडत नसल्याने ती बंद आहे. आता या दोन शाळांत सुमारे 60 मुले-मुली आहेत.
फुले-शाहू-आंबेडकरांची प्रेरणा
मोद्यानी शिक्षण बंद केलं…
या मोद्यानी शिक्षण बंद केलंय. त्यामुळं ही पाखरासारखी मुलं रस्त्यावर फिरायला लागलीत. गुरूजींनी शाळा सुरू केल्याचे कळताच मी स्वत: जाऊन खातरजमा केली. त्यांना या मुलांचे खूप आशीर्वाद लागतील. आपण खूप चांगलं काम करत आहात, आम्ही सोबत राहू.
-कमलबाई शिंदे (झोपडपट्टीतील आजीबाई)
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक' नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
ग्रेट वर्क
उत्तर द्याहटवाI spoke to Bhagwan Sadavarte and would provide maximum possible assistance from my side as well from our group.
उत्तर द्याहटवानिःशब्द..
उत्तर द्याहटवाजाडजूड पगारी घेणारे लोक जरा याकडे लक्ष वेधतील काय?