पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

न्याय मांगती देश की बेटी...

इमेज
न्याय मांगती देश की बेटी … निषेध! निषेध!! निषेध!!! न्याय मांगती देश की बेटी … विचार करा लोकशाहीत हे हाल आहेत … तर राजेशाहीचा तर विचारच करायला नको. चूक कुठे झाली? सरंजामदार आणि भांडवलदारांची अजोड युती समजून घेताना … पक्ष कोणताही असो … जिथे सरंजामदार आणि भांडवलदारांचे प्रभुत्व तो पक्ष आमचा नाही. वेळ निघून जात आहे … देशासाठी मेडल जिंकून देणार्‍या भारताच्या मुलींना कसं फरफटत नेलं जात आहे... आम्ही सारे मूक-बधिर होऊन ऐकत-बघत आहेत. ही वेळ आमच्यावरही येऊ शकते! म्हणून सरंजामी, भांडवली, वसाहतवादी, हिटलरी प्रवृत्तीचा निषेध नोंदवा. स्वत:पासून सुरुवात करा. फरक पडता है साहब! Tweet by Sakshi Malik: भास्कर सरोदे मुख्य संपादक बहुजन शासक

भीममयी वामनदादा !

इमेज
भीममयी वामनदादा ! या महिन्याच्या 15 तारखेला वामणदादांचा 19 वा स्मृतीदिवस येऊन गेला. त्या एका दिवसाने वामणदादांच्या सार्‍या आयुष्याच्या जीवनपट नयनचक्षुसमोर उभा राहिला. त्यांचा संघर्ष उभा राहिला! व काही प्रश्नही उभे राहिलेत..! ते सर्व नव्याने समजून घेताना वामनदादांचं बाबासाहेबमय होणं, भीममय होणं , हे मला अधिक भावलं! ते चुक होतं का बरोबर हा प्रश्न नाही, मात्र ‘त्याने’ वामनदादांवर काय प्रभाव पडला..., त्याचे परिणाम काय झाले? हा कुतुहलजन्य प्रश्न माझ्या मनात उत्पन्न झाला व तो शोधता शोधता... ह्या लेखाचा जन्म झाला...!  इतिहासातील प्रश्नांना वर्तमानात उत्तर नसले, तरी त्या संभाव्य उत्तरांचा मागोवा जरुर आपण घेवू शकतो.., त्यांची समीक्षा करू शकतो..! त्यानिमित्ताने काही ऐतिहासिक उत्तरं आपल्यापरीने शोधू शकतो...! व वर्तमानात ऐतिहासिक व्यक्तिरेखांची उजळणी करताना काही नवीन मांडणी करू शकतो. लेखकाचे, इतिहासकाराचे, भाष्यकाराचे हेच तर काम असते...! चला तर मग, वामनदादांना ‘समजून’ घेवू या...! 15 ऑगस्ट 1922 साली सिन्नर तालुक्यातील देशवंडी उर्फ दुसोंडी या छोट्याशा गावात जन्मलेले वामनदादा दुःखाचा भला मोठा ड...

गौतमी पाटील : शाहीर संभाजी भगत यांच्या पोस्टने वर्मी घाव

इमेज
  गौतमी पाटील : शाहीर संभाजी भगत यांच्या पोस्टने वर्मी घाव मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावं लागणं हेच मुळापासून बंद व्हावं असं का वाटत नाही? औरंगाबाद : नृत्यांगना गौतमी पाटीलचे नाव महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत आहे. एकीकडे तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळते, तर दुसरीकडे तिच्या डान्सवरून वादही होताहेत. तिच्या ‘पाटील’ आडनावावरून मराठा संघटनांनी वाद पेटवला असून आडनाव बदल अन्यथा तुझे कार्यक्रम होऊ देणार नाही, अशा धमक्या दिल्या जाताहेत. पुरुषी आणि जात्यांध मानसिकतेच्या विरोधात काही कलाकारांनी या वादात उडी घेतली आहे. अभिनेते किरण माने यांच्यानंतर शाहीर संभाजी भगत यांनी तर ‘ मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावं लागणं हेच मुळापासून बंद व्हावं असं का वाटत नाही?’, असा सवाल केला आहे. त्यांची पोस्ट सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. गौतमी पाटील काही महिन्यांतच प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तिच्या नृत्यावर लाखो लोक घायाळ होत असताना ती करत असलेले नृत्य, तिच्या चेहर्‍यावरील हावभाव, हातवारे याला काहीजण विरोध करत आहेत. गौतमीचं खरं आडनाव पाटील नाही. तिने पाटील आडनाव लावू ...

सामाजिक वेदनांवर फुंकर घालणारी कादंबरी : ‘लॉकडाऊन’

इमेज
सामाजिक वेदनांवर फुंकर घालणारी कादंबरी : ‘लॉकडाऊन’   लॉकडाऊन शब्द कानावर आला की चाकरमान्यांच्या मनात आजही धडकी भरते. अडीच वर्षे कोरोना महामारीने देशालाच नव्हे, तर जगाला हातघाईला आणले होते. आजही अधूनमधून कोरोना सक्रिय असल्याच्या बातम्या येतात आणि ऊरात धस्स होते. संपूर्ण देशातील माणसे आपापल्या घरात गोठून गेल्यासारखी राहत होती. प्रत्येक गल्लीबोळातून कर्फ्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती. जे सरकारी नोकरीत होते, त्यांना महिन्याला पगार मिळत असल्याने त्यांना जगण्याची भ्रांत नव्हती; परंतु खासगी नोकरीत असणार्‍यांचा रोजगार बंद झाला होता. हातावर पोट असणार्‍यांची उपासमार सुरु होती. अत्यावश्यक शासकीय आणि निमशासकीय कार्यालये सुरु होती. त्यातही कामगारांची कपात केली होती. अनेक ठिकाणी अन्नछत्र आणि रेशनचे धान्य मिळत असल्याने गोरगरिबांचे पोट भरण्याचे कार्य सुरु होते. टाळ्या वाजविणे, पराती, थाळ्या, भांडी, घंट्या वाजविणे, मेणबत्या लावणे असे अनेक प्रयोग करण्यात आले. भोळ्या भाबड्या जनतेने सुरुवातीला गंमत म्हणून आणि नंतर भीतीपोटी या सर्व गोष्टी विश्वास बसत नसल्यातरी मनोभावे के...

कुरुलकरावर बोलू काही!

इमेज
 कुरुलकरावर बोलू काही! संघाची जी स्वयंघोषिते, देशभक्तिची देती ग्वाही;  सत्याची जर चाड असे तर, कुरुलकरावर बोलू काही! नाथुराम जर सावरकर स्वर, कुरुलकराचा मार्गच तोही; सत्याची जर चाड असे तर, कुरुलकरावर बोलू काही! पाकिस्तानी हनी  ट्रॅप  जर, नडला कोठे कुरुलकराला;  लिंगपिसाटा नसेच लज्जा, वचन खरे हे, सर्वांनाही. संस्कारी जर असाल तुम्ही, असे घडविता पिढ्या-पिढ्यांना? दाखविण्या हो तोंड तुम्हाला, नसेल उरली जागा काही. ज्याला-त्याला देता धमक्या, पाकिस्तानी पाठवायच्या; कुरुलकराचे करायचे का, सांगा आता तुम्हीच ते ही! चौदा मेले बैठकीतले … .. चौदा मेले बैठकीतले, त्यांची चर्चा कुठेच नाही; हिंदुहिताच्या छचोर गप्पा, कृतीत कोठे दिसतच नाही! निवडणुकीच्या साठी हिंदू, दंगलीत सहभागी हिंदू;  सत्तेच्या सोपानावरती, त्याची जागा कुठेच नाही! सत्तेसाठी धडपड सारी, हिंदूंची ती ढाल मखमली;  वापरून गुळगुळीत झाली, तिची खुशाली कुठेच नाही! मलिदा खाती सत्तेचा हे, करती गप्पा हिंदु-हिताच्या;  हिंदुंची नुसतीच भलावण, हिंदू-हाती काही नाही! हिंदूंनो आता तर जागे व्हा, अन् जागा दाखवून द्या;  अ...

मुंबईतील कष्टकरी जनतेच्यावतीने जोतीराव फुले यांना ‘महात्मा’ पदवी प्रदान!

इमेज
 मुंबईतील कष्टकरी जनतेच्यावतीने जोतीराव फुले यांना ‘महात्मा’ पदवी प्रदान! दि. 11 मे 1888 रोजी जोतीराव फुले यांना वयास साठ वर्षे पूर्ण झाली होती.  त्यांनी निवडलेला जीवनमार्ग कडकडीत व खडतर होता. या मार्गावर ते सतत चाळीस वर्षे चालत होते. ती एक सामाजिक तपश्‍चर्या होती. या काळात त्यांना पुरेशा सोयी-सुविधा नसतानाही महाराष्ट्राचा कानाकोपरा धुंडाळून काढला होता. समाज जागृतीसाठी अहोरात्र झटले होते. स्त्रीशुद्रातिशूद्रांच्या दाराकडे ज्ञानगंगा वळविली होती. अन्यायाचा प्रतिकार करण्याची शिकवण जनतेस दिली होती. उच्चवर्णिय स्त्रियांच्या केशवपन व भृणहत्यासारख्या निंदनीय व दयनीय रुढींविरुध्द कृतिशील संघर्ष करून तथाकथित उच्चविर्णयांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले होते. ब्राह्मण स्त्रियांचे जे उग्र प्रश्‍न ब्राह्मणांनी सोडवायचे होते, ते या माळ्याच्या पोराने सोडविले होते. समस्त ब्राह्मण समाजावर माळी समाजाचा व जोतीराव फुलेंचा हा हिमालयाएवढा उपकार आहे, जो ब्राह्मणांनी अजूनही फेडलेला नाही! अशा श्रेष्ठ साधूवृत्तीच्या सत्पुरुषाचे अल्पसे उतराई व्हावे, अशी भावना त्यांच्या मुंबईतल्या अनुयायांच्या व नाराय...