दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

जातीयवादी संस्थात्मक हत्या..!!

जातीयवादी संस्थात्मक हत्या..!!


मुंबई : आई-वडील, बहीण आणि डावीकडे दर्शन सोलंकी


दर्शन सोलंकीच्या आत्महत्येमुळे भारतातील उच्चशिक्षण संस्थांतील जातीयवाद पुन्हा ऐरणीवर आला. देशभरातील आयआयटीज्, एम्स, आयआयएम, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आदी ठिकाणी जातीयवादाचा विखार अधिक पाहावयास मिळतो. या संस्थांमध्ये बहुतांश शिक्षक उच्चवर्णिय, विद्यार्थीही एलिट क्लासमधून आलेले. फारच थोडे गरीब घरातील आणि मागासवर्गीय विद्यार्थी. अशा वातावरणात मागासवर्गीय विद्यार्थ्यांची कुचंबना प्रचंड प्रमाणात होत असते. कारण घरात जातीयवाद पोषला जातो. आणि या संस्थांमध्ये जातीयवादाला पोषक वातावरण मिळते. प्राध्यापक एखाद्या मागासवर्गीय विद्यार्थ्याला जाणीवपूर्वक टॉर्चर करत असतात. त्याच्या राखीव जागांवरून, कोटा पद्धतीवरून विद्यार्थ्याचे मानसिक खच्चीकरण करतात. मागासवर्गीय विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक परीक्षेत नापास करणे, कमी मार्क्स देणे, हे प्रकार सर्रास चालतात. विद्यार्थी कितीही लायक असला तरी त्याच्याकडे कधीच विद्यार्थी म्हणून पाहिले जात नाही. मागासपणाचा टॅग घेऊनच त्याला शिक्षण पूर्ण करावे लागते. दुसरीकडे उच्चवर्णीय मुलांना शाळेपासून ते उपरोक्‍त संस्थांमध्ये प्रवेश करेपर्यंत पोषक वातावरण असते. महागडे ट्युशन्स, ट्यूटर्स, या व्यतिरिक्‍त शाळा-महाविद्यालयाचा जातीय सपोर्ट तो वेगळाच. शाळा-महाविद्यालयापासूनच उच्चवर्णिय विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल्सचे फूल्‍ल मार्कस् देऊन त्यांच्या गुणांचा आकडा फुगविला जातो. अशा कुठल्याच सोयी-सुविधा वा पूरक वातावरण नसणारा मागसवर्गीय विद्यार्थी वरील संस्थांमध्ये आलाच तर त्याचा जातीय छळ केला जातो. त्याला मानसिक त्रास इतका दिला जातो की, तो आत्महत्येस प्रवृत्त होतो. त्यातूनच रोहित वेमुला, दर्शन सोलंकीसारख्या विद्यार्थ्यांच्या हत्या होतात!  

अलीकडे उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीयवाद पराकोटीला पोहोचलाय. त्याला मागास विद्यार्थ्यांचा वाढता टक्‍का हे एक कारण आहे. दुसरं असे की, मागास जातीतील विद्यार्थी तथाकथित उच्चवर्णीय विद्यार्थ्यांची बरोबरी करू लागली आहेत. प्रत्येक ठिकाणी चेकमेट देऊ लागलीत. परिणामी उच्चवर्णियांच्या तथाकथित ‘मेरीट’चा फुगा फुटू लागला आहे. अलिखित आरक्षित उच्च स्थानाला धक्‍का बसत असल्यानेही उच्चवर्णीय विद्यार्थी बिथरले आहेत. याची सुरूवात शालेय जीवनापासूनच पाहावयास मिळत आहे. शाळकरी मुलांच्या मनात जात-धर्माचे विष घराघरातून पेरले जातेय. ही भावना खासगी शाळांमधून जास्त प्रमाणात पोसली जाते आहे. सरकारही खासगीकरणाला प्रोत्साहन देत आहे. देशात ‘समान शाळा पद्धती’ नसल्याने विद्यार्थ्यांचे स्तरीकरण होते. त्यातूनही उच्च-नीचतेचा भाव वाढीस लागतो. जात निर्मूलनाऐवजी जातसंवर्धनाचे माध्यम शिक्षण व्यवस्था बनली आहे.  



आयआयटी मुंबईच्या आंबेडकर-पेरियार-फुले स्टुडंट सर्कलनं दर्शनची आत्महत्या ही संस्थात्मक हत्या असल्याचे म्हटले आहे. म्हणजे अशा आत्महत्यांना आयआयटी पाठीशी घालत आहे. संस्थागत पातळीवर जातीयवादावर कुठलाही वचक राहिला नाही. उलट बहुतांश प्राध्यापक जातीयवादी मानसिकतेचे असल्याने जातीयवादी आत्महत्यांना प्रोत्साहन मिळत आहे. अशा प्रकरणात एखाद्या प्राचार्यांनी जबाबदारी स्वीकारल्याचे ऐकिवात नाही. एखादी समिती स्थापन केली की, संस्थेची जबाबदारी संपते का? समित्यांच्या अहवालावर आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या विद्यार्थ्यांवर कधी कारवाई झाल्याचेही उदाहरण नाही. अशा किती हत्या घडवणार तुम्ही? जातीग्रस्त आणि संकुचित मानसिकतेमुळे जगातील टॉप विद्यापीठात एकही भारतीय विद्यापीठ वा संस्था नाही, याची कुणालाच कशी लाज वाटत नाही. गप्पा मेरीटच्या मारायच्या आणि एकही नोबेल पुरस्कार नाही! शिक्षणावर, सर्व संस्थांवर मक्‍तेदारी तुमचीच आहे ना! मग दाखवानां एखादं नोबेल पारितोषिक! समान संधी, निकोप स्पर्धेतून सर्वश्रेष्ठ दर्जा ठरतो. भारतात याचीच वाणवा आहे. उच्चवर्णीयांत जगाशी स्पर्धा करण्याची क्षमताच नसल्याचे आजवरच्या इतिहासावरून सिद्ध झाले आहे. म्हणून मागासवर्गीयांनी जागतिक स्पर्धेसाठी तयार झाले पाहिजे. जगातील सर्वश्रेष्ठ संस्था, विद्यापीठांतून शिक्षण घेतले पाहिजे आणि तिथे आपली क्षमता सिद्ध केली पाहिजे. आणि हो, जात चोरणे वा जातीचा न्यूनगंड बाळगण्याची काहीच गरज नाही. कारण ही विकृती उच्चवर्णीयांचीच आहे. त्यांनी लज्जीत झाले पाहिजे. त्यांना जगाच्या विचारमंचावर उघडे पाडण्याची वेळ आली आहे.

लोकसभेत केंद्र सरकारकडून एका प्रश्नाच्या उत्तरात असे सांगण्यात आले की, देशात आयआयटी आणि आयआयएम संस्थांमध्ये 2014 ते 2021 दरम्यान 122 आत्महत्येची प्रकरणं समोर आली. त्यापैकी 24 विद्यार्थी एससी म्हणजे अनुसूचित जाती आणि 41 ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय गटातील होते. तर तीन विद्यार्थी एसटी म्हणजे अनुसूचित जमाती या गटातील होते. म्हणजे आत्महत्या करणार्‍या एकूण 122 पैकी 68 विद्यार्थी हे राखीव प्रवर्गातील होते. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

सुप्रसिद्ध सायन्स जर्नल ‘नेचर’मध्ये अंकुर पालीवाल यांनी देशातील सर्वोच्च पाच आयआयटीमधील जातीयवाद उघड केला आहे. पालीवाल यांनी काही सरकारी संस्था आणि माहितीचा अधिकार वापरून या संस्थांमधील जातीयवादावर प्रकाश टाकला आहे. ते म्हणतात, ‘देशातील पाच आयआयटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये 98 टक्के प्रोफेसर आणि 90 टक्के असिस्टंट प्रोफेसर हे उच्चवर्णीय आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सचा दर्जा मिळालेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये सर्व प्रोफेसर उच्चवर्णीय आहेत. तर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये 2016-20 दरम्यान इन्सपायर फॅकल्टी फेलोशिप ही 80 टक्के उच्चवर्णीयांना दिली आहे. केवळ 6 टक्के अनुसूचित जाती आणि 1 टक्‍का अनुसूचित जमातीला ही फेलोशिप मिळाली आहे’. ही आकडेवारी किती बोलकी आहे. यावरून देशातील उच्चशिक्षण देणार्‍या संस्था जातीयवादाचा अड्डा बनल्यानेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. याकडे कुणाचेच लक्ष नाही, हे विशेष!

(भास्कर सरोदे, दि. 3 मार्च 2023, बहुजन शासकचे संपादकीय)


टीप : प्रोफेसर नंदकिशोर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल सांगतो की, दर्शन सोलंकीची आत्महत्या जातीय भेदभावातून झाली नाही, तर शैक्षणिक प्रगती खालावल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले! यालाच उच्च कोटीतला जातीयवाद म्हणतात!! 


(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?