दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

वंदना हम शर्मिंदा हैं। जातीवाद अभी जिंदा हैं।

 वंदना हम शर्मिंदा हैं। जातीवाद अभी जिंदा हैं।

वंदना हम शर्मिंदा हैं। जातीवाद अभी जिंदा हैं।


माफ कर वंदना, हा देश सर्वश्रेष्ठ धनुर्धारी एकलव्याचा अंगठा कापून अर्जुनाला सर्वश्रेष्ठ म्हणून मिरवणार्‍यांचा आहे. माफ कर की, येथे खालच्या जातीतील शंबुकाने विद्या ग्रहण केली म्हणून त्याचा खून करणार्‍या तथाकथित मर्यादा पुरुषोत्तम रामाचा हा देश आहे. जगातील एकमेव चक्रवर्ती सम्राट अशोकाला ‘दासीपुत्र’ आणि ‘चंड’ ठरवणार्‍या कृतघ्न लोकांचा हा देश आहे, त्यासाठीही तू आम्हाला माफ कर. शक्य झाले तर माफ कर की, स्वराज्य स्थापन करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणार्‍यांचा हा देश आहे. तू यासाठीही आम्हाला माफ करशील की, येथे जागतिक स्तरावरील विद्वान, संविधानाद्वारे खंडप्राय देशाला एका सूत्रात बांधणार्‍या बोधिसत्व बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांना ‘दलितांचा कैवारी’ ठरवणार्‍या शूद्र मनोवृत्तींचा हा देश आहे. माफ कर की, स्वातंत्र्यानंतरही लोकशाही भारतात क्रीडा क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात उच्चवर्णीयांचेच वर्चस्व आहे. आणि हो, माफ करशील की, तुझ्या घरासमोर फटाके फोडून जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या उच्चवर्णीय दंभाचा हा ‘बदलता इंडिया’ आहे.

जातीय दांभिकांचा देश! :

वंदना, तुला माहिती नाही, तू भारताच्या विजयासाठी रणांगण गाजवत होतीस, तेव्हा तथाकथित उच्चवर्णीयांचा ‘नवा भारत’ गुगलवर तुझी जात शोधत होता! तुझ्या घामाच्या धारांनी महिला हॉकी संघ सिंचित केलास तेव्हा नव्या उभारीसह संजीवन मिळाले, हे सगळे सगळे सत्य; पण हा जो नवा भारत आहे ना, तो महिला संघात किती मागास आणि किती उच्चवर्णीय खेळाडू आहेत, याची गिनती करत होता. तू नाउमेद होऊ नकोस, जातीच्या जखमांनी रक्तभंबाळ झाली, तरी भारतासाठी गोल करण्याची ऊर्मी मारू नकोस. कारण इतिहास रचला जाणार आहे, तुझ्यातील मेरीटचा. जात्यांधांचे काय घेऊन बसलीस, हा देशच जातीय दांभिकांचा म्हणून बदनाम आहे. तू त्याकडे बघू नकोस. तुला हे शौर्य गाजविण्याची संधी मिळाली, त्या संविधानातील ‘समता, स्वातंत्र्य, बंधुता’ या मानवी मूल्यांवर विश्वास ठेव. सत्याचा विजय ठरलेलाच!

कोण आहे वंदना? 

वंदना कटारिया हरिद्वारच्या रोशनबादची आहे. तिचा जन्म एका गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबात झाला. नॅशनल हिरो असल्याने तिची जात येथे लिहून देशाचा अपमान करणार नाही. टोक्यो ऑलिम्पिक-2020 मधील भारतीय महिला हॉकी संघाची वंदना सदस्य आहे. ती संघासाठी फॉरवर्ड खेळते. तिने दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात हॅटट्रिक करून भारताच्या 4-3 अशा विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला. ऑलिम्पिकमध्ये हॅटट्रिक करणारी ती पहिली भारतीय महिला हॉकीपटू आहे. वंदनाच्या ऐतिहासिक खेळामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला. मात्र, बुधवार, 4 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाने अर्जेंटिना संघाला पूर्ण ताकदीने लढत दिली. खडतर सामन्यात भारतीय संघ 2-1 ने पराभूत झाला. या पराभवानंतर उच्चवर्णीय जातीयवाद्यांनी वंदनाच्या घरासमोर
जाऊन फटाके फोडले, जातीवाचक शिवीगाळ केली आणि निषेधाच्या घोषणा दिल्या आणि हिडीसवाणे नाच केला. ‘भारतीय संघात दलित खेळाडूंचा भरणा असल्यानेच पराभव झाला’, अशी जातीवाचक टिप्पणी त्यांनी केली. ‘हॉकीच नाही तर सर्व खेळांमधून दलित खेळाडूंना बाहेर काढले पाहिजे’, असा जातीवर हल्ला केला. यानंतर वंदनाचा भाऊ शेखरने झारखंड पोलिसांकडे तक्रार करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अन्यथा आत्महत्या करण्याची धमकी दिली. नेहमीप्रमाणेच पोलिसांनी टाळाटाळ केली; परंतु प्रकरण गंभीर वळण घेत असल्याने पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 504 आणि अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती कायद्याखाली गुन्हा नोंद केला. हे वृत्त लिहीपर्यंत केवळ एका जातीयवाद्याला अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपी विजय पाल याला अटक केली असून अंकुर पाल आणि सुमित चौहान हे फरार होते.

सच्चा ‘हिरो’ला सॅल्यूट :

वंदना, तू जिगरबाज आहेस. लढवैय्या आहेस. तू ज्या परिस्थितीतून आलीस आणि ज्या परिस्थितीत खेळतेस, ते थक्क करणारे आहे. तुझी जात काय, याचा तर आम्ही कधी विचारच करत नाही. तू भारताची हिरो आहेस, एवढेच आम्हा माहीत. तुझा आम्हा भारतीयांना अभिमान आहे. ज्यांच्या ‘डीएनए’त खोट आहे, त्यांचे काय घेऊन बसलीस, भारतच नाही तर सारे जग तुझी तारीफ करत आहे. तुला सॅल्यूट करत आहे. तुझा सन्मान करत आहे. गुणगौरव करत आहे. त्याचा तू स्वीकार कर! खरं तर ‘ते’ भारत हरला म्हणून तुझ्या जातीवर आले आहेत असे नाही, तर त्यांच्या उच्च स्थानाला तुझ्यासारख्यांमुळे आव्हान मिळत आहे, म्हणून ते बिथरलेत. ‘संघात दलित खेळाडू जास्त आहेत, म्हणून भारत हरला’, हे कशाचे द्योतक मानायचे? भारताच्या जय-पराजयाशी ‘त्यांना’ काय देणंघेणं? खेळात उच्चवर्णीय म्हणून घेणार्‍यांनी काय दिवे लावलेत? किती सुवर्ण जिंकलीत? करोडोंचा देश अन् बोटावर मोजण्याइतकी पदकं…ही जातीयवादाचीच देण! त्याचा मोठा रंजक इतिहास आहे. अनेकदा देश परकीयांच्या घशात घालणार्‍यांची विकृत संस्कृती आम्हाला देशनिष्ठेची भाषा शिकवते, हे एक आश्चर्यच आहे.

‘त्यांचा’ जातीत जीव! :

वंदना, तुला जातीगत शिवीगाळ केली म्हणून बिलकूल चिंतित होऊ नकोस. कारण  त्यांचा जातीतच जीव बसतो. ग्लोबल सोसायटीत जात नष्ट झाली तर दुकानदारी कशी चालणार, याची त्यांना जास्त चिंता सतावते. म्हणून ते हर प्रकारे जातीचा आधार घेऊन एकतर स्वत:ला गौरवान्वित करून घेतात किंवा
इतरांना कमी लेखून डिवचण्याचे काम करतात. ही दुर्गंधी आजची नाही, पूर्वापार चालत आलेली आहे. चार वर्णांची शिडीसारखी व्यवस्था असून कप्पेबंद आहे. या व्यवस्थेनुसार शूद्रांनी फक्त वरील तीन वर्णांची सेवा करायची, असा मनुस्मृतीचा नियम होता. शूद्र आणि सर्व वर्णीय-सर्व जातीय स्त्रियांना एकच नियम. तू तर देशासाठी खेळून मनुस्मृतीला पायदळी तुडवलंस! कसं आवडणार त्यांना? धर्माचा आणि पुरुषाभिमानाचा किडा जो आहे डोक्यात! म्हणून तू निराश होऊ नकोस. देशासाठी खेळताना मेडल जिंकताना रोज मनुस्मृतीचा मुडदा पडला तरी चालेल; पण तू माघार घेऊ नकोस. मनुस्मृतीकृत वर्ण आणि जाती अबाधित राखण्यासाठीची ‘त्यांची’ ही शेवटची धडपड आहे!

जातीगत योनीसुचिता! :

वंदना, राष्ट्रीय हिरो असतानाही तुझ्याशी असा जातीगत व्यवहार केला, तर सर्वसामान्यांच्याबाबतीत तर विचारच करायला नको. त्यांना तर रोजच जातीच्या सुळावर चढावे लागते. उच्चवर्णीयांच्या वासनेची एखादी तरुणी बळी पडली तर आधी तिची जात तपासली जाते, त्यानंतर कारवाई काय करायची, किती प्रसिद्धी द्यावयाची, द्यायची की नाही, राजकीय विषय बनवायचा की नाही, हे पाहिले जाते. पीडिता मागासवर्गातील असेल तर वासनांध उच्चवर्णीयांना वाचविण्यासाठी संबंधित संस्था पुढे सरसावतात. या सर्व संस्थांवर उच्चवर्णीयांचाच कब्जा आहे. ब्रम्हाने विराटपुरुषाच्या माध्यमातून ब्राह्मण मुखातून, क्षत्रिय बाहूतून, वैश्य बेंबीतून आणि शूद्र पायातून जन्माला घातल्याचा ते आधार घेतात आणि त्याद्वारे शूद्रांना तुच्छ लेखण्याचे काम करतात. किंबहुना शूद्र उपभोगासाठीच असतात, असा त्यांचा मनुकायदा आहे. मुखातून, बाहूतून आणि बेंबीतून जन्मलेल्यांना योनीसूचिता ती काय कळणार? मग ती आया-बहिणींची का असेना!

वंदना हम शर्मिंदा हैं। जातीवाद अभी जिंदा हैं।

वंदना, तुझा आम्हा अभिमान :

वंदना, महिला हॉकीचे नावही माहिती नव्हते तेव्हा उत्तर प्रदेश आणि सध्याचा उत्तराखंडमधील हरिद्वारच्या रोशनबागमध्ये 15 एप्रिल 1992 साली तुझा जन्म झाला. 2006 मध्ये भारतीय ज्युनिअर महिला संघाची सदस्य बनली. नेत्रदीपक कामगिरीमुळे 2010 मध्ये तू सिनिअर राष्ट्रीय संघाचा भाग बनली. जर्मनीत 2013 ला झालेल्या ज्युनिअर वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने ब्रॉन्झ मेडल जिंकले, या संघाची तू सदस्य होती. स्पर्धेत चार सामन्यात 5 गोल करून तू भारताची टॉप स्कोरर होती. 2014 मध्ये ग्लास्गोव, स्कॉटलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तू 100 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तुझी गती आणि कौशल्य अफलातून आहे. 2014 मध्ये तुला हॉकीमधील भारताचा प्लेअर ऑफ द अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.  2014-15 मध्ये एफआयएच हॉकी वर्ल्ड लीगच्या राऊंड 2 मध्ये तू सर्वाधिक 11 गोल नोंदवून भारताला विजय मिळवून दिला. नोव्हेंबर 2016 मध्ये तुला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले आणि 23 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मेलबर्नमध्ये संघाचे नेतृत्व केले. 2016 ला रिओ ऑलिम्पिकमध्येही टीमची सदस्य होतीस. हॉकीच्या प्रत्येक वळणावर तू आपल्या हॉकी स्टीकची जादू दाखवली. भारतीय हॉकी संघाने 2018 मध्ये अ‍ॅशियन चॅम्पियन ट्रॉफीचे सिल्व्हर मेडल जिंकले. या स्पर्धेत तू ‘प्लेअर ऑफ द अवॉर्ड’ची मानकरी ठरली. 2018 मध्ये स्पेनच्या दौर्‍यातील 5 सामन्याच्या मालिकेतील तिसर्‍या सामन्यात तू आपल्या कारकीर्दीतील 200 वा सामना खेळला. 16 सदस्यीय वर्ल्ड कपच्या टीममध्ये तुला संधी मिळाली. टोक्यो ‘समर ऑलिम्पिक-2020’मध्ये हॅटट्रिक करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मानही तुलाच मिळाला. तुझ्या अप्रतिम कामगिरीने भारतीय महिला हॉकीला सुवर्णकाळाचे वेध लागले. आजपर्यंत तू 245 सामन्यात 67 गोल केले आहेत. तुझ्या अतुलनीय खेळाने भारतीय महिला हॉकीला बहार आलीय. आम्हा भारतीयांना तुझा अभिमान आहे. तुझी कामगिरी उच्चवर्णियांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी तर आहेच शिवाय त्यांना आत्मपरीक्षणही करायला लावणारी आहे. म्हणून यापुढे खेळासह इतर क्षेत्रात मागासवर्गीयांना प्राधान्याने प्रोत्साहन देणे देशाच्या हिताचे होईल, यात तिळमात्र शंका नाही. वंदना, पुन्हा एकदा तुला सॅल्यूट!
(भास्कर सरोदे, विशेष संपादकीय : बहुजन शासक, दि. 6 ऑगस्ट 2021)
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासक ’ नियमित वाचा)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?