दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

#5_ऑगस्ट_समान_कायदा_दिन

#5_ऑगस्ट_समान_कायदा_दिन

महाराजा नंदकुमार यांना फाशी : भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासात क्रांतिकारी घटना

#5_ऑगस्ट_समान_कायदा_दिन

भास्कर सरोदे, औरंगाबाद (8 ऑगस्ट 2021) :

भारतात कायद्यापुढे समानता कधी प्रस्थापित झाली? बिनदिक्‍कत संविधानाची अंमलबजावणी (26 जानेवारी 1950) झाल्यापासून. हे खरे आहे की, भारतात संविधानाची अंमलबजावणी झाली आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याचा नियम लागू झाला; परंतु त्यापूर्वी एक दिवस असा होता की, ज्या दिवशी ‘कायद्यापुढे सर्व समान’ असल्याचा प्रत्यय आला होता. तो दिवस होता 5 ऑगस्ट 1775. याच दिवशी महाराजा नंदकुमार यांना फाशीची शिक्षा झाली आणि हे कायद्याचे राज्य असल्याचे भारताने पहिल्यांदाच अनुभवले. भारतीय इतिहासात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण याच दिवशी कायद्यापुढे समानतेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. म्हणून या ऐतिहासिक दिवसाला ‘समान कायदा दिन’ म्हणून साजरा केला तर इतिहासाचा यथोच्चित गौरव ठरेल.

महाराजा नंदुकुमार यांना का झाली फाशी? :

महाराजा नंदकुमार हे आधुनिक पश्‍चिम बंगालच्या विविध भागात कर संकलक होते. 1764 मध्ये इस्ट इंडिया कंपनीने त्यांना बरद्वान, नादिया आणि हुगळी भागात कर संकलक म्हणून नेमले होते. 1773 मध्ये वॉरेन हेस्टिंग्ज गव्हर्नर जनरल असताना महाराजा नंदकुमार यांच्यावर बनावट कागदपत्रं सादर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या आरोपाखाली महाराजा नंदकुमार यांना 5 ऑगस्ट 1775 रोजी कलकत्यात फाशीची शिक्षा झाली. भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश इलिजा इम्पे यांनी महाराजा नंदकुमार यांना दोषी ठरवले. तथापि, महाराजा नंदकुमार यांना कटकारस्थान करून गोवण्यात आल्याचा अनेक इतिहासकारांनी आरोप केला होता. शिवाय या फाशीविरोधात इंग्लंडमध्ये वॉरेन हेस्टिंग्ज आणि इलिजा इम्पे यांच्याविरोधात महाभियोगही चालविण्यात आला होता. त्या तपशीलाची येथे गरज वाटत नाही!

कोण होते महाराजा नंदकुमार? :

महाराजा नंदकुमार यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. इस्ट इंडिया कंपनीत त्यांची मुर्शिदाबादच्या नवाबपदी निवड झाली होती. प्लासीच्या लढाईनंतर रॉबर्ट क्लाईव्हचा एजंट म्हणून महाराजा नंदकुमार यांची कर संकलक म्हणून बरद्वान, नादिया जिल्हा आणि हुगळीत नियुक्‍ती झाली होती. 1764 मध्ये दुसरा शाह आलम यांनी नंदकुमार यांना ‘महाराजा’ हा किताब बहाल केला. 1764 मध्येच इस्ट इंडिया कंपनीने महाराजा नंदकुमार यांना वॉरेन हेस्टिंग्जच्या जागी टॅक्स कलेक्टर म्हणून बरद्वान, नादिया आणि हुगळी येथे नियुक्‍त केले होते. दुसरा शाह आलम आणि इस्ट इंडिया कंपनीवरील निष्ठेमुळे महाराजा नंदकुमार यांच्या प्रगतीला चार चाँद लागले, हे यातून दिसते.

5 ऑगस्टचे ऐतिहासिक महत्त्व :

हिंदु धर्मग्रंथांनुसार सर्व स्त्रिया आणि शूद्र-अतिशूद्रांना कठोर शिक्षा होत्या. त्यांना शिक्षण घेणे, मालमत्ता जमा करणे, शस्त्र चालविण्यास बंदी घातली होती. ज्यांनी बंदीनियम तोडला त्यांना वर्ण आणि जातीनुसार शिक्षा दिली जात होती. ज्यात जिभ कापण्यापासून ते डोळे फोडणे, कानात तप्‍त शिसे ओतणे अशा शिक्षांचे प्रावधान होते. भूदेव म्हणून केवळ ब्राह्मणांनाच शिक्षेत पूर्णत: सूट होती. इतरांप्रमाणेच ब्राह्मणांनाही शिक्षा करता यावी म्हणून रयतेचा राजा, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक करवून घेतल्याचा इतिहास आहे. मात्र, छत्रपतींच्या राज्यावर पेशव्यांनी कब्जा केल्यानंतर भूदेवांना शिक्षा कोण करणार? इस्ट इंडिया कंपनी कायद्यांच्या बाबतीत अत्यंत कठोर होती. बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरविण्यात आलेल्या महाराजा नंदकुमार यांना फाशीची शिक्षा दिली. एक भारतीय म्हणून महाराजा नंदकुमार यांना झालेली शिक्षेचे दु:ख आहेच. तथापि, धर्माच्या नावाखाली विषमता पाहता कायद्यापुढे समानता निर्माण करण्याच्या टप्प्यातील ही घटना मोलाची मानावी लागते. महाराजा नंदकुमार या ब्राह्मणाला दिलेल्या या ऐतिहासिक फाशीमुळे ‘कायद्यासमोर समानता’ हे तत्त्व भारतीय न्यायपालिकेत प्रस्थापित झाले. म्हणून या दिनाचे स्मरण ‘समान कायदा दिन’ म्हणून केले तर संविधानातील कायद्यापुढील समतेला अधिक बळकटी येईल, एवढा विश्‍वास वाटतो. लोकशाही आणि समतेच्या समर्थनात ‘समान कायदा दिना’च्या निमित्ताने हा हॅशटॅग चालवू या!

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासक ’ नियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?