दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

प्रजासत्ताक दिनाला गालबोट ; आरएसएसचा एजंट दीप संधुने केले कार्यान्वित षडयंत्र!

 प्रजासत्ताक दिनाला गालबोट ; आरएसएसचा एजंट दीप संधुने केले कार्यान्वित षडयंत्र!

-लाल किल्ल्यावर समाजकंटकांनी फडकवला झेंडा


समाजकंटक घुसले, की घुसू दिले? : किसान ट्रॅक्टर मार्च दरम्यान भारताची अस्मिता असलेल्या लाल किल्ल्यावर जाण्याचा कोणताही बेत नव्हता. मग लाल किल्ल्यात घुसणारे कोण होते? शेतकरी नव्हते तर कोण होते? समाजकंटक घुसले, की घुसू दिले? पोलीस कुणाच्या आदेशाची वाट पाहत होते, की कुणाच्या आदेशान्वये काम करत होते? लोकशाहीत आंदोलन करू नका असे म्हणता येत नाही, पण त्यात काही समाजकंटक घुसवून उधळवून लावले जावू शकते. अशा घटनांची सत्ताधारी कधीच जबाबदारी घेत नसतात, पण समाजकंटकांच्या आडून जबाबदारीचे भान देवू शकतात! शांततापूर्ण किसान ट्रॅक्टर मार्च दरम्यान हेच घडले, हे कुणी नाकारू शकत नाही.

bahujan shasak media

सत्ताधारी -षडयंत्रकारी साथ -साथ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दीप संधु. दीप संधुच्या नेतृत्वात लाल किल्ल्यावर धुडगूस घातला आणि झेंडा फडकवला.


भास्कर सरोदे, औरंगाबाद (बुधवार, दि. 27 जानेवारी 2021) :

राष्ट्रीय स्वंय सेवक संघ प्रणित भाजपच्या काळ्या राजवटीत भारताची मान खाली झुकली आहे. उद्योगपती अंबानी-अदानीचा हट्ट पुरविण्यासाठी मोदी सरकारने गेल्या दोन महिन्यांपासून शेतकर्‍यांच्या आंदोलनाला कस्पटासमान लेखून लोकशाही मूल्यांचा घोर अपमान केला. प्रजासत्ताक दिनीच राजधानी दिल्‍लीत अराजकाला आमंत्रण दिले. ज्यांचा संयुक्‍त किसान मोर्चाशी काहीएक संबंध नाही, अशा समाजकंटकांनी लाल किल्ल्यावरील तिरंग्याच्या खालच्या चबुतर्‍यावर झेंडा फडकवला. भारतीय इतिहासातील ही अभूतपूर्व घटना आहे. हिंसाचार आणि शांतता भंग करणार्‍या घटनेवर संयुक्‍त किसान मोर्चाच्या पुढार्‍यांनी प्रचंड नाजारी व्यक्‍त करताना हा एका षडयंत्राचा भाग असल्याचे म्हटले आहे. दोन-चार उद्योगपतींच्या हितासाठी हट्टाला पेटलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार देशाचे अखंडत्त्व राखू शकेल का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, आरएसएसचा एजंट आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर छायाचित्रे असणारा दीप संधुने षडयंत्र कार्यान्वित केल्याचा शेतकरी संघटनांनी आरोप केला आहे.

प्रजासत्ताक दिनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या हक्‍क मागण्यांच्या संदर्भाने संयुक्‍त किसान मोर्चाच्या वतीने दिल्‍लीमध्ये ‘किसान ट्रॅक्टर मार्च’चे आयोजन केले होते. या मार्चचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले. शांततेचा कुठल्याही प्रकार भंग होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. परंतू सिंघु बॉर्डरहून निघालेल्या किसान मजदूर संघर्ष कमिटीने ‘पोलीस करारा’च्या अटींचे उल्‍लंघन सुरुवातीपासूनच करण्यास सुरुवात केली. या दरम्यान पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले, आश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून, लाठीहल्‍ला करुन आंदोलकांना उचकवण्यास मदत केली. संयुक्‍त किसान मोर्चाच्या नेत्यांच्या वक्‍तव्यांवरुन आम्ही शांततेत आंदोलन करत असताना किसान मजदूर संघर्ष कमिटीने सुरुवातीपासूनच संघर्षाची भाषा केली. त्यानुसार त्यांनी व्यवहार केला. पोलिसी कराराचे पालन केले नाही. शिवाय लाल किल्ल्यात घुसून झेंडा फडकवून देशाचा अपमान केला. 

आंदोलकांत बेबनाव! :

संयुक्‍त किसान मोर्चाचे नेते योगेंद्र यादव यांनी झालेल्या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्‍त केले. शांततेचा भंग झाल्याने ते नाराज होते. त्यांच्यानुसार सिंघु बॉर्डरवर बॅरिकेड्स तोडणारे समाजकंटक हे संयुक्‍त किसान मोर्चाशी संबंधित नव्हते. तर ते शेकडो शेतकरी किसान मजदूर संघर्ष कमिटीशी संबंधित आहेत. त्यांनीच लाल किल्ल्याकडे आगेकूच केली. त्यांच्या कृत्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे योगेंद्र यादव यांनी ठासून सांगताना सर्व शेतकर्‍यांना आपापल्या ठिकाणी परतण्याची विनंती केली. दरम्यान, किसान मजदूर संघर्ष कमिटीचे प्रसिद्धी सचिव विक्‍कीने दावा केला की, सिंघु बॉर्डरवरुन दिल्‍लीकडे जाणारा बाहेरील रिंगरोड पोलिसांनी बॅरिकेड्स टाकून अडवला होता. शिवाय पोलिसांनी आश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या, लाठीहल्‍ला केला. यावरुन वरकरणी आंदोलकांत बेबनाव दिसत असला तरी लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणारे किसान आंदोलनाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट होत आहे.

बनावट गुन्हेगारांचे षडयंत्र :

ऑल इंडिया किसान सभेचे महासचिव हनन मोल्हा जे संयुक्‍त किसान मोर्चाचे घटक आहेत, त्यांनी या कृत्यामागे बनावट गुन्हेगारांचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. शांततापूर्ण शेतकर्‍यांच्या आंदोलनाला बदनाम करवून त्यांना हिंसाचारात गुंतवून शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केला आहे. याला बदमाश गुन्हेगारी घटक कारणीभूत आहेत. तीन काळे कृषी कायदे बनल्यापासून शेतकरी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. हिंसाचार आणि झेंडा फडकवण्याचा आम्ही निषेध करतो. मूळात आंदोलक नियंत्रणाबाहेर नव्हतेच, काही गुन्हेगारी प्रवृत्तींनी ही अराजकता निर्माण केली. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र होते, असे हनन मोल्हा यांनी टीकरी बॉर्डरवरुन सांगितले.

किसान मजदूर संघर्ष कमिटीचे कृत्य :

गेल्या सात महिन्यांपासून शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. कुठेही हिंसाचार वा शांतताभंग झालेली नाही. शांततेच्या मार्गानेच जीत होईल, असे आम्ही आंदोलकांना आवाहन केले होते. हिंसाचार वा अशांततेच्या मार्गाने आंदोलन अपयशी होईल, असे बजावले होते. संयुक्‍त किसान मोर्चात सहभागी 32 संघटनांचाही या तत्त्वावर विश्‍वास होता. आमचा लाल किल्‍ला वा संसदेवर जाण्याचा कोणताही कार्यक्रम नव्हता. सर्वकाही शांततेच्या मार्गाने सुरू होते. दिल्‍लीवर चालून जाण्याची भाषा किसान मजदूर संघर्ष कमिटीने केली होती. त्यांनीच लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला. आमचा त्यांच्याशी काहीएक संबंध नसल्याचे हनन मोल्हा यांनी स्पष्ट केले.

bahujan shasak media


खासगी वाहनांमुळे गालबोट :

ऑल इंडिया मेवाती समाजाचे अध्यक्ष रमझान चौधरी यांनी दावा केला की, केवळ 500 टॅ्रक्टर्स हरियानाहून ट्रॅक्टर मार्चमध्ये सहभागी होते. परंतू पोलिसांनी खासगी वाहनांनाही परवानगी दिली. यामुळे ट्रॅक्टर मार्च दरम्यान हिंसाचार आणि गोंधळ उडाला. यामुळे शेतकर्‍यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लागले.

शिख समुदायाला बदनाम करण्याचे षडयंत्र :

‘किसान ट्रॅक्टर मार्च’ दरम्यान काही असामाजिक तत्त्व धुडगूस घालतील म्हणून संयुक्‍त किसान मोर्चाचे नेते जागरुक होते. शांततापूर्ण मार्चसाठी काटेकोरपणे नियोजन केले होते. परंतू शेतकरी आंदोलन आणि शिख समुदायाला बदनाम करण्यासाठी काही समाजकंटकांनी हे कृत्य केले. या घटकांना पोलीस आणि सरकारचेच अभय होते का, अशा संशयाला वाव आहे. कारण सतनाम पन्नूच्या नेतृत्वात सिंघु बॉर्डरवरुन किसान मजदूर संघर्ष कमिटीला पोलिसांनी बॅरिकेड्स तोडून जावू दिले. यात काही खासगी वाहनांचा समावेश होता. शिवाय हा मार्च लाल किल्ल्यामध्ये घुसू देण्यास पोलिसांनी मदतच केली. लाल किल्ल्यावरील एका खांबावर शिख धर्माचा झेंडा फडकवण्यात आला. यामागे शिख समुदायाला बदनाम करण्याचे पूर्वनियोजित षडयंत्र रचण्यात आले. यात सरकारचाही हात असल्याशिवाय असे कृत्य घडणार नाही, असा होरा आहे.

मौत के सौदागर! :आरएसएस आणि मोदी सरकारचा लोकशाही शासनप्रणालीवरच विश्‍वास नसल्याचे दिसून येते, इतके ते बेदरकारपणे वागताना दिसताहेत. मग त्यासाठी अनेकांचे मुडदे पडले तरी त्यांना काही गम नाही. पुलवामात आपल्या 40 पेक्षा जास्त सैनिकांचा बळी घेण्यास राष्ट्रीय स्वंय सेवक संघ प्रणित भाजप सरकारने कोणतीही कसूर नाही सोडली, हे अलीकडेच मोदीभक्‍त अर्णब गोस्वामीच्या चॅटमधून स्पष्ट झाले. गोध्रात शेकडो लोकांचे निर्घृणपणे प्राण घेण्यास जबाबदार असलेले मोदी-शहा जगाने पाहिले. गोध्राकांडावरुन तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘मोदींनी राजधर्म पाळला नाही’, इतकेच लाजेकाजे म्हणून एक प्रकारे त्यांची पाठराखणच केली. अन्यथा दुसर्‍या कुण्या मुख्यमंत्र्यांच्या काळात अशी घटना घडली असती, तर वाजपेयींनी आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी आकाशपातळ एक केले असते. स्मृतीबाईंनी तर आपल्या हातातील बांगड्यांचा असा काही खणखणाट केला असता की उठताबसता त्या आवाजाने माणसाच्या कानठळ्या बसल्या असत्या. एव्हना कोरोनाचे जन्तूही मरुन गेले असते! गोध्राकांडानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींना मौत का सौदागर म्हटले होते. त्यांनी दिलेली ही उपाधी किती सार्थ आहे, हे दिल्‍लीतील शेतकरी आंदोलनावरुन लक्षात येते. मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात लाखो शेतकरी गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. दिल्‍लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून थंडी, वार्‍यात कुडकुडत आपल्या मागण्यांसाठी निकराचा लढा देताहेत. कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर मोदी सरकारने थंड पाण्याचे फवारे मारुन आपण कोणत्या मातीचे बनलो आहोत, हे जगाला दाखवून दिले. या आंदोलनादरम्यान एकूण 157 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. प्रजासत्ताक दिनी दिल्‍लीत काढलेल्या ट्रॅक्टर मार्चदरम्यान एका शेतकर्‍याने दम तोडला. इतके शेतकरी जिवानिशी जात असताना मोदी सरकार थोडेही हलायला तयार नाही. एवढा निगरगठ्ठपणा, निर्ढावलेपणा, असंवेदनपणा आजवर देशाच्या वाट्याला आला नाही. शेतकरी लोकशाही मार्गाचा सौजन्यपणा दाखवत आहेत. त्याउलट मोदी सरकार त्यांच्याशी हिटलरशाही पद्धतीने वागत आहे. हे सर्व आपल्या ‘खास’ भांडवलदारांसाठी..!

दिल्‍ली घटनेला सरकार जबाबदार :

गेल्या 50-60 दिवसांपासून शेतकरी लोकशाही आणि सामंजस्याने आंदोलन करत आहेत. इतका काळ संयम दाखवणे ही अभूतपूर्व गोष्ट आहे. सरकारनेही त्यांच्याशी लोकशाही आणि सामंजस्याने बघायला पाहिजे होते. परंतू सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे दिल्‍लीत झालेल्या प्रकाराला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. याबरोबरच या आंदोलनात सहभागी असलेल्या प्रामुख्याने पंजाबींना केंद्र सरकारने बदनाम करु नये, त्यांच्याकडे सामंजस्याने पहावे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक मोदी सरकारने करु नये, असे खडे बोल शरद पवार यांनी सुनावले.

शांतता आमची सर्वात मोठी ताकद :

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. मात्र या हिंसेचा संयुक्त किसान मोर्चाने निषेध केला आहे. दिल्लीतील आयटीओ, लाल किस्सा, नांगलोई, सिंघू, टिकारी बॉर्डर आणि इतर ठिकाणी शेतकरी आंदोलकांनी हिंसा केल्यानंतर 40 संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. आमच्या सर्व प्रयत्नानंतरही काही संघटना आणि व्यक्तींनी नियोजित मार्गाचे आणि नियमांचे उल्लंघन केले आणि त्यांनी निंदनीय कृत्य केली. असामाजिक तत्वांनी शांततापूर्ण आंदोलनामध्ये घुसखोरी केली. आम्ही नेहमीच हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचा ठरवले आहे. शांतता आमची सर्वात मोठी ताकद आहे. कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करुन आंदोलनाला नुकसान पोहचू द्यायचे नाही, असा आमचा हेतू आहे. नियमांचे उल्लंघन करुन हिंसा करणार्‍या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेचा आमच्याशी काहीही संबंध नाहीय. सर्वांनी ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे आणि ध्येयाने आंदोलन करण्याचं आम्ही सर्व शेतकर्‍यांना आवाहन करतो. कोणत्याही प्रकारची हिंसक घटना, राष्ट्रीय स्मारकांना पोहचवलेली हानी आणि इतर गोष्टींचा आमच्या मोर्चाशी काहीही संबंध नाही. असे करणार्‍यांपासून मोर्चातील शेतकर्‍यांनी दूर रहावे असेही संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे.

दीप संधुचे भाजपशी कनेक्शन!

दिल्‍लीतील किसान ट्रॅक्टर मार्चमध्ये गाजीपूर बॉर्डर, नांगलोई, टीकरी बॉर्डर हिंसाचार घडला. शेतकरी आणि पोलिसांमध्ये झडप झाली. यात 83 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून शेकडो शेतकरी जायबंद आहेत. एका शेतकर्‍याच्या मृत्यू झाला असून अनेक बसेसची तोडफोड करण्यात आली. शांततापूर्ण मार्गाने जाणारे आंदोलन दिशाहीन कसे झाले, याचे एक कोडेच असले तरी भाजपशी संबंधित दीप संधु नावाच्या कलाकाराकडे संशयाची सूई जात आहे. दीप संधुने शेतकर्‍यांत भडकावू भाषणबाजी केली. तसेच तो साळसूदपणे लाल किल्ल्यावरही पोहोचला. ही घटना काय दर्शवत आहे? शेतकर्‍यांचा शांतता मोर्चा बदनाम करण्याच्या हेतूने कुणी मोर्चेबांधणी केली होती, हे सांगण्यास कुणा ज्योतिषाची गरज भासणार नाही, इतके हे षडयंत्र स्पष्ट आहे.

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान मंगळवारी दुपारी प्रजासत्ताक दिनी ‘राज करेगा खालसा’च्या घोषणांच्या गजरात अभिनेता ते कार्यकर्ता असा प्रवास करणार्‍या दीप संधुने लाल किल्ल्याच्या तटबंदीवर फडकवण्यासाठी एका व्यक्तीच्या हातात ‘केसरी’ झेंडा दिला आणि त्या व्यक्तीने तो झेंडा तटबंदीवर फडकवला. मंगळवारी अतिरेकी घटकांनी ट्रॅक्टर परेड कशी हायजॅक केली आणि या अराजकात दीप संधुची कशी भूमिका होती, याचा गौप्यस्फोट ‘द ट्रिब्यून’ने केला आहे.

शेतकरी आंदोलनात संधुची घुसखोरी :

दीप संधुला तीन कृषी कायद्याविरोधातील आंदोलनापासून दूर ठेवण्याचा शेतकरी संघटनांनी वारंवार प्रयत्न केला, तरीही दीप संधुने शेतकर्‍यांच्या या आंदोलनाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे. शेतकर्‍यांच्या या आंदोलनातून बाजूला फेकला गेलेला दीप संधु नियोजित ट्रॅक्टर मार्चच्या एक दिवस आगोदर अचानक या आंदोलनात उगवला. शेतकरी संघटनांनी दीप संधुला या आंदोलनात तिळमात्र स्थान दिले नाही. 26-27 नोव्हेंबरनंतर शेतकरी जेव्हा दिल्लीच्या नजीक येऊन धडकले तेव्हा ‘कम्युनिस्ट’ तुमच्या मुलांचा तोफेच्या दारुगोळ्यासारखा वापर करुन घेऊ इच्छित आहेत, त्यामुळे परत जा, असे दीप संधुने एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत सांगितले होते. मात्र त्यानंतर लगेचच त्याने आपले हे विधान मागे घेतले. दोन आठवड्यांपूर्वी दीप संधुने शेतकरी संघटनांना एक पत्र लिहिले होते आणि तुमच्या आंदोलनाचा एक भाग होण्याची इच्छा असल्याचे त्यात नमूद केले होते. मात्र त्याची ही विनंती शेतकरी संघटनांनी धुडकावून लावली होती. ही आकस्मिकता शेतकरी संघटनांच्या फारपूर्वीच लक्षात आलेली होती. सुमारे महिनाभरापूर्वी 32 शेतकरी संघटनांच्या बैठकीत एका शेतकरी नेत्याने दीप संधु आणि लाखा सिधाना यांना या शेतकरी आंदोलनाचे शत्रू संबोधले होते. शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला जातीय वळण देण्याचा हे दोघे जण आंदोलन सुरू झाल्यापासूनच प्रयत्न करत होते आणि याचीच चिंता 32 शेतकरी संघटनांना सतावत होती. प्रजासत्ताक दिनी जे व्हायला नको होते तेच झाल्याने संयुक्‍त किसान मोर्चा अडचणीत आला आहे.

संधुला ‘काही’ संघटनांची साथ : 

दिल्लीच्या आऊटर रिंग रोडवरच ट्रॅक्टर मार्च काढण्याचा आग्रह धरत त्यासाठी दीप संधुने जोरदार मोर्चेबांधणीही केली होती. आऊटर रिंग रोडवरच ट्रॅक्टर मार्च काढण्याची शेतकरी आंदोलकांची मूळ योजना होती. परंतू संयुक्त किसान मोर्चा आणि पोलिसांशी झालेल्या चर्चेदरम्यान ही योजना बदलण्यात आली होती. मात्र दीप संधुच्या मोर्चेबांधणीमुळे किसान मजदूर संघर्ष समितीने आऊटर रिंग रोडवरच ट्रॅक्टर परेड काढू, अशी भूमिका घेतली. 32 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाचा भाग असलेल्या भारतीय किसान युनियनने (क्रांतीकारी) ट्रॅक्टर परेडसाठी सहमतीने ठरवलेल्या नव्या मार्गाचे पालन न करण्याची संधी दीप संधुला दिली. या दोन्ही शेतकरी संघटनांचा इतिहास तपासण्याची गरज आहे.

अशी केली योजना फत्ते :

सोमवारी सायंकाळी दीप संधुने माजी गँगस्टर आणि विद्यमान सामाजिक कार्यकर्ता लाखा सिधाना याच्या सोबत सिंघु सीमेवरील आंदोलनाच्या मुख्य मंचाचा ताबा घेतला आणि आम्ही दिल्लीमध्ये ट्रॅक्टर मार्च काढणार आहोत, अशी घोषणा त्याने केली. संयुक्त किसान मोर्चा आणि दिल्ली पोलिसांनी परस्पर ठरवलेल्या मार्गांऐवजी ट्रॅक्टर मार्च कसा काढायचा याची योजना मंगळवारी सकाळीच त्यांच्याकडे तयार होती(हा पूर्वनियोजित कटाचाच भाग असला पाहिजे). शेतकरी संघटनांच्या अधिकृत ट्रॅक्टर मार्च आधीच दीप संधु आणि दोन शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर मार्चला सुरुवात केली. मध्य दिल्लीकडे जाणार्‍या रस्त्यावर त्यांचे ‘गुंड’ मोठ्या संख्येने तैनात केलेले होते. तेथून त्यांनी अन्य ट्रॅक्टर्सनाही लाल किल्ल्याच्या दिशेने वळवले. एकवेळा शेतकरी संघटनांच्या स्वयंसेवकांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न केला, मात्र दीप संधू आणि लाखा सिधाना गटाने त्यांची डाळ शिजू दिली नाही. देशाचा अभिमान असलेल्या लाल किल्ल्यावर भाजपा समर्थक दीप संधु आणि त्यांच्या गुंडांनी हैदोस घातला. लाल किल्ल्याचा अपमान करणार्‍या या षडयंत्राचा पर्दाफास होणे गरजेचे आहे.

नरेंद्र मोदींसोबत दीप संधुचे छायाचित्र :

प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री शाह यांच्यासोबत छायाचित्रे आहेत. गेल्यावर्षी त्याने शेतकरी संघटनेच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शंभूमध्ये तो स्वत:चा मोर्चा काढणार असल्याची घोषणा करुन त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांने पंजाबमध्ये भाजप बळकट करण्यासाठी प्रचार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत त्याचे छायाचित्र आहे. दीप संधु हा याच निवडणुकीत गुरदासपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार सन्नी देओल यांचा इलेक्शन एजंटही होता. दीप सिद्धू हा ‘आरएसएस’चा एजंट असल्याचा आरोप पंजाबमधील शेतकरी संघटना करतात. यावरुन या षडयंत्राचा मास्टरमाईंड कोण असावा, हे वाचकांवर सोपवलेले बरे.

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासक ’ नियमित वाचा)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?