‘निवडुंग’चे दणक्यात प्रकाशन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
‘निवडुंग’चे दणक्यात प्रकाशन
1. ‘निवडुंग : आठवणींचे सोनेरी पान’ प्रकाशन सोहळा दणक्यात साजरा झाला. सोहळ्याला उपस्थित राहून आमच्या विद्यार्थ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, त्यांना मी धन्यवाद देतो.
2. माजी विभागीय समाजकल्याण अधिकारी पी. एस. कांबळे सर, माजी जिल्हा समाजकल्याण अधिकारी नंदाताई धावरे मॅडम, गृहपाल एम. डी. खिल्लारे सर, गृहपाल शामलाल चौधरी सर, गृहपाल दाभाडे सर, यांनी आवार्जून उपस्थित राहून आपल्या विद्यार्थ्याचे कौतुक करत आशीर्वाद दिले.
3. सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री, छत्रपती संभाजीनगर मा. ना. संजय शिरसाट यांची तब्बल अडीच तास उपस्थिती आणि दणकेबाज भाषण, हे कार्यक्रमाचे खरे आकर्षण ठरले.
4. डॉ. मुरहरी केळे, डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मनोगतांनी उपस्थितांची मने जिंकली.
5. शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी नियमित भेटावे, यासाठी केलेला प्रयत्न काहीअंशी यशस्वी झाला. काहीजणांनी ही संधी दवडताना मनाचा कोत्तेपणा दाखवला. अहंकार माणसाला स्वत:च डुबवतो, हे कसे सांगावे.
6. ‘निवडुंग’मध्ये समाविष्ट व्यक्तिरेखांचे कौतुक करण्यासाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. आपल्या माणसांचे कौतुक करायलाही मनाचा मोठेपणा लागतो, हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले.
7. अनोखे प्रकाशन आणि रेखाचित्रांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
8. आदरणीय पी. एस. कांबळे सरांनी रात्री 10 वाजता फोन करून अभिनंदन केलं. या कार्यक्रमांमुळे आम्हाला खूप आनंद झाला, आमच्या हातून अनेक कर्तबगार विद्यार्थी तयार झाले, आमचे जीवन सार्थक झाले, असे उद्गारही सरांनी काढले.
भास्कर सरोदे
7875451080
टीप : ‘निवडुंग : आठवणींचे सोनेरी पान’ हा ग्रंथ (650/- रुपये) विक्रीसाठी उपलब्ध. 650/- रुपयांत घरपोच मिळेल. गुगल पे, फोन पे नंबर : 7875451080
Save Journalism!, Save Democracy!!
DONATE...
BAHUJAN SHASAK MEDIA
(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्लेषणासाठी ‘बहुजन शासक’नियमित वाचा)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा