पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

तिमिरातूनी तेजाकडे...: सागरवाडी चाले विदेशाची वाट!

इमेज
तिमिरातूनी तेजाकडे...: सागरवाडी चाले विदेशाची वाट! ग्राऊंड रिपोर्ट, भास्कर सरोदे छत्रपती संभाजीनगर : येथून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर बदनापूरच्या उत्तरेला 10 किलोमीटर अंतरावर जवळपास 500 उंबर्‍याची वाडी. नाव सागरवाडी. नावाचा इतिहास सापडत नाही. सापडणार तरी कसा? वाडीच ती. आजुबाजूचा परिसर डोंगरदर्‍यांनी वेढलेला. सरकार पातळीवर उपेक्षा. मात्र, 1959 ला शिक्षणाची वात पेटली अन् तिच्या ज्योतीने या वाडीचा इतिहास-भूगोल बदलला. सातासमुद्रापार या वाडीचा डंका वाजायला लागला. दुसर्‍या-तिसर्‍या पिढीतील तरुण-तरुणी जगाच्या कॅनव्हासवर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. छोट्याशा वाडीतून शेकड्याने नोकरदार आणि तब्बल आठजण विदेशात आहेत. हे देशातील दुर्मीळ उदाहरण असले पाहिजे! त्यातील एकजणाने तर युनोपर्यंत धडक दिलीय. तिमिरातूनी तेजाकडे निघालेली सागरवाडी शैक्षणिक क्रांतीला जन्म देऊन उजेडात आली. ‘विदेशात विसावलेली सागरवाडी’ या नावानेही सागरवाडी ओळखली जाईल! अशा या जगात उठून दिसणार्‍या वाडीला कुतूहलापोटी भेट दिली. त्याचाच हा ग्राऊंड रिपोर्ट! निवृत्त पोलीस उपअधीक्षक वामनराव खरात यांच्या आत्मचरित्राच्या अनुषंगाने स...

75 वर्षांत संवैधानिक पुरेशा प्रतिनिधीत्वाला कोलदांडा!

इमेज
  75 वर्षांत संवैधानिक पुरेशा प्रतिनिधीत्वाला कोलदांडा! -अंशत: नोकर्‍यांवर बोळवण : शासकीय आस्थापना सेवा तसेच शासनाच्या अधिन सर्व सेवा क्षेत्रांत आरक्षण धोरणानुसार अंमलबजावणी करण्याची अनुसूचित जाती-जमाती हितकारणी सभेची मागणी छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्‍तांना निवेदन सादर करते प्रसंगी डावीकडून किशोर मस्के, अनंत खोब्रागडे, अ‍ॅड. आतीश दासूद, हेमंत खोतकर, विलास कटारे, इंजि. भीमसेन कांबळे, भास्कर सरोदे, एकनाथराव त्रिभुवन, राज चौथमल, सिद्धार्थ पवार, निकाळजे उपस्थित होते.

स्वतंत्र मध्य महाराष्ट्र मागणीला जोर

इमेज
  स्वतंत्र मध्य महाराष्ट्र मागणीला जोर स्वतंत्र मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्र संघर्ष समितीचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे छत्रपती संभाजीनगर : स्वतंत्र मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्राच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी विनोद रुखमाबाई गोंडूराव खिरोळकर यांनी स्वीकारले. यावेळी भास्कर सरोदे, प्रा. डॉ. राजेंद्र शेजूळ, प्रा. डॉ. माणिक राठोड, प्रा. डॉ. धम्मानंद गायकवाड, इंजि. भीमसेन कांबळे, बाबासाहेब पवार यांचा शिष्टमंडळात समावेश होता. छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा सर्वच क्षेत्रात मागासलेला आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योगाबाबत परिस्थिती सोचनिय आहे. मानव विकास निर्देशांकात मराठवाड्याचे आठही जिल्हे मागास दर्शविले आहेत. मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी ‘मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्र’ राज्य निर्माण करावे, असे स्वतंत्र मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्र संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी विनोद रुखमाबाई गोंडूराव खिरोळकर यांनी निवेद...

‘बिनधास्त’ आणि ‘स्थितप्रज्ञ’ अभियंत्यांचा सेवापूर्ती कार्यगौरव

इमेज
‘बिनधास्त’ आणि ‘स्थितप्रज्ञ’ अभियंत्यांचा सेवापूर्ती कार्यगौरव कुशल कर्मामुळे होतो यशाचा मार्ग प्रशस्त- झाल्टे छत्रपती संभाजीनगर :  महापारेषणचे निवृत्त कार्य संचालक रोहिदास मस्के यांचा सेवागौरव करताना जे. एस. पाटील, सोबत रोहिदास मस्के यांच्या सहचारिणी प्रा. कुसूम मस्के व भुजंग खंदारे आदी. छत्रपती संभाजीनगर : अभियंत्यांनी आपल्या कामाचा परीघ वाढवला पाहिजे. सेवा कार्यकाळात एकदा तरी कठीण ठिकाणी काम केले पाहिजे. माणसांची कुशल कर्म यशाचा मार्ग प्रशस्त करतात. आज ज्या दोन अभियंत्यांचा सेवापूर्ती कार्यगौरव होत आहे, त्यांचे कुशल कर्म प्रबळ होते म्हणूनच ते आव्हानात्मक जबाबदार्‍या पार पाडू शकले, असे गौरवोद्वार निवृत्त संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी तथा माजी ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख सल्‍लागार उत्तमराव झाल्टे यांनी काढले. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन आणि बॅकवर्ड क्लास सिनिअर इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित महापारेषणचे निवृत्त कार्य संचालक रोहिदास मस्के व महापारेषणचे निवृत्त अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे यांच्या सेवापूर...