पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

जनतेवर करांचा भार : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगवर कोट्यवधींची उधळपट्टी

इमेज
  जनतेवर करांचा भार : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगवर कोट्यवधींची उधळपट्टी भास्कर सरोदे : छत्रपती संभाजीनगर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसर्‍या प्री-वेडिंग सोहळ्याला थाटात सुरुवात झाली आहे. लक्झरी क्रूझ ‘सेलिब्रिटी असेंट’ या तरंगते रिसॉर्टमधून इटली ते फ्रान्स असा तीन दिवसांचा ‘न भूतो न भविष्यती’ प्रवास सुमारे 800 पाहुणे करताहेत. भारतीय म्हणून या सोहळ्याचा आनंद आहेच! मात्र, देशात प्रचंड बेरोजगारी, कुपोषण, दारिद्र्य, भूकमारी असताना जनतेच्या करातून सरकारने पोसलेल्या उद्योगपतीने अशी कोट्यवधींची पाण्यात उधळपट्टी करावी का, हा संवेदनशील माणसाला पडलेला प्रश्‍न आहे. पहिल्या प्री-वेडिंगवर खर्चले 1250 कोटी! : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्‍न जुलैमध्ये आहे. यापूर्वी पहिली प्री-वेडिंग सेरेमनी जामनगर येथील रिलायन्स कंपनीच्या अ‍ॅनिमल रेस्क्यू सेंटर ‘वनतारा’ येथे उत्साहात पार पडली. यासाठी सुमारे 1250 कोटी रुपये खर्च आल्याचे बोलले जाते आहे.  5-स्टार तरंगत्या रिसॉर्टमधून प्रवास : दुसरी प्री-वेडिंग सेरेमनी 28 ते 30 मे दरम्या...

पोर्शे कार अपघात आणि राज्यसंस्था

इमेज
 पोर्शे कार अपघात आणि राज्यसंस्था पुणे : कल्याणनगरी येथे मोटारसायकलवर जाणार्‍या दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांना पाठीमागून येऊन धडक देणारी हीच ती पोर्शे तायकन कार. एका बिल्डरच्या 17 वर्षी मुलाने बेधुंद चालवून या दोन अभियंत्यांचा बळी घेतला.

रीडर ते रियासतकार : गो. स. सरदेसांईंचा लेखन प्रवास...

इमेज
 रीडर ते रियासतकार :  गो.  स.  सरदेसांईंचा लेखन प्रवास... -राजाराम सूर्यवंशी आज दि. 17 मे 2024 रोजी सुप्रसिद्ध इतिहासकार, लेखक, विद्वान गोविंद सखाराम सरदेसाई यांची 159 वी जन्मतिथी आहे. तथापि, महाराष्ट्रात ती कोठेही साजरी केली जात नाही. जाणार नाही. कारण राजे-रजवाडे आणि राजकारणी यांच्याशिवायही काही कर्तृत्ववान माणसेही इतर क्षेत्रात व विशेषतः ज्ञानाच्या क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रात होऊन गेलेत हे आम्हाला शिकवले जात नाही. त्यात लेखक व इतिहासकार हे दुर्लक्षांचे विषय आहेत. कारण ज्ञान व विद्येची उपासनाच आपल्याकडे केली जात नाही. पर्यायाने लेखक, विचारवंत यांना मानाचे स्थान दिले जात नाही. पैसा कमवतो तो मोठा! मग तो पैसा कुठल्याही मार्गाने येवो, आणला जावो, त्याचा उदो उदो केला जातो किंवा सत्तेच्या व अधिकाराच्या परिघात जो फिरतो त्याचाही उदो उदो केला जातो. मात्र, लेखक, कवी, साहित्यिक व विचारवंताला अनुल्लेखाने मारले जाते. जिवंतपणी व मेल्या नंतरही! ही आपली सामाजिक शोकांतिका आहे.  वास्तविक लेखक, कलाकार, मूर्तीकार, साहित्यिक, चित्रकार, विचारवंत हे समाजाचे भूषण असतात. त्यांच्या तपात...

शपा, परशुराम व सुभाषचंद्र सोनार!

इमेज
शपा, परशुराम व सुभाषचंद्र सोनार!       -राजाराम सूर्यवंशी हिंदू धर्मातील भगवान विष्णूचा सहावा अवतार म्हणजे परशुराम अवतार. या परशुरामाने 21 वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांचा निप्पात करून ती पृथ्वी त्याने ब्राह्मणांना दान दिली वा अर्पण केली होती, असा पुराणात उल्लेख आहे. या दशावतारातील चौथा अवतार रामाचा होता, तर पाचवा अवतार कृष्णाचा आणि सहावा अवतार परशुरामाचा दाखवला व लिहिला गेला आहे. हा ब्राह्मण पुत्र चिरंजीव आहे, असे पुराणांचे म्हणणे आहे. या अमर परशुरामाला महात्मा फुलेंनी 1 ऑगस्ट 1872 रोजी जूनी गंज पेठ, घर नंबर 527 वरून एक पत्र पाठवले होते. त्यात लिहिले होते की, ‘अरे दादा परशुरामा, तु चिरंजीव आहे, असे ब्राह्मणांच्या ग्रंथावरून समजले आहे........तरी तु तोंड चुकवून इकडे तिकडे फिरू नको. हे पत्र मिळाल्यानंतर सहा महिन्याच्या आत तु तुझे अस्तित्व दाखव व तुझ्या चमत्कारांनी इंग्रज , फ्रेंच वैगरे लोकांना पळवून लाव........’. महात्मा जोतीराव फुलेंचे हे पत्र काही परशुरामापर्यंत पोहचले नव्हते. कारण परशुराम हा राम व कृष्णांकडून शिल्लक राहिलेली पुरुषसत्तावादी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्या...

अक्षय तृतीया नव्हे, आखाजी!

इमेज
  अक्षय तृतीया नव्हे, आखाजी!  -पुजेचा स्त्रियांनाच मान; ब्राह्मण वा पुरुष का करत नाहीत पूजा?                                                 -राजाराम सूर्यवंशी ब्राह्मणी पुरुषसत्ताक समाजपद्धतीचा कट्टर पुरस्कर्ता परशुराम यांची जयंती म्हणजे अक्षय तृतीया!, तर भारतीय कृषक समाजाचा स्त्रीसत्ताक उत्सव म्हणजे आखाजी. अक्षय तृतीया ही हिंदू उच्चवर्णिय समाजामध्ये प्रचलित आहे. आजच्या तिथीला परशुराम यांचा माते रेणुकेच्या पोटी जन्म झाला होता. ते ऐवढे ब्राह्मण्यग्रस्त  होते की, त्यांनी आयुष्यभर क्षत्रियांचा म्हणजेच शेतकरी जातींचा विरोध केला होता.  येथे क्षत्रिय या शब्दाचा दुसरा अर्थ मातृसत्ताक समाजाचे प्रतिनिधी असा होतो. ‘क्षत्र’ या शब्दाचा मूळ अर्थ स्त्री होतो, असे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी अर्थवेदाचे मराठी भाषांतर या ग्रंथाच्या पान तेरावर नमूद केले आहे. म्हणून क्षत्रिय म्हणजे स्त्रीसत्ताक व नंतरच्या मातृसत्ताक समाजपद्धतीचा, समतावादी विचारांचा प्रतिनि...