पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वृध्देचे आमरण उपोषण

इमेज
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वृध्देचे आमरण उपोषण -गंगाखेड नगर परिषद प्रशासनाची टोलवाटोलवी -हक्‍काच्या पैशांसाठी दोन वर्षापासून सफाई कर्मचारी महिलेचा संघर्ष समीर रोडे, परभणी : प्रजासत्ताकदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्त झेंडावंदन, सलामी, कडक भाषणं, ढीगभर आश्‍वासनांची खैरात झडली जाईल. गेल्यावर्षी याच दिवशी कोणती आश्‍वासने दिली होती, याचा विसर ठरलेलाच. औपचारिकता म्हणून भारतीय संविधानाच्या उद्देशिका वाचनाचा सोहळा पार पडेल. ‘आम्ही भारताचे लोक... हे संविधान स्वत:प्रत अर्पण करीत आहोत...’, असे गर्वाने सांगितले जाईल. मात्र, संविधानानुसार वागणार नाही, असे वर्तन गंगाखेड नगर परिषदेचे प्रशासन करीत आहे. 60 वर्षाची वयोवृध्द महिला जीवघेण्या थंडीत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या हक्‍काच्या पैशांसाठी आमरण उपोषणाला बसली आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाशी खेटा घेऊनही उपयोग न झाल्याने या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. जनाबाई गणपती साबळे असे या सेवानिवृत्त सफाई कामगार महिलेचे नाव आहे. गंगाखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना त्यांनी 4-1-2022 व 19-1-2022 च्या विनंती अर्जान्वये पैसे...

आठवणींना उजाळा : सातवीत काढला पहिला मोर्चा; नि केला दोन दिवसाचा संप!

इमेज
आठवणींना उजाळा : सातवीत काढला पहिला मोर्चा; नि केला दोन दिवसाचा संप! कापडसिंगी : केंद्रीय प्राथमिक शाळेची हीच ती इमारत आजही डौलाने उभी आहे. तत्कालीन सरपंच सखाराम पवार यांच्या कार्यकाळात या शाळेचे बांधकाम 1968 साली झाले. 54 वर्षानंतरही पत्र्याचे शेड टाकलेली शाळा शेकडो-हजारो विद्यार्थ्यांचे अज्ञान दूर करत दिमाखात उभी आहे. अन्यथा आजकालच्या चकचकीत शाळा दुसर्‍याच वर्षी वाळूच्या बंगल्यासारख्या कोसळताना दिसतात. (छाया : गौतमी )   भास्कर सरोदे, औरंगाबाद : मार्चचा महिना. केंद्रीय प्राथमिक शाळा, कापडसिंगी. एकपारगी (फक्‍त उन्हाळ्यातच अर्धादिवस) शाळा. एकेसकाळी 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) आणि 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) ला जशी प्रभातफेरी निघावी, तशीच मुलांची प्रभातफेरी निघाली. फरक एवढाच की, आमच्यासोबत कुणी शिक्षक नव्हते. बर्‍याच मुलांच्या हातात पाट्या होत्या आणि त्यावर लिहिले होते की, ‘शिक्षक द्या, अन्यथा शाळा बंद’. होय, तो विद्यार्थ्यांनी काढलेला मोर्चाच! कशाची प्रभातफेरी म्हणून गावातील मंडळीही रस्त्यावर आली. कुणी आमुक घोषणा द्या, टमूक घोषणा द्या, असे सांगत होता. एकदोघे तर पालक-शिक्षक समितीच...

रोहन माळवदकर (विजयस्तंभ स्मारकाच्या रखवालदाराचा बेईमान वंशज) संघाच्या गोटात आणि आनंद दवेच्या जिभेतील ऍस्पी फुत्कार

इमेज
रोहन माळवदकर (विजयस्तंभ स्मारकाच्या रखवालदाराचा बेईमान वंशज) संघाच्या गोटात आणि 'आनंद दवे'च्या जिभेतील ऍस्पी फुत्कार भारतीय भूप्रदेशांत अनेक जातीच्या विषारी सापाच्या प्रजाती अस्तित्वात आहेत. विशेषतः मन्यारी, घोंनस, कोब्रा प्रजाती ह्या जीवघेण्या म्हणून ओळखल्या जातात. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातील ASP ऍस्प जातीचा लाल रंगाचा छोट्या चणीच्या दीड फूटलांबीच्या ASP चे वैशिष्ट्ये असे की, ' तो त्याच्या अंगातून सतत रसायनयुक्त विष बाहेर फेकत असतो. एव्हढेच नव्हे तर तो जिथे वास्तव्यास असतो तिथे कुठलीच वनस्पती उगवत नाही. त्याच्या त्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे दक्षिण आफ्रिकन लोकं ASP चे वास्तव्य चटकन ओळखतात. तशाच एका विदेशी प्रजातींपैंकी ब्रा.म.संघाचा आनंद दवे असायला हवा!'   एक तर छत्रपती शिवरायांनी कष्टाने अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या मदतीने रक्ताच्या आहुत्या देऊन निर्माण केलेले रयतेचे राज्य उणे पुरे 39-40 वर्षेच टिकवले. 17 नोव्हेंबर 1713 ते 1818 अशी 104 वर्षे 44 दिवस पेशव्यांची निरंकुश सत्ता.त्यांच्याच सत्तेतील 14 जानेवारी 1761 च्या पानिपतातील नामुष्कीयुक्त हार फुकाचा विजयात...

विश्‍वनिर्मितीचे गूढ उकलणारा दुर्मीळ ग्रंथ!

इमेज
  विश्‍वनिर्मितीचे गूढ उकलणारा दुर्मीळ ग्रंथ!   -महात्मा जोतीराव फुले लिखित; परंतु समग्र वा ङ् म यातून सुटलेले बहुप्रतिक्षित ‘निर्मिकाचा शोध’ आणि ‘मनुस्मृतीचा धिक्‍कार’ वाचकांच्या भेटीला   भास्कर सरोदे, औरंगाबाद :  औरंगाबाद येथील जीवक प्रकाशनने महात्मा जोतीराव फुले यांच्या ‘निर्मिकाचा शोध’ आणि ‘मनुस्मृतीचा धिक्कार’ या दोन दुर्मिळ ग्रंथाचा एक संयुक्त ग्रंथ बनवून वाचकांच्या सेवेशी सादर केला आहे. राजमाता जिजाऊ जयंतीदिनी हा बहुमूल्य ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. ज्येष्ठ सत्यशोधक जी. ए. उगले यांनी प्रस्तावना लिहून या ग्रंथाची उपयुक्तता समाजासमोर ठेवली आहे. तर संपादक भास्कर सरोदे यांनी संपादकीयामधून विश्‍वाची निर्मिती या अनुषंगाने महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांना उजाळा दिला आहे. विश्‍वनिर्मितीचे गूढ, विश्‍वाचा निर्माता देव आहे काय? या प्रश्‍नांची उत्तरे या ग्रंथातून मिळणार आहेत. त्यादृष्टीने हा ग्रंथ अनमोल ठरणार आहे. मराठा राज्य समाप्‍तीसाठी या बाजीरावांचा जन्म! : सत्यशोधक जी. ए. उगले आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, ‘दुसर्‍या बाजीरावांनी 23 वर्षे पेशवाई राजसत्ता उप...

भिमा कोरेगावप्रश्‍नी सरकार उदासीन

इमेज
भिमा कोरेगावप्रश्‍नी सरकार उदासीन -दादाभाऊ अभंग यांचा खळबळजनक आरोप भास्कर सरोदे, औरंगाबाद : महाराष्ट्र सरकार ऐतिहासिक स्थळांच्या बाबतीत उदासीन आहे. भिमा कोरेगाव विजयस्तंभ जमीन अतिक्रमण प्रकरणावरून सरकारच्या उदासिनतेचा आणि अनास्थेचा प्रत्यय येतो. भिमा कोरेगाव विजयस्तंभाचे उत्तरदायीत्व महाराष्ट्र सरकारचे आहे, हे समजायलाही तेथे ‘दंगल’ (2018) व्हावी लागते! नियोजनबद्ध आणि पूर्वनियोजित झालेल्या दंगलीनंतर भिमा कोरेगाव शौर्यदिन आणि ‘बुद्धभूषण’कार संभाजी महाराजांचा ऐतिहासिक संदर्भ समाजाला माहिती होतो. अन्यथा हे स्थळ केवळ ‘महारां’च्या शौर्य इतिहासाचेच प्रतीक असल्याचा समाजाचा गैरसमज असतो. त्यामुळे ‘कुंपणनानेच शेत खाल्‍ले’ तर दोष कुणाचा? असाच प्रकार भिमा कोरेगाव विजयस्तंभ जमीन अतिक्रमणाबाबत घडला आहे. ही जमीन सरकारी आहे, हेच सरकारच्या ध्यानीमनी नसावे, याला काय म्हणावे. भिमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पार्श्‍वभूमिवर (1 जानेवारी 2022) न्यायप्रविष्ठ प्रकरणाचा प्रवास भिमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी बहुजन शासकला क्रमवार सांगितला. विजयस्तंभाचा इतिहास : दि. 1 जाने...