पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

‘निवडुंग : आठवणींचे सोनेरी पान’मधील व्यक्‍तिरेखा चित्ररूपात साकारताना चित्रकार तथा शिल्पकार नि:शब्द का झाला?

इमेज
‘निवडुंग : आठवणींचे सोनेरी पान’मधील व्यक्‍तिरेखा चित्ररूपात साकारताना चित्रकार तथा शिल्पकार नि:शब्द का झाला? वाचा : चित्रकार तथा शिल्पकार विकास सरवदे यांच्या भावना छत्रपती संभाजीनगर :  ‘निवडुंग : आठवणींचे सोनेरी पान’ हा एक सत्यघटना संग्रह आहे. यामध्ये बहुविध व्यक्‍तीमत्व असणार्‍या व्यक्तींच्या समृद्ध जीवनाचा संघर्षमय जीवनपट मांडण्यात आला आहे. या सर्व व्यक्तींच्या जीवनाचा प्रवास मला चित्ररूपात मांडण्याची संधी प्राप्त झाली, हे मी माझे भाग्य समजतो. अशी जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल या ग्रंथाचे लेखक तथा बहुजन शासकचे संपादक भास्कर सरोदे यांचे खूप खूप आभार मानतो. लिखाण झालेल्या व्यक्‍तिरेखांवर चित्रांची निर्मिती करण्या संदर्भात  सरोदे सरांसोबत चर्चा झाली, तेव्हा मी सहज हे काम पूर्ण करेल असा माझा प्राथमिक अंदाज होता. मात्र, तो अल्पावधीतच फोल ठरला. व्यक्‍तिरेखा वाचनासाठी घेतल्या तेव्हा लिखाणाची शैली खूप गहन असल्याने माझ्यासाठी ते एक आव्हानात्मक काम होते. ग्रंथातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील चांगले आणि वाईट अनुभव, जीवनात घडलेल्या अनेक संघर्षमय घटनांचे सरांनी खूप आत्मीयतेने व अत्यं...

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

इमेज
  लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेच्या हॅण्डबिलचे प्रकाशन पोलीस निरीक्षक कैलास लहाने यांनी केले. सोबत इंजि. भीमसेन कांबळे, संपादक भास्कर सरोदे, निवृत्त जनसंपर्क अधिकारी यशवंत भंडारे, महेश सिरसीकर, किशोर म्हस्के, प्रा. सुखदेव खंदारे आदी.