पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

भान नसलेले आंदोलन!

इमेज
 भान नसलेले आंदोलन! -राजाराम सूर्यवंशी  सध्याच्या सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण हा आजचा विषय आहे. आपल्या देशावर महात्मा गांधीचे अनेक उपकार झालेले आहेत. त्यातला एक सर्वात मोठा उपकार आहे सत्त्याग्रहाचे हत्त्यार! त्या खालोखाल दुसरा उपकार आहे सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा! सत्त्याग्रह म्हणजे स्वतःच्या वा आपल्या समूहाच्या हितासाठी वापरावयाचे वैयक्तिक आत्मक्लेषाचे, उपोषणाचे हत्यार! या सत्त्याग्रह वा उपोषण आंदोलनात व्यक्तीगत अभिनिवेश अधिक व सामाजिक जाणीव कमी असते, तर सविनय कायदेभंग चळवळीत लोकांचा सहभाग असतो. या चळवळीत आत्मभान व सामाजिक भान दोन्ही असतात. टोकाचा वा अतिरेकी अभिनिवेष नसतो.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  व महात्मा फुलेंनी त्यांच्या त्यांच्या सामाजिक जीवनात टोकाच्या वा वैयक्तिक अभिनिवेषाला अजिबात थारा दिला नव्हता. त्यांचा सारा भर सामाजिक आंदोलन व लोक सहभागातून उभारलेल्या चळवळीवर होता. त्यामुळे त्यांच्या चळवळींना सामाजिक भान आपोआप प्राप्त होत असे. महात्मा फुले व डॉ. आंबेडकरांनी चुकूनही वैयक्तिक सत्त्याग्रह व उपोषाण केले नाही. कारण या चळवळीत सामाजिक जाणिवांना जागा नसते हे त्...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी!

इमेज
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी!           शिवरायांना शूद्र ठरविणार्‍या पुरोहितांनीच भरपूर दक्षिणेच्या लोभाने क्षत्रियत्व बहाल केले. बाबासाहेबांच्याच शब्दात सांगायचे तर ‘सामाजिक दर्जा ठरविण्याच्या बाबतीत ब्राह्मण जे निर्णय देत असत ते कोणत्या पक्षाकडून किती पैसा मिळेल याकडे दृष्टी ठेवून ते कमी जास्त अनुकूल निर्णय देत असत. रोमन कॅथॉलिक पंथातील पाद्री लोक, लोकांच्याकडून पैसा घेऊन त्यांच्या पापांचे क्षालन करीत असत. त्याचप्रमाणे ब्राह्मण लोक आपले निर्णय विकीत असत. शिवाजी क्षत्रिय होता, असा जो निर्णय गागाभटाने दिला होता तो प्रामाणिकपणे दिलेला निर्णय नव्हता.’