पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

दुर्लक्षित घटोत्कच बुध्द लेणीचे ‘आम्ही मार्गदीप’

इमेज
 दुर्लक्षित घटोत्कच बुध्द लेणीचे ‘आम्ही मार्गदीप’ -सर जेम्स प्रिन्सेप यांची जयंती व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राबवली स्वच्छता मोहीम -भारतीय पुरातत्व विभाग दखल घेणार? घटोत्कच लेणी (जंजाळा) : जंजाळा गावाजवळ असलेल्या घटोत्कच बुद्ध लेणीचे विलोभनीय दृश्य पर्यटकांना खुणावत आहे.

राष्ट्रध्वज : अशोकाच्या कल्याणकारी राज्याची पुनर्स्थापना

इमेज
राष्ट्रध्वज : अशोकाच्या कल्याणकारी राज्याची पुनर्स्थापना राष्ट्र ध्वजातील अशोक चक्र हे भारताच्या प्राचीन संस्कृतीतील अनेक बाबींचे प्रतीक आहे, ज्यास अशोकाच्या नावामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सम्राट अशोक हा केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या इतिहासातही महत्त्वाचा आहे. आज भारत ज्या संघर्ष व असहिष्णुतेच्या वातावरणातून जात आहे, त्यावेळेला अशोकाचे नाव अधिकच महत्त्वाचे बनते. कारण प्राचीन काळात भारताने काही विशिष्ट मूल्यांना धारण केले होते. त्यामुळेच तो आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकला. भारत हे कधीही संकुचित राष्ट्र नव्हते, त्याने दुसर्‍या राष्ट्रांचा कधीही तिरस्कार केला नाही. अनेक उलथापालथी घडल्या मात्र भारत प्राचीन काळापासून काही मूलभूत मूल्यांवर ठामपणे उभा आहे. त्याची पायाभरणीच या मूल्यांवर झालेली आहे. भारताची खरी ताकद या मूल्यांमध्येच आहे. त्यात सर्वात महत्त्वपूर्ण जे मूल्य आहे, ते म्हणजे स्वीकारर्हता. कोणत्याही राष्ट्रासाठी त्याचा ध्वज व राजमुद्रा ही प्रतिके अत्यंत महत्त्वाची असतात. या प्रतिकांमधून त्याची अस्मिता व त्याने ज्या मूल्यांचा आणि ध्येयांचा अंगिकार केला आहे, त्याची प्रचिती येत अस...