पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

विद्यापीठं आरएसएसच्या शाखा!

इमेज
 विद्यापीठं आरएसएसच्या शाखा! ‘बशा’ एक्सक्ल्युझिव्ह : मुंबई विद्यापीठातील घृणास्पद प्रकार मुंबई, नागपूर : लोकशाही भारतात परवानगीशिवाय कुणालाही शस्त्र बाळगण्याचा अधिकार नाही. मग दसर्‍याच्या दिवशी आरएसएसकडून ज्या अत्याधुनिक शस्त्रांची पूजा केली जाते, त्याची परवानगी आहे का? हा प्रश्‍न आजपर्यंत शासन वा प्रशासनाला पडू नये, याचेच आश्‍चर्य वाटते. लोकशाही आणि सहिष्णू भारतात असे शस्त्रांचे प्रदर्शन कशासाठी? असाही प्रश्‍न कुणी विचारत नाही. आजतर तसे विचारण्याची सोयच नाही! नागपूरच्या रेशीम बागेतील संघ मुख्यालयातील ही शस्त्रे उद्या विद्यापीठातील वाचनालयात दिसली तर नवल वाटू नये! कारण देशातील विद्यापीठंच आता आरएसएसच्या शाखा म्हणून वर्तन करू लागल्या आहेत!

‘अ’ अदानीचा, आर्यन आणि अंमलीपदार्थाचाही!

इमेज
 ‘ अ ’ अ दानीचा, आ र्यन आणि अं मलीपदार्थाचाही! -विश्‍वगुरू भारतात ‘ राई ’चा पर्वत होतो; मात्र ‘ पर्वता ’ची राई एवढीही चर्चा होत नाही; हाच का बदलता भारत ? भास्कर सरोदे, औरंगाबाद (शनिवारी, 9 ऑक्टोबर 2021) : देश सध्या दोन घटनांनी ढवळून निघालाय. खरं तर चार घटना म्हणा. दोन घटनांवर जाणीवपूर्वक पांघरून घातले गेले. तिसरी घटना झाकण्यासाठी चौथ्या घटनेला फारच महत्व दिले गेले. माध्यमांनी दोन घटनांकडे हेतूत: कानाडोळा केला. एक असे की, ‘टाइम’ मॅगेझिनने घेतलेली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नकारात्मक दखल आणि दुसरी म्हणजे गुजरातेतील मुंद्रा अर्थात अदानी पोर्टवर पकडलेला ड्रग्जने भरलेला कंटेनर. तर लखीमपूर खिरीत केंद्रिय गृहराज्य मंत्र्याच्या मुलाने भरधाव जीपच्या सहाय्याने नि:शस्त्र, निरपराध आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना चिरडले. हा आरएसएस प्रणित भाजप सरकारचा स्वभाव आहे आणि बदलता भारतही! ही घटना दडपण्यासाठी अथवा तिच्यावरील लक्ष दुसरीकडे हटविण्यासाठी उत्तर प्रदेशपासून दूर महाराष्ट्रात श्रीमंतीचा माज चढलेल्या बिघडलेल्या औलादींच्या रेव्ह पार्टीला खूप हवा दिली जातीय. या घटनेत बॉ...