पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

चिमुरड्यांच्या मदतीसाठी दात्यांची धाव!; बहुजन शासकच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद

इमेज
चिमुरड्यांच्या मदतीसाठी दात्यांची धाव!; बहुजन शासकच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद   औरंगाबाद : भाग्यनगर झोपडपट्टीत शालेय साहित्याचे वाटप करताना कमलेश माधवराव बोरडे, प्रा. डॉ. मंजिरी कमलेश बोरडे, सोबत बहुजन शासकचे संपादक भास्कर सरोदे आणि शिक्षक भगवान सदावर्ते. भास्कर सरोदे, औरंगाबाद (28 सप्टेंबर 2021) : ‘दात्यांना आवाहन : वॉचमनकी करून विद्यार्थी देतोय झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे…विद्यार्थीही असे की ज्यांच्याकडे वह्या, पुस्तकं, शालेय साहित्याचा अभाव!’, या मथळ्याखाली बहुजन शासकने दिलेल्या वृत्ताला दात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. भाग्यनगर आणि शक्‍तीनगर झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दाते धावून आले. अनेकांनी फोन करून आम्ही मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. तथापि, गरजेपुरते दान स्वीकारून ज्यांनी तत्परता दाखविली त्यांच्याशी कृतज्ञता बाळगून मोफत शिक्षणाचा उपक्रम सिद्ध करण्यासाठी पुन्हा आवाहन करीत आहोत. पाऊलखुणा! : धम्मपारायण व्यक्‍ती जगाचा निरोप घेतात; परंतु आपल्या पाऊल खुणा तशाच सोडून जातात. माधवरावजी बोरडे हे आज आपल्यात नाहीत. त्यांच्या दानशूरतेबाबत आपण सर्वजण परिच...

दात्यांना आवाहन : वॉचमनकी करून विद्यार्थी देतोय झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे…विद्यार्थीही असे की ज्यांच्याकडे वह्या, पुस्तकं, शालेय साहित्याचा अभाव!

इमेज
दात्यांना आवाहन : वॉचमनकी करून विद्यार्थी देतोय झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे…विद्यार्थीही असे की ज्यांच्याकडे वह्या, पुस्तकं, शालेय साहित्याचा अभाव! भास्कर सरोदे, औरंगाबाद (21 सप्टेंबर 2021) : ‘विश्‍वगुरू’ भारतातील औरंगाबाद या ‘ग्लोबल खेड्या’मधील भाग्यनगरातील झोपडपट्टीत ‘बिना छताची शाळा’ सुरू आहे. स्वत: वॉचमनकी करून एलएलबीचा विद्यार्थी मुले-मुली शिक्षण प्रवाहाबाहेर जाऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देत आहे. जिथे विद्यार्थ्यांकडे वह्या, पुस्तकं, शालेय साहित्याचा अभाव आहे. दोन्ही बाजुंनी अभावग्रस्तता; पण इच्छाशक्‍तीची श्रीमंती आहे. कोडग्या सरकारचे जाऊ द्या, दात्यांनो, एकदा तिथे जाऊन तर बघा, तुमच्या र्‍हदयाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही.   कोरोनाचे कारण पुढे करून सरकारने शाळेची कवाडं बंद केली. मुठभर श्रीमंतांची मुले-मुली मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉपवर ऑनलाईन आहेत, मात्र शिक्षणाचे माहिती नाही! वर्ष दोन वर्षे शाळा बंद झाल्या की, कोट्यवधी विद्यार्थी शाळाबाह्य होणार हे निश्‍चित. शाळाच नसल्याने भारताचे भविष्य अंधारात जाणार, हे सांगण्यासाठी भविष्य नसलेल्या भविष्यवे...

तमिळनाडू : सामाजिक न्यायाचा रोडमॅप!

इमेज
तमिळनाडू : सामाजिक न्यायाचा रोडमॅप! पेरियार रामासामींच्या राज्यात क्रांतिकारी निर्णयांचा धडाका -तमिळनाडूत ‘नीट’ विरोधी विधेयक मंजूर -वैद्यकीय प्रवेशात सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आरक्षण भास्कर सरोदे, औरंगाबाद (17 सप्टेंबर 2021) : तमिळनाडू राज्यात एकामागून एक क्रांतिकारी निर्णय घेतले जाताहेत. सांस्कृतिक आणि शैक्षणिक निर्णयांमुळे राज्य देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. राज्य पुरोहितशाहीमुक्‍त केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणात विषमता वाढवणार्‍या ‘नीट’ धोरणाला कोलदांडा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. तमिळनाडू विधानसभेत ‘नीट’विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता ‘नीट’ परीक्षेऐवजी बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय शाखांना प्रवेश द्यावा, असे त्यात म्हटले आहे. शिवाय वैद्यकीय प्रवेशात शिक्षण हक्‍क कायदा-2009 अंतर्गत शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 7.5 टक्के जागा राखीव ठेवून एम. के. स्टॅलिन सरकारने ‘सामाजिक न्यायाचा रोडमॅप’ तयार केल्याची चर्चा आहे. पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्र राज्य असा निर्णय घेण्याची हिंमत दाखवेल काय, असा प्रश्‍न विचारला जात आहे. मात्र, य...

‘पेरियारच्या हृदयात हिंदू जातीतील ब्राह्मणेतर लोकांना पुरोहित बनण्यास नाकारले जाण्याची सल होती’

इमेज
  ‘पेरियारच्या हृदयात हिंदू जातीतील ब्राह्मणेतर लोकांना पुरोहित बनण्यास नाकारले जाण्याची सल होती’ पेरियार ई. व्ही. रामासामी भारतात द्रविडीयन संस्कृतीने आपले स्वतंत्र अस्तित्व जपले आहे. द्रविड आणि आर्य संघर्ष आजही पाहावयास मिळतो. द्रविड संस्कृतीचे नेतृत्व पेरियार ई. व्ही. रामासामी नायकन यांनी केले. त्यांचा वारसा एम. करूणानिधी यांनी चालवला. आता त्यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन त्या मार्गाने जात आहेत. अलीकडेच तामिळनाडू विधानसभेने कायदा करून ब्राह्मणेतर जातीतील 24 जणांना राज्यभरातील हिंदू मंदिरांमध्ये पुरोहितांचे काम करण्याच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. ब्राह्मणांसाठीच खास आरक्षित असलेले हिंदू पौरोहित्य मुक्त करण्याचे द्रविड चळवळीचे स्वप्न होते. या संदर्भातील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्टॅलिन सरकारचा हा निर्णय खर्‍या अर्थाने पेरियार यांच्या 143 व्या जयंती निमित्त (17 सप्टेंबर 1879) त्यांना हे अभिवादन ठरला आहे. या निर्णयानंतर स्टॅलिन यांनी एक ट्विट करून ‘पेरियारच्या हृदयात हिंदू जातीतील ब्राह्मणेतर लोकांना पुरोहित बनण्यास नाकारले जाण्याची सल होती’, असे म्हटले होते. पेरियार ई. व्ही. राम...