पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

तिरंग्याचे दुश्मन!

इमेज
 तिरंग्याचे दुश्मन! शेतकरी आंदोलन : शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवणार्‍यांनी वस्तुस्थितीचे भान ठेवावे. तिरंग्याने घाम पुसणारांची आणि तिरंग्यासमोर निशान साहिब फडकवणार्‍यांची संस्कृती एकच! लोकशाही आणि संवैधानिक प्रतीकांवर हल्‍ला करुन ‘देशभक्‍त’ होता येते ही नवीन परिभाषा सत्ताधार्‍यांकडून शिकावी. लोकशाहीची हुकुमशाही आणि संसदेचे मंदिर बनवताना त्यांना थोडीही लाज वाटत नाही. झुंडीचा वारसा असणार्‍यांना लोकशाहीची किंमत काय कळणार? संसदेच्या पायर्‍यांवर पाया पडून संसदेचे मोल तरी कसे समजणार? कारण त्यांचा विश्‍वास झुंडशाही आणि हुकुमशाहीवर असतो. त्या पद्धतीनेच तुमचा व्यवहार. एनआरसीचे आंदोलन असो की, शेतकर्‍यांचे आंदोलनाला देशद्रोही ठरवताना सत्ताधार्‍यांनी आपला भूतकाळ, वर्तमान काळ तपासला तर समजून येईल खरे देशद्रोही कोण? भास्कर सरोदे, औरंगाबाद (रविवार, दि.31 जानेवारी 2021): 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी ‘किसान ट्रॅक्टर मार्च’ दरम्यान लाल किल्ल्यावर विशिष्ट धर्माचा झेंडा फडकावून तिरंग्याचा अपमान करण्यात आला. तसेच लाल किल्ल्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. हे सारे शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठ...

प्रजासत्ताक दिनाला गालबोट ; आरएसएसचा एजंट दीप संधुने केले कार्यान्वित षडयंत्र!

इमेज
 प्रजासत्ताक दिनाला गालबोट ; आरएसएसचा एजंट दीप संधुने केले कार्यान्वित षडयंत्र! -लाल किल्ल्यावर समाजकंटकांनी फडकवला झेंडा समाजकंटक घुसले, की घुसू दिले? :  किसान ट्रॅक्टर मार्च दरम्यान भारताची अस्मिता असलेल्या लाल किल्ल्यावर जाण्याचा कोणताही बेत नव्हता. मग लाल किल्ल्यात घुसणारे कोण होते? शेतकरी नव्हते तर कोण होते? समाजकंटक घुसले, की घुसू दिले? पोलीस कुणाच्या आदेशाची वाट पाहत होते, की कुणाच्या आदेशान्वये काम करत होते? लोकशाहीत आंदोलन करू नका असे म्हणता येत नाही, पण त्यात काही समाजकंटक घुसवून उधळवून लावले जावू शकते. अशा घटनांची सत्ताधारी कधीच जबाबदारी घेत नसतात, पण समाजकंटकांच्या आडून जबाबदारीचे भान देवू शकतात! शांततापूर्ण किसान ट्रॅक्टर मार्च दरम्यान हेच घडले, हे कुणी नाकारू शकत नाही. सत्ताधारी -षडयंत्रकारी साथ -साथ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दीप संधु. दीप संधुच्या नेतृत्वात लाल किल्ल्यावर धुडगूस घातला आणि झेंडा फडकवला. भास्कर सरोदे, औरंगाबाद (बुधवार, दि. 27 जानेवारी 2021) : राष्ट्रीय स्वंय सेवक संघ प्रणित भाजपच्या काळ्या राजवटीत भारताची मान खाली झुकली आहे. उद्योगपती अंबानी...

डॉ. आंबेडकर आणि दिल्‍लीतील शेतकरी आंदोलन

इमेज
डॉ. आंबेडकर आणि दिल्‍लीतील शेतकरी आंदोलन ‘गरीब शेतकरी वर्गातून आलेले नेते शेतकर्‍यांचे दुःख समजू शकतील. ज्यांनी आजपर्यंत शेतकर्‍यांचे केवळ शोषण केलेले आहे ते शेतकर्‍यांचे प्रश्न समजू शकणार नाहीत. शेतकर्‍यांचे खरे प्रतिनिधीच शेतकर्‍यांनी निवडून दिले पाहिजेत. जे मारवाडी खोटेनाटे दस्तऐवज बनवून शेतकर्‍यांची लूट करतात ते शेतकर्‍यांचे प्रतिनिधी होऊ शकणार नाहीत’.                                                                                                      -डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवी दिल्‍ली : केंद्रातील भाजप सरकारने बनविलेले भांडवलदारधार्जिणे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी देशभरातील शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून...

कोलेजिअम व्यवस्था : सामाजिक न्यायाची अव्यवस्था

इमेज
कोलेजिअम व्यवस्था : सामाजिक न्यायाची अव्यवस्था   - अ‍ॅड. प्रतीक बाळासाहेब कर्डक साप्‍ताहिक बहुजन शासकच्या वाचकांच्या सोयीसाठी ‘ Bahujan Shasak Media ’ नावाचा नवीन ब्लॉग तयार केला आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्युटर आणि हार्डकॉपी याव्यतिरिक्‍त ही सुविधा उपलब्ध करुन देताना आनंद होत आहे. कारण या ब्लॉगवर बहुजन शासकमध्ये प्रसिद्ध झालेले समाजोपयोगी, अत्यंत महत्त्वाचे लेख या ब्लॉगवरही पोस्ट करण्यात येणार आहेत. यामुळे वाचकांना महत्त्वाची माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून वाचता येईल. तसेच लेखकांनाही आपले म्हणणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल. वाचक आणि लेखक यांच्यासाठी हा दुग्धशर्करा योग म्हणता येईल. हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करुन एखाद्या प्रश्‍नावर मोठ्या प्रमाणात चर्चा घडवून आणता येईल. शिवाय संबंधितांना दखल घेण्यास भाग पाडता येईल.  - भास्कर सरोदे मुख्य संपादक  बहुजन शासक औरंगाबाद, 23 जानेवारी 2021 : लोकशाही, प्रजासत्ताक, संविधान, स्वायत्त संविधानिक संस्था, सेंट्रल बँक (रिझर्व बँक), स्वायत्त प्रशासन प्रणाली, स्वायत्त कायदा बनवणारी प्रणाली आणि अशा अनेक आधुनिक राज्यशास...