पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

संविधान, गांधी आणि हरिजन!

इमेज
 संविधान, गांधी आणि हरिजन! भास्कर सरोदे : विशेष संपादकीय (बहुजन शासक, दि. 7 जून 2024) : 18 वी लोकसभा निवडणूक भारतीय संविधानाला मध्यभागी ठेऊन लढल्या गेली. ‘संविधान बदलणार?’ आणि ‘संविधान बचाव’ हे दोन शब्द केंद्रस्थानी होते. प्रामुख्याने ‘इंडिया’ आणि ‘एनडीए’ या दोन आघाड्यांमध्ये लढत होईल याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. एकाधिकारशाही वा द्विपक्षीय पद्धती हे भारतीय लोकशाहीविरोधी कृत्य लोकांच्या लक्षात येणार नाही, इतक्या कुशलतेने हाताळण्यात आले. केंद्रात राष्ट्रीय स्वयं सेवक संघप्रणित भाजपची सत्ता आल्यापासून संविधानाच्या विरोधात जाहीरपणे जाणीवपूर्वक बोलले गेले. दिल्‍लीत संविधान जाळले, संविधान बदलण्याची भाषा करण्यात आली, मोदी सरकारचे तर हरएक पाऊल संविधानविरोधी असताना फारसा आवाज उठला नाही. जसजशी सार्वत्रिक निवडणूक जवळजवळ येत गेली तसतशी संविधानाच्या समर्थनार्थ मतं प्रदर्शित होऊ लागली. ‘निर्भय बनो’ ते ‘संविधान बचाव’चा पुकारा करण्यात आला. अत्यंत सुनियोजितपणे समाजमन घडविण्यासाठी बुद्धिजिवी, वकील, प्राध्यापक, तथाकथित विचारवंत, साहित्यिक, डॉक्टर सरसावले. संविधान विरोधकांनीही ‘पुन्हा सत्तेत आलो तर...