पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

ईव्हिएमविरोधात आक्रोश! : आमरण उपोषण, स्वाक्षरी मोहीम, याचिका, पदयात्रा, अभियानाद्वारे जनजागृती

इमेज
  ईव्हिएमविरोधात आक्रोश! : आमरण उपोषण, स्वाक्षरी मोहीम, याचिका, पदयात्रा, अभियानाद्वारे जनजागृती -निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, सत्ताधारी ऐकताय ना! औरंगाबाद : ईव्हिएम हटवून बॅलेट पेपरवर सर्व निवडणुका घ्या, या मागणीसाठी अनंत केरबाजी भवरे विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. भास्कर सरोदे, औरंगाबाद : 2024 च्या निवडणुकीच्या तोंडावर ईव्हिएमविरोधात आक्रोश तीव्र झालाय. ‘ईव्हिएम हटाओ, देश बचाओ’चे नारे गुंजताहेत. ‘ईव्हिएम हटाओ, बॅलेट पेपर लाओ’चे आर्त आवाज ऐकायला मिळताहेत. त्यासाठी आमरण उपोषण, स्वाक्षरी मोहिमा, सर्वोच्च न्यायालयात याचिका, पदयात्रा, जनजागृती अभियानाद्वारे ईव्हिएमला विरोध दर्शविला जात आहे. पृथ्वीवर बसून चांद्रयान मोहीम नियंत्रित करता येऊ शकते तर ईव्हिएम का नाही, असा सवाल उपस्थित करताना बॅलेट पेपरद्वारा निवडणुका घेण्याची मागणी जोर धरत आहे. तथापि, लोकशाहीतील हा आवाज निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, सत्ताधारी पक्षाच्या कानावर आदळून त्यांना जाग येते का, हाच खरा प्रश्‍न आहे. नुकत्याच पाच राज्यातील निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय झाला. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्त...

‘इंडिया’चा निवडणूक अजेंडा काय?; एनईपीला पर्यायी ‘सत्यशोधकीय शिक्षण धोरण’ आणि ‘एकमय राष्ट्र’ची ग्वाही देणार काय? : प्रा. प्रतिमा परदेशी यांचा सवाल

इमेज
‘इंडिया’चा निवडणूक अजेंडा काय?; एनईपीला पर्यायी ‘सत्यशोधकीय शिक्षण धोरण’ आणि ‘एकमय राष्ट्र’ची ग्वाही देणार काय? छत्रपती संभाजीनगर : सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समारोपीय अधिवेशनाचे चातुर्वर्ण्याची उतरंड फोडून उद्घाटन करताना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, सोबत आयपीएस सुरेश खोपडे, सत्यशोधक पत्रकार निरंजन टकले, विद्रोही साहित्यिक प्रतिमा परदेशी, डॉ. लीलाताई भेले, सुनयना अजात, मुख्य आयोजक अ‍ॅड. के. ई. हरिदास, स्वागताध्यक्ष महेश निनाळे आदी. चातुर्वर्ण्याची उभी उतरंड फुटता फुटत नाही, म्हणून तिला आधी समपातळीवर आणून नंतर फोडण्यात आली, हे विशेष.

सत्यशोधक समाजाची दिडशे वर्ष : आढावा व चिंतन!

इमेज
 सत्यशोधक समाजाची दिडशे वर्ष : आढावा व चिंतन!               -राजाराम सूर्यवंशी             1970 साली वाईच्या वसंत व्याख्यानमालेत बाबा आढाव यांचे ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील मराठा जातीचे वर्चस्व’ या विषयावर व्याख्यान झाले होते. या घटनेला आज त्रेपन्न वर्षे झालीत. त्यावेळी सत्यशोधक समाजाचा स्थापनेची शताब्दी जवळ आली होती. आपल्या मांडणीत बाबा आढाव यांनी 1973 साली महात्मा जोतीराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. याकाळात सत्यशोधक चळवळीचा धागा सुटला असला तरी तो कालबाह्य झाला नाही, अपेतु तो सुटलेला धागा जोडण्याची संधी आपण गमावता कामा नये, असे आवाहन केले होते. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला पन्नास वर्ष होता होता या चळवळीने ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या उदयाने कसे वाकडे वळण घेतले होते, या गंभीर विषयाकडेही बाबांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर सत्यशोधक चळवळीकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहण्याचा दृष्टीकोन वाढत गेला होता, याकडेही बाबा वळले होते. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद व त्यातून बीजांकुरित झालेली...

मराठवाडा : गुलामीची 75 वर्षे!

इमेज
मराठवाडा : गुलामीची 75 वर्षे! ‘वसाहतवादी’ मंत्रिमंडळाची बैठक : वांझोट्या घोषणांचा हिशेब द्या; अन्यथा मराठवाडा स्वतंत्र करा भास्कर सरोदे, औरंगाबाद : मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिन अमृतमहोत्सवानिमित्ताने मराठवाडा तथा मध्य महाराष्ट्राची राजधानी औरंगाबादेत ‘वसाहतवादी’ मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हेतूत: रखडवून ठेवलेल्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर घोषणांचा पाऊस पाडला जाईल, मराठवाड्याला खूप काही दिल्याचा आव आणला जाईल, त्याला मराठवाड्यातले ‘गुलाम लोकप्रतिनिधी’ होकारार्थी माना डोलवून पुढील 75 वर्षाच्या गुलामीची ग्वाही देतील! प्रश्‍न लोकप्रतिनिधींचा नाही, तर जनतेचा आहे. वसाहतवाद्यांनो, गेल्या 75 वर्षात दिलेल्या वांझोट्या आश्‍वासनांचा हिशेब द्या, अन्यथा मराठवाडा स्वतंत्र करा, हीच आमची मागणी होती, आहे आणि यापुढेही राहील. आश्‍वासनांची खैरात, पूर्तता शून्य! : नागपूर कराराचे उल्‍लंघन करत राज्यकर्त्यांनी मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली. 2008 नंतर स्वतंत्र मराठवाड्याची मागणी जोर धरताच वसाहतवादी धूर्त राजकारण्यांनी मरा...

प्रधानमंत्री इंदिरा गांधींना का भेटायचे होते रूक्खम्या डाकूला?

इमेज
प्रधानमंत्री इंदिरा गांधींना का भेटायचे होते रूक्खम्या डाकूला? - आगाऊ सुचना देऊन, हलगी वाजवत दरोडा टाकणार्‍या रूक्खम्याची आजही होते जनमाणसांत चर्चा? भास्कर सरोदे, ‘बशा’ विशेष, औरंगाबाद :  आगाऊ सुचना देऊन हलगी वाजवत दरोडा टाकणारा, दरोड्यात लुटलेल्या मुद्देमालातील ठराविक हिस्सा गोर-गरिबांना आणि उर्वरित मालाचे समसमान वाटप आपल्या साथीदारांत करणारा, चार राज्यात दरोडे टाकूनही पोलिसांच्या हाती न लागणारा, अन्याय-अत्याचाराविरोधात पेटून उठणारा, दुर्बल तथा गरिबांवर कधीच हात न उचलणारा, स्त्रीला मातेसमान जाणणारा रूक्खम्या डाकू आजही जनमनावर राज्य करून आहे. मनगटात ताकद आणि खिशात पैसा आला की बेभान होणार्‍या सरंजामदारांचा तो कर्दनकाळ होता. ‘विद्यमान सरंजामी आणि भांडवली दरोडेखोर’ आपल्याच राजवटीत बेफाम होतात तेव्हा रूक्खम्या ऊर्फ रूक्खमाजी या गरिबांच्या तारणहार दरोडेखोराची गरज पदोपदी जाणवते आहे! म्हणूनच त्याच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया…आजपर्यंत रूक्खम्याची काळी बाजूच प्रकाशात आली, तथापि, सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट आणि लख्खं बाजुवर जाणीवपूर्वक आवरण घालण्यात आले, ती बाजू येथे उजेडात आणण्याचा अल्पसा प्...

बटन कोणतंही दाबा भाजपच जिंकणार...; भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ

इमेज
बटन कोणतंही दाबा भाजपच जिंकणार... ; भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ भाजपा खासदार डी. अरविंद चंद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाले. इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे मन:पूर्वक अभिनंदन. थँक्स् भारतीय संविधान! थँक्स् संविधाननिर्मात्यांना!! विशेष थॅक्स् बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर, ज्यांच्यामुळे या संविधानाला वैज्ञानिक दृष्टीकोन मिळाला. विज्ञान किती पुढं गेलंय नाही का? इस्त्रोच्या कंट्रोलरूममध्ये बसून सुमारे 3,84,400 किलोमीटर अंतरावर सोडलेल्या चंद्रयान मोहिमेला आपले शास्त्रज्ञ लिलया नियंत्रित करत होते. आहे की नाही अजब! खरचं विज्ञानाचे आविष्कार अजब असतात. ‘टाईम ट्रॅव्हल’ सोडून सर्वकाही येथे शक्य आहे. अर्थात हा रिमोट कंट्रोलचा जमाना आहे. आपल्याला पाहिजे त्या ठिकाणावरून पाहिजे ती वस्तू नियंत्रित करता येते. मग प्रश्‍न उरतो ईव्हिएम का नाही? होय, ईव्हिएमसुद्धा कंट्रोल करता येतं हे तेलंगनातील भाजपा खासदारानेच चक्‍क पत्रकार परिषदेत सांगून टाकले. 24 ऑगस्ट 2023 रोजी नवभारत टाइम्समध्ये आलेल्या वृत्तानुसार तेलंगनातील निजामाबाद येथे भाजपचे खासदार डी. अरविंद यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणता...

परंतु हाय! हा भारत आहे...!

इमेज
  परंतु हाय! हा भारत आहे...! क्षणभर एक विचार मनात डोकावून जातो की, ही वसाहत फिजी, गयाना, मॉरीशसमध्ये असती तर?, तर या वसाहतीतील लोकांचे जीवन सोन्यासारखे झाले असते. त्याच्यातील कितीतरी जण राज्यकारभारात सामील झाले असते आणि आपल्या जन्मभूमीचे नाव रोशन केले असते...थोडक्यात त्यांच्या गुणाची आणि श्रमाची कदर झाली असती!; परंतु हाय! हा भारत आहे. हा वर्णव्यवस्थाक, जातिप्रधान देश आहे. येथे मूल्य श्रमाला नाही, तर जातीला आहे! ‘डॉ. आंबेडकर रोड, ठाणे, गावठाण वसाहत-1920’ चा इतिहास ‘स्थलांतर ते स्थित्यंतर’ पुस्तक रूपात लेखन व संपादन : प्रदीप सावंत व सुशांत गायकवाड पुस्तक परीक्षण :   -राजाराम सूर्यवंशी  हा एक मौलिक ठेवाचा लिखित दस्ताऐवज आहे. जो या दोन मित्रांनी तीन वर्षांपेक्षा अधिककाळ खर्च करून या ग्रंथाचे संकलन व लेखन केले आहे. याबाबत आपण प्रथम प्रदीप सावंत व सुशांत गायकवाड यांचे अभिनंदन करूया! अभिनंदन दोन कारणासाठी करायचे, ते हे की, भल्या भल्यांना जो विषय हाताळता येत नाही, एखाद्या गाव, खेडे व वस्तीच्या स्थलांतराचा विषय जोखता येत नाही, असा बोजड विषय या मित्रांनी सहज हाताळला म्हणून त्यांचे ...

फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा भाष्यकार हरपला

इमेज
  फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा भाष्यकार हरपला :  बहुजन शासकतर्फे प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली भास्कर सरोदे, औरंगाबाद : फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा भाष्यकार प्रा. हरी नरके यांचे आज 9 ऑगस्ट 2023 या क्रांतीदिनी र्‍हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बहुजन चळवळ, सत्यशोधक चळवळ आणि परिवर्तनवादी चळवळीचा अवकाश व्यापणारे हरी नरके यांच्या निधनाने मोठी हानी झाली. फुले-शाहू- आंबेडकर विचारांचा भाष्यकार, संशोधक, मार्गदर्शकाला बहुजन शासकतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!  मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मुलगी प्रमितीचा संदेश : ‘माझे वडील हरी नरके यांचे आज दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेमध्ये ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधीसुद्धा वैकुंठ स्मशानभूमी, पुणे मध्येच होणार आहे’. हरी नरके सरांची मुलगी प्रमितीचा हा संदेश सर्वाच्या माह...