पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

ऑटोरिक्षाचालक-मोलकरणीची मुलगी ‘एमपीएससी’ परीक्षेत राज्यात प्रथम

इमेज
 ऑटोरिक्षाचालक-मोलकरणीची मुलगी ‘एमपीएससी’ परीक्षेत राज्यात प्रथम औरंगाबाद : आई कल्पना, वडील अंकुश यांच्यासह श्यामल बनकर. छायाचित्रात श्यामलचे पत्र्याचे घर दिसत असले तर महापुरूषांच्या तैलचित्रांनी घराच्या भिंती सजलेल्या आहेत. तथागत बुद्ध, बोधिसत्व बाबासाहेब डॉ. आंबेडकर, कर्मविर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज आदींच्या विचारांचा वारसा यातून प्रतिबिंबीत होतो. भास्कर सरोदे, औरंगाबाद (28 ऑगस्ट 2021) : आई मोलकरीण तर वडील ऑटोरिक्षाचालक. घरात अठराविश्‍व दारिद्र्य. दहा बाय दहा पत्र्याची खोली, शिक्षण आणि अभ्यासासाठी कुठेही अनुकूलता नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत श्यामल अंकुश बनकर, रा. महुनगर, औरंगाबाद हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (तांत्रिक) परीक्षेत राज्यातून पहिला येण्याचा मान मिळविला आहे. इतक्या विपरीत परिस्थितीत मिळालेल्या यशाने श्यामल, तिचे आई-वडील आणि कुटुंबीयांचे आभाळभर कौतुक होत आहे. आई-वडिलांचे मार्गदर्शन, त्याग, समर्पन आणि फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा हेच यशाचे गमक असल्याचे श्यामलने ‘बहुजन शासक’शी बोलताना सांगितले. शुक्रवार, दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेव...

दहन : पार्थिवाचं अन्…जातीचं!

इमेज
 दहन : पार्थिवाचं  अन् … जातीचं! 1. पुरोगामी म्हणविणार्‍या महाराष्ट्राचा मनुवादी चेहरा पुन्हा एकदा दिसून आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असलेलं माळवाडी बोरगाव हे छोटंस गाव. गावचे सरपंच मातंग समाजाचे! त्यांच्याच भावाचे निधन झालं; परंतु गावातील काही टगे स्मशानात अंत्यसंस्कार करू देईनात. पार्थिव 18 तास तसंच होतं. सोलापूर जिल्ह्याचे कर्तेधर्ते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील. सध्या ते भाजपात आहेत. माळवाडी बोरगावचे आमदार सातपुते म्हणून आहेत. तेदेखील भाजपाचे आहेत. त्यामुळं भाजपाच्या हिंदू राष्ट्रानुसार हे सारं घडत आहे, असं म्हणायला हवं. म्हणून एका औषध कारखानादारासाठी विलेपार्ले पोलिस स्टेशन गाठणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही सोलापूरची वाट धरलेली नाही. विशेष म्हणजे ‘राष्ट्रवादी’ वळसे पाटलांचे पोलिसही कायद्याचं पालन करण्यास या मातंग कुटुंबाला सहकार्य करीनात. ते तरी काय करणार! त्यांच्या लेखी ‘राष्ट्रवादाची व्याख्या काय, तर आमची जात’! मातंग, चर्मकार, भटके विमुक्त, ओबीसी, यांना त्यांच्या राष्ट्रवादात स्थान कुठाय? ते असतं तर पोलिसांनी हे दहन प्रकरण खर्‍याखुर...

जातीसंस्था निर्मूलनाचा धम्म हाच सैद्धांतिक पाया!

इमेज
 जातीसंस्था निर्मूलनाचा धम्म हाच सैद्धांतिक पाया! डॉ. गेल यांना ऐकण्याचा योग अनेकदा आला. 20 मार्च 2014 रोजी महाड येथे झालेल्या ‘ओबीसी बांधव बुद्ध धम्माच्या वाटेवर’ या महापरिषदेत त्यांच्या हस्ते ‘मेन स्ट्रीम’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्यावेळी त्यांना काही शंका विचारल्या होत्या. त्यावर त्यांनी भारतीय समाजाला बुद्धाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही, ही ठाम भूमिका मांडली होती. अलीकडेच डॉ. वंदना महाजन आणि संदीप सारंग यांनी ‘कल्चरली करेक्ट’ हे पुस्तक संपादित केले. या पुस्तकात डॉ. गेल यांनी अतिशय महत्त्वपूर्ण लेख लिहिला आहे. कदाचित हे त्यांचे अखेरचे लेखन असावे. त्यांच्या आयुष्यभरच्या चिंतनाचा सार आणि निष्कर्ष या लेखात प्रतिबिंबित झालेला आहे. डॉ. गेल यांना भावपूर्ण आदरांजली वाहताना त्यांचा भारतीय जनतेला नेमका कोणता संदेश आहे, हे स्पष्ट करणारा हा लेख सादर करणे औचित्याचे ठरावे … डॉ. गेल ऑमव्हेट गेल्या (25 ऑगस्ट 2021).  मागच्या काही वर्षांपासून त्या आजारी होत्या. या काळात डॉ. भारत पाटणकर यांनी त्यांची निरामय वात्सल्याने सेवा-सुश्रुषा केली. प्रेमविवाह किती गहिरा होत जातो, चळवळीच्या ओघात ...

वंदना हम शर्मिंदा हैं। जातीवाद अभी जिंदा हैं।

इमेज
 वंदना हम शर्मिंदा हैं।  जातीवाद अभी जिंदा हैं। माफ कर वंदना, हा देश सर्वश्रेष्ठ धनुर्धारी एकलव्याचा अंगठा कापून अर्जुनाला सर्वश्रेष्ठ म्हणून मिरवणार्‍यांचा आहे. माफ कर की, येथे खालच्या जातीतील शंबुकाने विद्या ग्रहण केली म्हणून त्याचा खून करणार्‍या तथाकथित मर्यादा पुरुषोत्तम रामाचा हा देश आहे. जगातील एकमेव चक्रवर्ती सम्राट अशोकाला ‘दासीपुत्र’ आणि ‘चंड’ ठरवणार्‍या कृतघ्न लोकांचा हा देश आहे, त्यासाठीही तू आम्हाला माफ कर. शक्य झाले तर माफ कर की, स्वराज्य स्थापन करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून राज्याभिषेक नाकारणार्‍यांचा हा देश आहे. तू यासाठीही आम्हाला माफ करशील की, येथे जागतिक स्तरावरील विद्वान, संविधानाद्वारे खंडप्राय देशाला एका सूत्रात बांधणार्‍या बोधिसत्व बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांना ‘दलितांचा कैवारी’ ठरवणार्‍या शूद्र मनोवृत्तींचा हा देश आहे. माफ कर की, स्वातंत्र्यानंतरही लोकशाही भारतात क्रीडा क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात उच्चवर्णीयांचेच वर्चस्व आहे. आणि हो, माफ करशील की, तुझ्या घरासमोर फटाके फोडून जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या उच्चवर्णीय दंभाचा हा ‘बदलता इंडिया’ आह...

#5_ऑगस्ट_समान_कायदा_दिन

इमेज
#5_ऑगस्ट_समान_कायदा_दिन महाराजा नंदकुमार यांना फाशी : भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासात क्रांतिकारी घटना भास्कर सरोदे, औरंगाबाद (8 ऑगस्ट 2021) : भारतात कायद्यापुढे समानता कधी प्रस्थापित झाली? बिनदिक्‍कत संविधानाची अंमलबजावणी (26 जानेवारी 1950) झाल्यापासून. हे खरे आहे की, भारतात संविधानाची अंमलबजावणी झाली आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याचा नियम लागू झाला; परंतु त्यापूर्वी एक दिवस असा होता की, ज्या दिवशी ‘कायद्यापुढे सर्व समान’ असल्याचा प्रत्यय आला होता. तो दिवस होता 5 ऑगस्ट 1775. याच दिवशी महाराजा नंदकुमार यांना फाशीची शिक्षा झाली आणि हे कायद्याचे राज्य असल्याचे भारताने पहिल्यांदाच अनुभवले. भारतीय इतिहासात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण याच दिवशी कायद्यापुढे समानतेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. म्हणून या ऐतिहासिक दिवसाला ‘समान कायदा दिन’ म्हणून साजरा केला तर इतिहासाचा यथोच्चित गौरव ठरेल. महाराजा नंदुकुमार यांना का झाली फाशी? : महाराजा नंदकुमार हे आधुनिक पश्‍चिम बंगालच्या विविध भागात कर संकलक होते. 1764 मध्ये इस्ट इंडिया कंपनीने त्यांना बरद्वान, नादिया आणि हुगळी भागात कर संकलक म्हणू...