पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

‘लॅटरल एन्ट्री’ घटनात्मक नीतिमत्तेला धरून आहे?

इमेज
‘लॅटरल एन्ट्री’ घटनात्मक नीतिमत्तेला धरून आहे? भारतात सनदी सेवेस ‘पोलादी चौकट’ म्हणून ओळखले जाते. या सेवा निर्माण करण्यात सरदार पटेलांची महत्वाची भूमिका होती. या बहुआयामी सेवांच्या माध्यमातून भारतासारख्या विविधता असलेल्या देशास एकात्म करण्यास मदत होऊन या सेवेतील अधिकार्‍यांच्या माध्यमातून धोरण निर्धारण व प्रत्यक्ष अंमलबजावणी यात एक कडी साधता येईल, अशी त्यांची धारणा होती. अशा या महत्त्वपूर्ण सेवेत ‘लॅटरल एन्ट्री’च्या माध्यमातून आणि प्रस्थापित प्रक्रिया टाळून खासगी क्षेत्रातील व्यक्‍तींच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यावरून बराच संभ्रम निर्माण झालेला असून त्यासंबंधी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे. लॅटरल एन्ट्री म्हणजे काय? : लॅटरल एन्ट्री म्हणजे एखाद्या पदावर करण्यात येणारी थेट भरती होय. राज्यघटनेने संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगांची निर्मिती करून गुणवत्तेच्या आधारावर प्रशासनातील विविध पदांवर नियुक्त्या करण्यासाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारशी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. आयोग यासाठी तीन स्तरात (उदा. पूर्वपरीक्...