पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

माणूस फसगतीचा शिकार!

इमेज
  माणूस फसगतीचा शिकार! -शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे व्याख्यानमाला : उद्घाटन प्रसंगी ज्ञानेश महाराव यांचे उद‍्गार छत्रपती संभाजीनगर : ‘उठावा महाराष्ट्र देश’ या विषयावर मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, विचारमंचावर उपासिका विठाबाई माधवराव बोरडे, शिवव्याख्याते प्रदीप सोळुंके व उपासक मिलिंद दाभाडे. भास्कर सरोदे, छत्रपती संभाजीनगर : ज्ञान-विज्ञानाचा अभाव, समृद्ध संत परंपरेचा विसर, धर्म आणि जातीच्या फेर्‍यातून बाहेर काढण्यासाठी ‘उठावा महाराष्ट्र देश’ आहे. संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या विचारांनीच माणूस पुढे जाईल. धर्मग्रंथ, पोथ्या, पुराणं  यांनी आमची फसवणूक केली आहे. मात्र, या सगळ्यांची तपासणी वा चिकित्सा करणारे एकमेव संविधान आहे. वेगवेगळ्या माध्यमातून माणसाची फसगत झालीय. त्यातून बाहेर पडण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची कास धरा, असे उद‍्गार ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी काढले. शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे पहिल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवव्याख्याते...