पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

बटन कोणतंही दाबा भाजपच जिंकणार...; भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ

इमेज
बटन कोणतंही दाबा भाजपच जिंकणार... ; भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ भाजपा खासदार डी. अरविंद चंद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाले. इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे मन:पूर्वक अभिनंदन. थँक्स् भारतीय संविधान! थँक्स् संविधाननिर्मात्यांना!! विशेष थॅक्स् बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर, ज्यांच्यामुळे या संविधानाला वैज्ञानिक दृष्टीकोन मिळाला. विज्ञान किती पुढं गेलंय नाही का? इस्त्रोच्या कंट्रोलरूममध्ये बसून सुमारे 3,84,400 किलोमीटर अंतरावर सोडलेल्या चंद्रयान मोहिमेला आपले शास्त्रज्ञ लिलया नियंत्रित करत होते. आहे की नाही अजब! खरचं विज्ञानाचे आविष्कार अजब असतात. ‘टाईम ट्रॅव्हल’ सोडून सर्वकाही येथे शक्य आहे. अर्थात हा रिमोट कंट्रोलचा जमाना आहे. आपल्याला पाहिजे त्या ठिकाणावरून पाहिजे ती वस्तू नियंत्रित करता येते. मग प्रश्‍न उरतो ईव्हिएम का नाही? होय, ईव्हिएमसुद्धा कंट्रोल करता येतं हे तेलंगनातील भाजपा खासदारानेच चक्‍क पत्रकार परिषदेत सांगून टाकले. 24 ऑगस्ट 2023 रोजी नवभारत टाइम्समध्ये आलेल्या वृत्तानुसार तेलंगनातील निजामाबाद येथे भाजपचे खासदार डी. अरविंद यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणता...

परंतु हाय! हा भारत आहे...!

इमेज
  परंतु हाय! हा भारत आहे...! क्षणभर एक विचार मनात डोकावून जातो की, ही वसाहत फिजी, गयाना, मॉरीशसमध्ये असती तर?, तर या वसाहतीतील लोकांचे जीवन सोन्यासारखे झाले असते. त्याच्यातील कितीतरी जण राज्यकारभारात सामील झाले असते आणि आपल्या जन्मभूमीचे नाव रोशन केले असते...थोडक्यात त्यांच्या गुणाची आणि श्रमाची कदर झाली असती!; परंतु हाय! हा भारत आहे. हा वर्णव्यवस्थाक, जातिप्रधान देश आहे. येथे मूल्य श्रमाला नाही, तर जातीला आहे! ‘डॉ. आंबेडकर रोड, ठाणे, गावठाण वसाहत-1920’ चा इतिहास ‘स्थलांतर ते स्थित्यंतर’ पुस्तक रूपात लेखन व संपादन : प्रदीप सावंत व सुशांत गायकवाड पुस्तक परीक्षण :   -राजाराम सूर्यवंशी  हा एक मौलिक ठेवाचा लिखित दस्ताऐवज आहे. जो या दोन मित्रांनी तीन वर्षांपेक्षा अधिककाळ खर्च करून या ग्रंथाचे संकलन व लेखन केले आहे. याबाबत आपण प्रथम प्रदीप सावंत व सुशांत गायकवाड यांचे अभिनंदन करूया! अभिनंदन दोन कारणासाठी करायचे, ते हे की, भल्या भल्यांना जो विषय हाताळता येत नाही, एखाद्या गाव, खेडे व वस्तीच्या स्थलांतराचा विषय जोखता येत नाही, असा बोजड विषय या मित्रांनी सहज हाताळला म्हणून त्यांचे ...

फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा भाष्यकार हरपला

इमेज
  फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा भाष्यकार हरपला :  बहुजन शासकतर्फे प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली भास्कर सरोदे, औरंगाबाद : फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा भाष्यकार प्रा. हरी नरके यांचे आज 9 ऑगस्ट 2023 या क्रांतीदिनी र्‍हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बहुजन चळवळ, सत्यशोधक चळवळ आणि परिवर्तनवादी चळवळीचा अवकाश व्यापणारे हरी नरके यांच्या निधनाने मोठी हानी झाली. फुले-शाहू- आंबेडकर विचारांचा भाष्यकार, संशोधक, मार्गदर्शकाला बहुजन शासकतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!  मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मुलगी प्रमितीचा संदेश : ‘माझे वडील हरी नरके यांचे आज दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेमध्ये ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधीसुद्धा वैकुंठ स्मशानभूमी, पुणे मध्येच होणार आहे’. हरी नरके सरांची मुलगी प्रमितीचा हा संदेश सर्वाच्या माह...

बळीराजा, वारकरी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर

इमेज
  बळीराजा, वारकरी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध!                                              -राजाराम सूर्यवंशी  राष्ट्रपिता  तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंनी बळीराजाच्या मिथकाचा उपयोग सत्यशोधक चळवळ बांधण्यासाठी केला होता. र. वा. दिघे हे जसे वारकरी तसे सत्यशोधकही होते. त्यामुळे त्यांनाही बळीराजाच्या मिथकातील शेतकर्‍यांचा, बहुजनांचा राजा खूप भावला. कारण बळीराजा हा मोठा मातृह्रदयी, समतावादी निरागस राजा. खंडोबांच्या नऊ खंडाचा तो शेतकरी आधिपती.आपल्या नऊ खंडातील प्रत्येक प्रजेला व व्यक्तीला त्याच्या कष्टाचे व हक्काचे फळ समप्रमाणात विभागून देणारा प्रजाहीतदक्ष राजा. भारतीय तमाम शेतकरी समाजाचा व बहुजन समाजाचा महानायक. त्याचे स्मरण हजारो वर्षांपासून, पिढ्या दर पिढ्या हा शेतकरी व बहुजन समाज करत आला आहे. ‘इडा पिडा टळो! बळीचे राज्य येवो!’ अशी कामना करत आला आहोत. र. वा. दिघेही तेच करतात. या मिथकाला श्रध्देचा आधार देऊन, बळी हा महारांचा...

अण्णा भाऊ साठे : जात आणि वर्ग यांच्या मध्यमेवर

इमेज
 अण्णा भाऊ साठे : जात आणि वर्ग यांच्या मध्यमेवर विसाव्या शतकातील तिसर्‍या दशकात भारतात एकाचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जातीमुक्‍तीची चळवळ आणि कम्युनिष्ट चळवळ सुरू झाली. या दोन्ही क्रांतिकारी चळवळी प्रारंभापासूनच पृथ्थकपणे कार्यरत राहिल्या आहेत. याच कालखंडात फुले-शाहूंचा विचार घेवून विकसित झालेली ब्राह्मणेतर चळवळ पुढे 1930 मध्ये जातीअंताचा ध्येयवाद सोडून महात्मा गाधींच्या जातवर्गसमन्वयवादाची कास धरलेल्या काँग्रेसमध्ये विलीन झाली. 1920 नंतर टिळकांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे नेतृत्व बनिया जातीच्या गांधींकडे आल्यावर महाराष्ट्रातील ब्राह्मणजातीय मोठ्या प्रमाणात क्रमश: हिंदू महासभा, त्यानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडे वळल्या. त्यातील एकप्रवाह 1925 नंतर भारतात स्थापित होणार्‍या साम्यवादी पक्षाकडे वळला. हे दोन्ही राजकीय प्रवाह गांधीविरोधी होते. कॉ. डांगेंवर टिळकांच्या ब्राह्मणी राष्ट्रवादाचा प्रभाव होता. ब्राह्मणेतर चळवळीला गती देणार्‍या राजर्षी शाहूंची सुरुवातीच्या काळात डांगेंनी ‘स्वराज्यद्रोही छत्रपती’(फडके : 1991, 222) म्हणून संभावना करीत त्यांच्या जातीमुक्‍तीच्या अभियानाला अप्रत्...