पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

वारकरी संतांचा सुफीनामा

इमेज
  वारकरी संतांचा सुफीनामा  एका जनार्दनी निजवद अल्ला। आसल वोही बिटपर अल्ला॥            -संत एकनाथ महाराज                     महाराष्ट्राच्या आध्यात्मिक चळवळीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली चळवळ म्हणजे वारकरी संत चळवळ होय. या वारकरी भागवत धर्मीय संत चळवळीचे तत्त्वज्ञान निर्मितीचे काम संत नामदेवांपासून संत निळोबारांयांपर्यंत अविरतपणे चालू होते. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका, संत एकनाथ महाराजांनी ‘भागवत’ तर संत तुकाराम महाराजांनी पाचवा वेद ‘अभंगगाथा’ देवून यात सर्वाधिक मौलिक भर घातलेली आहे. वारकरी संत चळवळ लोकप्रिय होण्याच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे संतांनी विठ्ठलाला ‘महासमन्वयाचे प्रतीक’ म्हणून उभे केले आहे. त्या काळातील सर्व लोकप्रिय पंथ, सांप्रदाय, शाखा, प्रवाह विठ्ठलाशी जोडून देवून वारकरी संतांनी सलोख्याची, समन्वयाची भूमिका घेतली होती. संतांनी पंढरपूरच्या विठ्ठलात काय काय पाहिले?  1) द्वारकेचा कृष्ण पुंडरीकाच्या भेटीला आला आणि तो येथेच स्थिरावला तोच हा विठ्ठल होय. 2) व...

लेखांक 2 : वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध

इमेज
 लेखांक 2 : वारकरी साहित्य व संप्रदाय : शोध आणि बोध ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत, लेखक राजाराम सूर्यवंशी यांचा ‘वारकरी साहित्य आणि संप्रदाय : शोध आणि बोध!’ या लेखांकाची मालिका बहुजन शासक, बहुजन शासक मीडियांच्या वाचकांसाठी देत आहोत. ही मालिका वारकरी संप्रदायाविषयीचे मळभ दूर करणारे ठरेल, इतके ते ऐतिहासिक संदर्भांनी परिपूर्ण, विश्वासार्ह आणि दर्जेदार असून वाचकांसाठी पंढरीच्या वारीची मेजवाणी ठरणार आहे. -संपादक कां सांडिसी गृहाश्रम। कां सोडिसी क्रियाकर्म।  कासया सांडिसी कुळीचे धर्म।  आहे हे वर्म वेगळेची। भस्म उधळण जयभारु। अथवा उदास दिगंबरु। न धरी लोकांचा आधारु। आहे तो विचार वेगळेची।  -संत ज्ञानेश्वर  दुजा ऐंसा कोण बळी आहे आता। हरि या अनंता पासूनिया॥1॥ बळियाच्या आम्ही जालों बळिवंत। करूं सर्व सत्ता सर्वांवरी॥2॥ तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा। जालों प्रीतिकरा गोविंदासी॥3॥  -संत तुकाराम महाराज देव दगडाचा बोलेल कैंचा। कोणे काळी त्यास फुटेल वाचा॥ नामा तोचि देव ह्रदयी पाहे। नामा केशवाचे सोडी न पाय॥ -संत नामदेव महाराज. कांदा, मुळा, भाजी। अवघी विठाबाई माझी। लसुण, मिरची, को...

‘महात्मा’ राहुल गांधी : इमेज बिल्डिंग, दुसरे काय?

इमेज
  ‘महात्मा’ राहुल गांधी : इमेज बिल्डिंग, दुसरे काय? ‘राहुल गांधी कसे ग्रेट आहेत आणि काँग्रेसच सध्या कशी गरजेची आहे’, हाच आमच्या जगण्या-मरणाचा प्रश्‍न असल्यागत समाज माध्यमावर चर्चा आहेत. राहुल गांधी अथवा काँग्रेसचा विरोध म्हणजे मोदीभक्‍त असल्याचेही बोलले जाते, जसे मोदी-भाजप-आरएसएसचा विरोधी तो देशद्रोही असे संबोधले जाते. असे म्हणणार्‍या दोहोंत मला तरी काहीच फरक वाटत नाही. दोघेही टोकाची भाषा वापरून देशातील नागरिकांचे अस्तित्व नाकारत आहेत. यालाच फॅसिइझम म्हणतात. आम्हाला या गटात किंवा त्या गटात ढकलताना आम्ही भारतीय आहोत, याला सोयीस्कर बगल दिली जात आहे. म्हणून काही प्रश्‍न उपस्थित करत आहे... 1. आपल्या म्हणण्यानुसार आज काँग्रेसची देशाला गरज आहे!, राहुल गांधी अगदी ‘महात्मा’ वगैरे वगैरे आहेत.... माझा साधा प्रश्‍न आहे की, काँग्रेसच का? सामाजिक समतेसाठी लढणार्‍या एम. के. स्टॅलीनचा डीएमके का नको, लालू प्रसाद यादव यांचा जनता दल का नको, बहेन मायावती यांचा बसपा का नको... भारतात द्विपक्षीय पद्धती आहे काय? असली तरी भारतासारख्या देशाला ती परवडेल काय? याचा सोक्षमोक्ष संविधान सभेतच लागलेला आहे. बरं, आ...

बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांचा स्पर्श, सहवास लाभलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार

इमेज
बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांचा स्पर्श, सहवास लाभलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार मिलिंदचा सुवर्णकाळ आणू..! : भीमराव आंबेडकर यांचा आशावाद भास्कर सरोदे, औरंगाबाद : ‘इतिहासाच्या पानोपानी भावनांचा झरा...इतिहास खरा. सन्मान साक्षीदारांचा...आठव बाबासाहेबांच्या निवासाचा’, अशी भावनिक साद घालताना बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचा स्पर्श, सहवास अथवा प्रत्यक्ष वर्गात शिकवण, ज्यांनी अनुभवली अशा मान्यवरांचा ऐतिहासिक सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे अखिल भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी ‘मिलिंदचा सुवर्णकाळ आणू..!’, असा आशावाद प्रतिपादित केला. उत्साह, उत्कंठा आणि खंत असे मिश्रण सत्कारमूर्तींच्या डोळ्यात तरळताना पाहायला मिळाले, हेच या सोहळ्याचे खास वैशिष्ट्ये! औरंगाबाद मनपाच्या माजी सभापती आशाताई विजय निकाळजे यांनी रविवार, दि. 18 जून 2023 रोजी तापडिया नाट्यमंदिरात या ऐतिहासिक सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे उपस्थित होते. ‘भीमसूर्य’ या मराठी नाटकाचा प्रयोग आणि प्रा. प्रताप कोचूरे निर...

वारकरी साहित्य आणि संप्रदाय : शोध आणि बोध

इमेज
  वारकरी साहित्य आणि संप्रदाय :  शोध आणि बोध  ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत, लेखक राजाराम सूर्यवंशी यांचा ‘वारकरी साहित्य आणि संप्रदाय : शोध आणि बोध!’ या लेखांकाची मालिका बहुजन शासक, बहुजन शासक मीडियांच्या वाचकांसाठी देत आहोत. ही मालिका वारकरी संप्रदायाविषयीचे मळभ दूर करणारे ठरेल, इतके ते ऐतिहासिक संदर्भांनी परिपूर्ण, विश्‍वासार्ह आणि दर्जेदार असून वाचकांसाठी पंढरीच्या वारीची मेजवाणी ठरणार आहे. -संपादक  लेखांक 1 (रविवार दि.18 जून 2023) : माझ्या मते धर्म हा विषय चर्चेसाठी त्याज्य नसावा. भले तो प्रस्थापित हिंदू धर्म असो वा बौध्द, जैन, लिंगायत वा मुस्लिम धर्म असो. किंवा हिंदू धर्माच्या जातीय आणि धार्मिक विषमतेच्या विरोधातून निर्माण झालेला शाक्त पंथ असो, महानुभव पंथ असो वा वारकरी पंथ असो, भारतातीय विविध प्रांतातील ब्राह्मणी धर्माविरुध्द धार्मिक समतेसाठी बंड करून निर्माण झालेले धर्म व पंथ असोत. त्यांचा विचार आपल्याला त्या त्या परिपेक्ष्यामध्ये करणे आवश्यक आहे. कारण सर्वसामान्य जनता नेहमी धर्माच्या अंगानेच सामाजिक, धार्मिक व राजकीय परिवर्तनात सहभागी झालेली होती असे दिसून येते....

गिरीश कर्नाडांच्या स्मृतींना विशेष अभिवादन..!

इमेज
  गिरीश कर्नाडांच्या स्मृतींना विशेष अभिवादन..! आज  10 जून रोजी   महाननायक, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त गिरीश कर्नाड यांचा 4 था स्मृतीदिवस आहे. त्यानिमित्ताने गिरीश कर्नाडांच्या स्मृतींना विशेष अभिवादन..! चित्रपट सृष्टीतील एक अत्यंत संवेदनाक्षम व बुध्दीमान व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची ओळख आहे, असे चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, नाटककार, अनेक बहुमोल पुरस्कार प्राप्त असे, आपल्या सर्वांना त्यांच्या कसदार अभिनयाने खिळवून ठेवणारे उत्तम कलाकार गिरीश कर्नाड यांचा जन्म बदलापूर-नेरळ जवळील माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी 19 मे 1938 रोजी झाला होता.  कृष्णाबाई मानकीकर या एक विधवा होत्या. त्यांचे माहेर माथेरान होते. त्या बाम्बे मेडिकल सर्विसेसमध्ये परिचारिकेचे प्रशिक्षण घेताना त्यांची ओळख तेथल्या डॉ. रघुनाथ कर्नाड यांच्याबरोबर झाली होती. डॉ. रघुनाथ कर्नाड हे आर्य समाजीयन होते. तसेच ते जातीभेद व स्त्री-पुरुष विषमतेच्या विरोधी होते. म्हणून त्यांनी विचारसरणीला अनुसरुन विधवा कृष्णाबाईंशी आर्य समाजीयन पध्दतीने, ब्राह्मण मध्यस्ताविना, रितसर लग्न केले होते. कृष्णाई व डॉ. रघुनाथ यांना चार...

रामायण-महाभारत काळापासून आदिवासी गणांच्या भटाळण्याच्या परंपरेने जोर पकडला!

इमेज
रामायण-महाभारत काळापासून आदिवासी गणांच्या भटाळण्याच्या परंपरेने  पकडला जोर !   आपल्या सर्वांना ज्ञात आहे की, पूर्वीच्या ग्रामव्यवस्थेत अस्पृश्य जाती गावाकुसाच्या बाहेर वस्ती करून रहात असत, तर आदिवासी गावकुसापासूनही पार लांब जंगलात वस्ती करून, आपल्या अभिजनांबरोबर रहात असत. अजूनही रहातात. म्हणजे ते भारतीय जातीव्यवस्थेचा भाग नसून जातीव्यवस्थेच्या सीमेवर उभे राहिलेले; परंतु जातीव्यवस्था नसलेले भारतीय जमाती आहेत. आजही जातविरहित आहेत. तथापि, त्यांच्या हक्‍क, अधिकार व दैनंदिन जीवनावर गावकुसातील उच्च त्रैवर्णिय समाजाकडून होणार्‍या शोषण व अत्याचाराविरुध्द ते संघटितपणे, आपल्या स्वातंत्र्यासाठी, रक्षणासाठी गावकुसातील या शाहू समाजाशी लढत राहिले होते. आदिवासींची अहिराणी भाषेत एक म्हण प्रचलित आहे, ‘बामणा घरी जनमाला येशी तर लिखु लिखु मरशील अन् आदिवासीत जनमाला येशील तर जंगलाचा राजा होशील!’ या एका अर्थाने आदिवासी हे जंगलाचे राजे होते, तर शाहू समाज कुलीन! कुळंपासून कुलीन हा शब्द बनला आहे. कुळं म्हणजे जमीनदार वा राजाकडून खंडाने शेती करणारे कुणबी! कुलीन वा कुणबीचे लक्षण म्हणजे परिग्रह, संचयवृत्ती...