पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

चोराच्या उलट्या बोंबा : ‘हिडेनबर्ग’चा भारतावर ठरवून हल्‍ला

इमेज
चोराच्या उलट्या बोंबा : ‘हिडेनबर्ग’चा भारतावर ठरवून हल्‍ला साधा प्रश्‍न: गौतम अदानीची सर्व मालमत्ता राष्ट्राची संपत्ती आहे काय?;   हिंडेनबर्गचा पलटवार: स्वतःला तिरंग्यात गुंडाळून पद्धतशीरपणे भारत लुटताय!; फसवणुकीला राष्ट्रवादाचा मुलामा  नवीदिल्‍ली : वृत्तसंस्था अदाणी उद्योगसमूहाने भारतीयाची फसवणूक करताना खुली लूट चालवल्याचा दावा अमेरिकेतील गुंतवणूक सल्‍लागार संस्था हिंडेनबर्गने करून एकच खळबळ उडवून दिली. या अहवालाने उद्योगपती गौतम अदाणी आणि केंद्रातील भाजप सरकारच्या बुडाखाली भूकंप आला. अदाणी समूहाला वाचविण्यासाठी सरकारपातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या सर्व आरोपांना अदाणींनी रविवारी रात्री तब्बल 413 पानांचं उत्तर देताना ‘हिंडेनबर्गचा हा राष्ट्रावर ठरवून हल्‍ला’, असल्याचे म्हटले आहे. यावर हिंडेनबर्गने आज सोमवारी ‘अदाणी, फसवणुकीला राष्ट्रवादाचा मुलामा देताहेत....तसेच स्वतःला तिरंग्यात गुंडाळून पद्धतशीरपणे भारत लुटताय!’, या शब्दात अदाणी समूहावर पलटवार केला आहे.  दरम्यान, देशाच्या आवरणाखाली आणि केंद्रातील भाजप सरकारच्या संरक्षणात सर्वसामान्यांना लुटत होते तेव्हा गौत...

स्वराज्याच्या उभारणीत मा जिजाऊंचे योगदान

इमेज
स्वराज्याच्या उभारणीत मा जिजाऊंचे योगदान जिजाऊ जन्मोत्सव (12 जानेवारी, 2023) विशेष : भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या केवळ स्मरणाने आपली छाती मूठभर उंच होते. विशेषतः मराठी माणसाला त्यांच्या चरित्र-चिंतनाने जे स्फूरण चढते, त्याला मात्र तोड नाही. मराठी अस्मितेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असे आपण मानतो; परंतु केवळ मराठी म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर सबंध भारताच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहायला हवे. कारण की, सभोवताली परकीय आक्रमकांच्या अन्यायी राजवटी विस्तारत चालल्या असताना अनेक शूर, पराक्रमी लढाऊ जमातीतील राजे-महाराजे लाचारी पत्करून कसे-बसे तग धरून बसले होते, तेव्हा छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी म्हणजे हिंदुस्तानचे. त्याचा अर्थ केवळ हिंदूंचे नव्हे, तर येथे राहणार्‍या सार्‍या जाती-धर्माचे स्वतंत्र राज्य होय. अशा स्वराज्याची संकल्पना सर्वप्रथम शहाजीराजांच्या मनात स्फूरण पावली. त्यांनी आपल्या परीने तिला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्य...