पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

राष्ट्रपती : किती नामधारी किती वास्तविक ?

इमेज
राष्ट्रपती : किती नामधारी किती वास्तविक ?                महाराष्ट्रात राजकीय नाट्य घडत असताना देशात राष्ट्रपती निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय नाट्यास राष्ट्रपती निवडणुकीचाही एक पदर आहे, हे चाणक्ष लोक जाणतातच. एनडीएकडे त्यांचा उमेदवार निवडून आणण्याइतपत पुरेसे (अंदाजे सहा लाख) मतमूल्य आहे. तर विरोधी पक्षांच्या मतमुल्याची बेरीज जवळपास 3 लाख 89 हजार इतकी आहे. निवडून येण्यासाठी 543216 मते हवी आहेत. विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा हे एनडीए पुरस्कृत उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्यापेक्षा अधिक मुरलेले व देशभरात विविध राजकीय पक्षांशी संबंध असलेले आहेत. पूर्वाश्रमी भाजपमध्ये असल्याने सिन्हांना भाजपमधूनही मतदान होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भाजप आपला उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. सिन्हांनी आपण ‘रबरी स्टॅम्प राष्ट्रपती’ होणार नाही आणि श्रीमती मुर्मुंनी सुद्धा तसे आश्वासन द्यावे, असे आव्हान केले आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाचे स्थान व भूमिका काय आहे? त्याबाबत घटनाकारांचा काय दृष्...

छ. शाहू महाराजांची शिक्षणविषयक भूमिका

इमेज
 छ. शाहू महाराजांची शिक्षणविषयक भूमिका शाहू महाराज (26 जुन) जयंती विशेष 1930 च्या दरम्यान जगातील एकूण 84 टक्क्यांहून अधिक भूभाग वासाहतिक सत्तेच्या अधिपत्याखाली आलेला होता. वसाहतवादाचे हे महाकाय रूप हे सिद्ध करते की वासाहतिक सत्तेच्या प्रस्थापनेची प्रक्रिया ही एकसुरी नव्हती. म्हणजे केवळ दमन, पाशवी बळ वा युद्ध याआधारे वासाहतिक सत्तेची प्रस्थापना शक्य नव्हती. वासाहतिक सत्ता प्रस्थापित करणे व तिचे दृढीकरण करणे ही प्रक्रिया बहुविध स्वरूपाची होती. तसेच त्यामध्ये अनेक व्यूव्हरचनांचा विनीयोग वसाहतवाद्यांनी केला होता.   वासाहतिकरणाच्या प्रक्रियेचे वर्णन हे वसाहतवादी देश व वासाहतिक देश यांच्यामधील प्रामुख्याने आर्थिक शोषणाचे संबंध कसे करणे अपूर्ण आहे. नवमार्क्सवाद व उत्तरवसाहतवादाच्या उदयानंतर वासाहतिक प्रक्रियेच्या अर्थकेंद्री विश्लेषणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. सत्ताधारी वर्ग प्रभुत्व स्थान प्राप्त करण्यासाठी संस्कृती व विचारप्रणालीचे जे राजकारण करतो त्याची चर्चा अ‍ॅण्टोनिओ ग्रामशी व लुई अल्थुझर या नवमार्क्सवादी अभ्यासकांनी केली आहे. या चर्चेच्या प्रभावात उत्तरवसाहतवाद्यांनी वास...